शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींच्या सुरक्षेत मोठी चूक; तरुण Kiss घेऊन पळाला, व्हिडिओ व्हायरल...
2
बायकोला जिवंत जाळल्याचा आरोप असलेल्या पतीची पहिली प्रतिक्रिया, पत्नीच्या हत्येमागील कारण काय सांगितले?
3
गर्भवती पत्नीची निर्घृण हत्या, मृतदेहाचे तुकडे करून पतीने लपवले; धक्कादायक घटनेने परिसर हादरला!
4
"रोज म्हणतात व्होट चोरी... व्होट चोरी..., यांचं डोकं चोरी झालंय!" देवेंद्र फडणवीस यांचा विरोधकांवर हल्लाबोल; स्पष्टच बोलले
5
'कर्नाटक-महाराष्ट्रात मतचोरी; बिहारमध्ये होऊ देणार नाही', राहुल गांधींचा निवडणूक आयोगावर निशाणा
6
५,००० रुपयांची SIP तुम्हाला बनवेल लखपती? जाणून घ्या १५ वर्षांत किती परतावा मिळेल
7
"मर्यादेत राहा...!"; आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान सामन्यापूर्वी वसीम अक्रमचा इशारा, नेमकं काय म्हणाला?
8
उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी ६८ अर्ज; अनेक खासदारांच्या बनावट स्वाक्षरी केल्याचे उघड
9
सोहम बांदेकरसोबत लग्नाच्या चर्चांनंतर अभिनेत्री पूजाने पहिल्यांदाच शेअर केली स्टोरी, म्हणाली...
10
८व्या वेतन आयोगात बँक कर्मचाऱ्यांचे पगारही वाढतील का? कधी होणार लागू? मोठी अपडेट समोर
11
Sara Ali Khan : जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन! सारा अली खानने फक्त 'या' २ गोष्टी सोडून कमी केलं ४५ किलो वजन
12
'आधी १९७१ चा प्रश्न सोडवा, मग आपण चर्चा करू', बांगलादेशच्या भूमीवर पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांचा अपमान
13
बायकोला जाळणाऱ्या नवऱ्याचा एन्काउंटर; पायाला लागली गोळी, पळून जाण्याचा करत होता प्रयत्न
14
समुद्रात भारताची ताकद वाढणार, जर्मनीसोबत ७० हजार कोटींचा करार; ६ हाय-टेक पाणबुड्या बांधणार
15
Cheteshwar Pujara: भारतीय क्रिकेटमधील मोठी 'इनिंग' संपली; 'मिस्टर डिपेंडेबल' आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त!
16
युक्रेनमध्ये हाहाकार, रशियानं 143 ठिकाणांवर केली  बॉम्बिंग; डोनेत्स्कमध्ये दोन गावांवर कब्जा!
17
"हुंड्यात स्कॉर्पिओ, बुलेट दिली तरी माझ्या मुलीची हत्या, आरोपींच्या घरावर बुलडोझर चालवा अन्यथा..."
18
एआयची कमाल, 25 वर्षांनंतर परतला महिलेचा आवाज...! कसा घडला हा चमत्कार? जाणून थक्क व्हाल!
19
लग्नाला ८ वर्षं होऊनही मुलबाळ नाही, तांत्रिक महिलेला म्हणाला तंत्रमंत्राने गर्भधारणा करतो, त्यानंतर...
20
फलकावरुन झालेल्या वादातून दगडफेक; कोल्हापुरात दोन्ही गटांतील ४०० जणांवर दंगलीचा गुन्हा, लाखोंचे नुकसान

स्त्रियांनी स्वावलंबी होण्याची गरज

By admin | Updated: May 29, 2015 00:01 IST

भारती पाटील : मुलींच्या शिक्षणासाठी पालकांनी प्रोत्साहन द्यावे--ज्ञानदीप व्याख्यानमाला

सोनी : स्त्रियांनी स्वावलंबी आणि धाडसी बनावे. कोणतेही कार्य करताना समाज काय म्हणेल, याचा विचार न करता जर आपले काम चोख व प्रामाणिकपणे केल्यास समाजात वेगळे स्थान नक्कीच मिळेल. यासाठी शिक्षण आवश्यक असल्याने मुलींच्या शिक्षणाकडे पालकांनी जास्त लक्ष देणे गरजेचे आहे. त्याचबरोबर स्त्रियांनी नेहमी नवीन काहीतरी करण्याचा प्रयत्न करावा, त्यामुळे समाजात स्त्रियांना मान-सन्मान मिळेल, असे मत कवयित्री डॉ. भारती पाटील यांनी व्यक्त केले.सोनी (ता. मिरज) येथे ज्ञानदीप ग्रुपतर्फे आयोजित ज्ञानदीप व्याख्यानमालेत गुरव यांनी ‘स्त्रियांचे समाजातील आजचे स्थान’ या विषयावर तिसरे पुष्प गुंफले. त्या म्हणाल्या की, आज मुलींना शिक्षण दिले जात आहे. काळ बदलला, पण ग्रामीण भागात २० ते ३० टक्केच परिवर्तन दिसते. स्त्रियांना अजूनही हवा तेवढा पोषण आहार मिळत नाही, ही खंत आहे. चाळीशी पार केल्यानंतर सर्वसाधारण सर्वच स्त्रियांमध्ये मानसिक कमकुवतपणा येतो. या काळात खरं तर त्यांना मानसिक आधाराची गरज असते व ती मिळणे गरजेचे असते. शासनाने चालू केलेल्या बचत गटाच्या माध्यमातून स्त्रिया सक्षम व स्वावलंबी व्हाव्यात, हा हेतू आहे. पण त्यातून कर्ज काढण्याव्यतिरिक्त कोणतेच काम केले जात नाही. बचत गटातील पैशातून स्त्रियांनी लहान-मोठे उद्योग करावेत, त्यासाठी गटातील प्रत्येक स्त्री ही मनाने एकरूप झाली पाहिजे. राजकारण व समाजकारणामध्ये आता स्त्रियांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होत असून, या क्षेत्रातही महिलांनी अभ्यासू व कार्यक्षम होणे गरजेचे आहे. यावेळी पाटील यांनी स्त्री जीवनावरील काही कविता सादर केल्या. यावेळी वातावरण भावूक झाले होते. नरेंद्र जाधव यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर पी. बी. पाटील यांनी आभार मानले. (वार्ताहर)