शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

महिला शेतमजुरांना मदतीचा हात

By admin | Updated: August 7, 2014 00:17 IST

जिल्हा परिषद कृषी विभागाचा निर्णय : मृत्यू झाल्यास २०, अपंगत्वास १० हजार

आयुब मुल्ला - खोची .. ज्यांच्या नावावर शेतजमीन नाही अशा शेतमजूर महिलेचा आपदग्रस्त होऊन किंवा अपघातात मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत म्हणून वीस हजार रुपये देण्याचा निर्णय जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने घेतला आहे. तसेच अपंगत्व आल्यास दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत. असा निर्णय जाहीर करणारी राज्यातील ही पहिलीच जिल्हा परिषद आहे.शहराबरोबरच ग्रामीण भागातही भविष्याची तरतूद म्हणून विमा उतरविण्याचे प्रमाण वाढलेले आहे. अपघातपश्चात कुटुंबातील लोकांना संरक्षण तसेच आधाराच्या दृष्टीने विम्यात गुंतवणूक केली जाते. यामध्ये नोकरदार, व्यापारी वर्गाचा मोठा सहभाग आहे. ग्रामीण भागातही जमीनदार कुटुंबांत विमा गुंतवणुकीचे प्रमाण वाढले आहे. राज्य शासन खातेदार शेतकऱ्यांसाठी ‘शेतकरी जनता अपघात विमा योजना’ राबविते. ही योजना ज्यांच्या नावावर शेती आहे अशांसाठीच उपयुक्त ठरते. परंतु, ज्यांच्या नावावर जमीन नाही त्यांना मात्र या योजनेचा लाभ मिळत नाही. त्यामुळे अशी कुटुंबे आधाराविनाच राहतात. याचाच विचार करून जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने वरील निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागात शेतमजुरी करणाऱ्या महिलांची संख्या जास्त आहे. अशा शेतमजूर महिलेचा जर अपघाताने मृत्यू झाला, तर तिच्या कुटुंबीयांना कोणताही आर्थिक लाभ मिळत नाही. त्यामुळे गरिबीत गुजराण करणारे कुटुंबीय पुन्हा आर्थिक अडचणीत सापडते. यासाठी कुटुंबीयांना आधार मिळावा म्हणून वीस हजारांची मदत देण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच शारीरिक अपंगत्व आल्यास किंवा जखमी होऊन एखादा अवयव निकामी झाल्यास दहा हजार रुपये देण्यात येणार आहेत.अशी मदत मिळण्यासाठी पोलीस ठाण्यातील माहिती, मृत्यूचा दाखला, वैद्यकीय दाखला, वयाचा दाखला, रहिवाशाचे नाव, वारसदाराचे नाव, अपघातग्रस्ताशी नाते, बॅँकेचा तपशील या कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. १८ ते ६५ वयोगटातील विवाहित महिलांच्या बाबतीत हा निर्णय लागू आहे. त्यासाठी १ लाख रुपये उत्पन्न मर्यादा असावी, असेही नमूद करण्यात आले आहे.