शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
2
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
3
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
4
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
5
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
6
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
7
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
8
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
9
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
10
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
11
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
12
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
13
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
14
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
15
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
16
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
17
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
18
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
19
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
20
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
Daily Top 2Weekly Top 5

‘त्या’ महिलेसह तिघांवर खंडणीचा गुन्हा

By admin | Updated: January 24, 2017 00:15 IST

जयकुमारांच्या पीएची फिर्याद : विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण शक्य

सातारा : माण-खटावचे आमदार जयकुमार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांच्या तक्रारीवरून दहिवडी पोलिस ठाण्यात एका महिलेसह तिघांवर तक्रार दाखल करण्यात आली. प्रदीप जाधव (दहिवडी), विवेकानंद सावंत (नवी मुंबई) आणि सातारा येथील महिलेवर भारतीय दंड संहितेच्या कलम ३८५ आणि ३४ नुसार गुन्हा दाखल झाल्याने आमदार गोरेंवर दाखल असलेल्या विनयभंग प्रकरणाला वेगळे वळण मिळण्याची शक्यता आहे. आमदार जयकुमार गोरे यांच्यावर महिलेचा विनयभंग, मोबाईलवर अश्लील मॅसेज पाठविणे हा गुन्हा नोंद करण्यात आला होता. याप्रकरणी आमदार गोरे यांना अटकपूर्व जामीन नाकारण्यात येऊन अटकही झाली होती. संपूर्ण जिल्ह्यात या प्रकरणाची चर्चा सुरू असतानाच सोमवारी आमदार गोरे यांचे पीए अभिजित काळे यांनी प्रदीप जाधव, विवेकानंद सावंत आणि सातारा येथील एका महिलेविरोधात तक्रार दाखल केली. अभिजित काळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद करण्यात आले आहे की, आमदार जयकुमार गोरे यांनी विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार मोहनराव कदम यांच्या प्रचाराची धुरा सांभाळली होती. या निवडणुकीत शेखर गोरे यांचा पराभव झाला. त्यांचे आमदार होण्याचे स्वप्न दुसऱ्यांदा धुळीस मिळाले. त्यामुळे विरोधक आमदार गोरेंना खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करण्याच्या प्रयत्नात होते. त्याचाच एक भाग म्हणून प्रदीप जाधव यांनी माझ्याशी संपूर्ण साधून व दहिवडी येथे समक्ष भेटून तुम्ही विवेकानंद सावंत यांना ठराविक द्या. रक्कम न दिल्यास आम्ही आमदार गोरेंना एका महिलेच्या मदतीने खोट्या केसमध्ये अडकवून त्यांचे राजकीय जीवन उद्ध्वस्त करू, असे सांगितले.