शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
2
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
3
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामनंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
4
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
5
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
6
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
7
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
8
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
9
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
10
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
11
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
12
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
13
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
14
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
15
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
16
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
17
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
18
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
19
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
20
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
Daily Top 2Weekly Top 5

बावड्यात इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून पडून महिलेचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2021 04:22 IST

कसबा बावडा : कसबा बावडा-कदमवाडी रोडवरील वसंत निवारा इमारतीत राहणाऱ्या सविता रवींद्र मोहिते या चौथ्या मजल्यावरून पडून गंभीररित्या जखमी ...

कसबा बावडा :

कसबा बावडा-कदमवाडी रोडवरील वसंत निवारा इमारतीत राहणाऱ्या सविता रवींद्र मोहिते या चौथ्या मजल्यावरून पडून गंभीररित्या जखमी झाल्या होत्या. त्यांना तत्काळ खासगी रुग्णालयामध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

अधिक माहिती अशी, रवींद्र मोहिते हे आपल्या कुटुंबीयासंवेत कसबा बावडा- कदमवादी रोडवरील वसंत निवारा इमारतीत चौथ्या मजल्यावर राहतात. आज सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांची पत्नी सविता या घराच्या बाल्कनीत उभ्या असताना तोल जाऊन खाली कोसळल्या. गंभीर जखमी झालेल्या सविता मोहिते यांना तात्काळ उपचारासाठी एका खाजगी रुग्णालयात दाखल केले. दुपारी एक वाजण्याच्या सुमारास उपचार सुरू असताना सविता मोहिते यांचा मृत्यू झाला.

सीपीआर येथे दुपारी शवविच्छेदन करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. रवींद्र मोहिते हे एका बँकेत नोकरीस असून त्यांना एक सहा वर्षाची मुलगी आहे. अचानक घडलेल्या या घटनेमुळे मोहिते कुटुंबीयांना धक्का बसला असून सीपीआर येथे मयत सविता मोहिते यांचे नातेवाईक शोकमग्न अवस्थेत उभे होते. दरम्यान या घटनेची नोंद शाहूपुरी पोलीस ठाण्यात झाली.