शहरं
Join us  
Trending Stories
1
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
2
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
3
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
4
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
5
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
6
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
7
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट
8
ICC Test Rankings : 'तलवारबाज' जड्डूचा मोठा पराक्रम! टेस्टमध्ये अव्वलस्थान कायम राखत सेट केला नवा विक्रम
9
"नो डाउट, भारतच जिंकला.. तेही अगदी ठासून!" अमेरिकन युद्धतज्ज्ञाचं 'सर्टिफिकेट', ४ मुद्दे महत्त्वाचे
10
३६ युद्धनौका, ७ विनाशिका, फ्रिगेट आणि पाणबुड्या..., त्या रात्री नौदलाने केली होती कराची बेचिराख करण्याची तयारी   
11
Mumbai: मुंबईतील महिलेची सातव्या मजल्यावरून उडी, सुसाईड नोटमध्ये लिहिले मृत्युचे कारण
12
दहशतवादी मसूद अजहरला पाकिस्तानी सरकार १४ कोटी रुपये देणार? कारण ऐकून व्हाल हैराण!
13
India Pakistan conflict : मोठा खुलासा! तुर्कीचे सैनिक भारतावर ड्रोन हल्ला करत होते; सीमेपलिकडे काय घडत होते?
14
'आली रे आली चीनची बारी आली'; आता मोदी सरकार चीनची नांगी ठेचण्याच्या तयारीत, प्रकरण काय?
15
भारताविरोधातील कट उधळला! शोपियान चकमकीत ठार झालेल्या ३ दहशतवाद्यांकडून मोठा शस्त्रसाठा जप्त
16
प्रसिद्ध सेलिब्रिटीचा व्हिसा रिजेक्ट, कान्सला जाण्याचं स्वप्न भंगलं; पोस्ट शेअर करत म्हणाली...
17
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! 'या' कंपनीशी कुठलाही व्यवहार करू नका; अन्यथा पश्चाताप होईल, सेबीचा इशारा!
18
अमेरिकेचा यू-टर्न; ज्या व्यक्तीला कुख्यात दहशतवादी घोषित केले, त्याचीच ट्रम्प यांनी घेतली भेट
19
Astro Tips: गुरुकृपेसाठी आणि सकल इच्छापूर्तीसाठी गुरुवारपासून सुरू करा औदुंबर पूजेचे व्रत!
20
FD वर व्याजासोबत ५ लाख रुपयांचे विमा कव्हर; ठेवीवर कर्ज घेण्याचीही सुविधा

चौगुले वॉरियर्सची विजयी सलामी

By admin | Updated: March 22, 2016 01:01 IST

केपीएल २०१६ स्पर्धा : प्रथम स्पोर्टस्, एअर इंडियाचीही प्रतिस्पर्ध्यांवर मात

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व संजय घोडावत गु्रपच्यावतीने आयोजित ‘केपीएल-२०१६’ स्पर्धेत सोमवारी गोव्याच्या चौगुले वॉरियर्सने कोल्हापूर रॉयल्सवर दणदणीत, तर प्रथम स्पोर्टस्ने मुंबईच्या प्रीझम स्पोर्टस्चा व बलाढ्य एअर इंडियाने डी. वाय. पाटील संघाचा चुरशीच्या सामन्यात पराभव करत विजयी सलामी दिली. शास्त्रीनगर मैदानावर सोमवारी सकाळच्या सत्रात पहिला सामना गोव्याच्या बलाढ्य चौगुले वॉरियर्स व कोल्हापूर रॉयल्स यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना कोल्हापूर रॉयल्स संघाचा डाव चौगुलै वॉरियर्सच्या तिखट माऱ्यापुढे १५ षटकांत सर्वबाद ५४ धावांत गुंडाळला. त्यामध्ये अतिष वर्पेने १३, वैभव चौगुलेने १३ धावा केल्या. चौगुले वॉरियर्सकडून धु्रमल मटकरने चार, तर शेखबहादुर यादवने २ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल चौगुलै वॉरियर्सने ५४ धावांचे आव्हान केवळ पाच षटकांत बिनबाद ५६ धावा करत पार केले. सूर्या डोंगरेने १९, तर गही गावकरने ३२ धावा केल्या. चौगुले वॉरियसचा धु्रमल मटकर सामनावीर ठरला.दुसरा सामना प्रथम स्पोर्टस् व मुंबईच्या प्रीझम स्पोर्टस् यांच्यात झाला. प्रथम फलंदाजी करताना प्रीझम संघाने २० षटकांत सर्वबाद ९९ केल्या. त्यामध्ये सुफियाल रहिमानीने नाबाद २५, तर अभिषेक श्रीवास्तव याने २२ धावा केल्या. प्रथम स्पोर्टस्कडून सागर सावंतने ३, तर संतोष शिंदेने दोन बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल प्रथम स्पोर्टस्ने १७.२ षटकांत ७ बाद १०० धावा करत विजयावर शिक्कामोर्तब केला. जीवन जोशीने २७, तर सलमान अहमद ११, सुमित चव्हाणने नाबाद २० धावा केल्या. प्रीझम संघाकडून सोनसिंगने तीन, तर सुनील चावरेने १ बळी घेतला. सुमित चव्हाण सामनावीर ठरला. तिसरा सामना एअर इंडिया व डी. वाय. पाटील संघ यांच्यात झाला. एअर इंडियाने प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत सर्वबाद १४८ धावा केल्या. त्यामध्ये प्रशांत नाईकने २९, आकर्षक गोमेल ३२, अमेय सोमनने २३ धावा केल्या. डी. वाय. पाटील संघाकडून शशांग सिंगने १२ धावांत ४, तर अजिम अन्सारीने २७ धावांत ३ बळी घेतले. प्रत्युत्तरादाखल डी. वाय.पाटील संघाचा डाव १९.४ षटकांत सर्वबाद १४३ धावांवर आटोपला. योगेश ताकवलेने ३०, केविन अलमेडाने ३७, तर योगेश पवारने २५ धावा केल्या. एअर इंडियाकडून अमन सोमण व रौनक शर्मा यांनी प्रत्येकी दोन बळी घेतले. एअर इंडियाने हा सामना ५ धावांनी जिंकला. एअर इंडियाचा प्रशांत नाईक सामनावीर ठरला. पोलीस अधीक्षक देशपांडे, महापौर रामाणे यांच्या हस्ते उद्घाटनशास्त्रीनगर मैदानावर रविवारी जिल्हा पोलीस अधीक्षक प्रदीप देशपांडे व महापौर अश्विनी रामाणे यांच्या हस्ते स्पर्धेचा उद्घाटन व चषक अनावरण सोहळा झाला. यावेळी संजय घोडावत गु्रपचे उदय जोशी, माई हुंडाईचे संचालक दिग्विजय राजेभोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. स्पर्धेचे संयोजन ‘केडीसीए’चे अध्यक्ष आर. ए. तथा बाळ पाटणकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी अध्यक्ष ऋतुराज इंगळे, उपाध्यक्ष चेतन चौगुले, सचिव रमेश कदम, तेजोमय खर्डेकर, बापू मिठारी, केदार गयावळ, अभिजित भोसले, विश्वजित महागांवकर, रोहन भुर्इंबर, अजित मुळीक, निसार मुजावर, जनार्दन यादव आदींनी केले. सामन्याचे धावते वर्णन अंकुश निपाणीकर, सुनील घोडके, तर स्कोरर स्वप्निल कदम, सामना निरीक्षक म्हणून चंदाराणी कांबळे आदी काम पाहत आहेत.