शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
3
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
4
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
5
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
6
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
7
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
8
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
9
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
10
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
11
Health Tips: लघवीला दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
12
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
13
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
14
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
15
Summer Special: सुकी भेळ करायची तर 'हा' सिक्रेट' मसाला हवाच, वाढवतो सुक्या भेळेची लज्जत
16
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
17
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
18
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
19
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
20
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
Daily Top 2Weekly Top 5

मीटर रिडींग चुका असल्यास कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 8, 2021 05:20 IST

कोल्हापूर : वीजबिलांच्या थकबाकीमुळे सध्याचे आर्थिक संकट अभूतपूर्व असले तरी महावितरणसाठी हे आव्हान नवीन नाही. ते दूर करण्यासाठी सर्वांनी ...

कोल्हापूर : वीजबिलांच्या थकबाकीमुळे सध्याचे आर्थिक संकट अभूतपूर्व असले तरी महावितरणसाठी हे आव्हान नवीन नाही. ते दूर करण्यासाठी सर्वांनी एकजुटीने व एकत्रितपणे प्रयत्न सुरु केले आहेत. येत्या मार्चपर्यंत जास्तीत जास्त थकबाकी वसुलीसाठी वीज ग्राहकांना विश्वासात घेऊन प्रत्यक्ष किंवा व्हॉट्सअॅप ग्रुपद्वारे त्यांच्या शंका, संभ्रम व तक्रारी दूर करण्यासाठी तत्पर राहा. यासोबतच महावितरणच्या महसुलाकडे बारकाईने लक्ष ठेवा. मीटर रिडींगमध्ये एजन्सीकडून चुका होत असल्यास त्यांच्याविरुद्ध तत्काळ व कठोर कारवाई करा, अशा सूचना महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी केल्या.

पुणे, कोल्हापूर, सांगली, सातारा व सोलापूर जिल्ह्यांतील महावितरणमधील विविध कर्मचारी संघटनांच्या सुमारे ६० वरिष्ठ पदाधिकाऱ्यांशी नाळे यांनी मंगळवारी नववर्षानिमित्त व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे थेट संवाद साधला. गतवर्षाचा मागोवा घेत कोरोना संकट, ‘निसर्ग’ चक्रीवादळ तसेच इतर प्रतिकूल परिस्थितीत महावितरणच्या कर्मचारी, अभियंता, अधिकाऱ्यांनी केलेल्या कामांचे नाळे यांनी विशेष कौतुक केले.

नाळे म्हणाले, कोरोना कालावधीमधील वीजबिले अचूक असतानाही त्याबाबत निर्माण झालेल्या संभ्रमामुळे थकबाकीमध्ये वाढ होत आहे. परिणामी आर्थिक संकट गडद झाले आहे. अशास्थितीत महावितरणचे अस्तित्व टिकविण्याचे आव्हान आपण स्वीकारले आहे. वीज ग्राहकांना तत्परतेची व आपुलकीची सेवा देण्यासाठी आपण कटिबद्ध आहोत.

या संवाद कार्यक्रमात उपमहाव्यवस्थापक (मासं) अभय चौधरी, उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी शिरीष काटकर (पुणे), श्रीकृष्ण वायदंडे (बारामती) व भूपेंद्र वाघमारे (कोल्हापूर) यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले.