शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

माणसे मेल्यावर जाग येणार का?

By admin | Updated: August 5, 2016 02:00 IST

शिवसेनेने विचारला जाब : दोषी अधिकाऱ्यांच्या निलंबनाची मागणी

कोल्हापूर : तांत्रिक बाबी न तपासता व सर्व परवानग्या घेण्यापूर्वीच पर्यायी शिवाजी पुलाचे काम सुरू केल्याने ते रखडले आहे. माणसे मेल्यावरच तुम्ही जागे होणार काय? यातील जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करा, अशा प्रश्नांची सरबत्ती करीत शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांना गुरुवारी धारेवर धरले. शिवाजी पुलाबाबत शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार व विजय देवणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने सार्वजनिक बांधकाम कार्यालय येथे कार्यकारी अभियंता आर. के. बामणे व अधीक्षक अभियंता सदाशिव साळुंखे यांची भेट घेऊन प्रश्नांची सरबत्ती करीत निवेदन दिले. ‘शिवाजी पुलासंदर्भात तुम्ही काय केले सांगा; अन्यथा तुमच्या कार्यालयाला टाळे ठोकू. निव्वळ पुढाऱ्यासारखे बोलू नका,’ अशा शब्दांत आर. के. बामणे यांना संजय पवार यांनी ठणकावले. निव्वळ टक्केवारी आणि कुणी किती खायचे अशी स्पर्धाच येथे सुरू आहे. यासाठी जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांना निलंबित करावे, अशी मागणी संजय पवार यांनी केली. विजय देवणे यांनीही बामणे यांच्यावर जोरदार हल्ला चढवीत, ‘शिवाजी पुलाची मुदत संपली आहे, याची अधिसूचना तुम्ही त्या ठिकाणी का लावली नाही? अशा शब्दांत समाचार घेतला. पर्यायी शिवाजी पुलाच्या कामासंदर्भात चौकशी समिती नेमावी, अशी मागणीही त्यांनी केली. यावर बामणे यांनी आमच्या विभागाने आवश्यक त्या परवानग्या घेण्यापूर्वीच पर्यायी पुलाचे काम सुरू केल्याचे सांगितले.यावेळी शहरप्रमुख शिवाजी जाधव, दुर्गेश लिंग्रस, सुजित चव्हाण, शशी बिडकर, हर्षल सुर्वे, अवधूत साळोखे, कमलाकर जगदाळे, रणजित आयरेकर, रवींद्र पाटील, अभिजित बुकशेठ, आदी उपस्थित होेते. (प्रतिनिधी)अधीक्षक अभियंता मंगळवारी कोल्हापुरातप्राधिकरणचे कार्यकारी अभियंता बामणे यांच्यावर आमचा विश्वास राहिलेला नाही. त्यामुळे त्यांच्या वरिष्ठांना तुम्ही कोल्हापुरात बोलावून घ्या, असे संजय पवार यांनी साळुंखे यांना सांगितले. त्यावर बामणे यांनी प्राधिकरणचे अधीक्षक अभियंता नेहूडकर यांना फोन लावून तो साळुंखे यांच्याकडे दिला. यावेळी साळुंखे यांनी पवार यांच्याशी त्यांचे बोलणे करून दिले. त्यानुसार मंगळवारी (दि.९) कोल्हापुरात बैठक घेऊ, असे आश्वासन नेहूडकर यांनी पवार यांना दिले.जिल्हाधिकाऱ्यांचा निषेधएका बाजूला अधीक्षक अभियंता साळुंखे ब्रिटिशकालीन सर्व पूल भक्कम असल्याचा दावा करत आहेत, तर दुसऱ्या बाजूला जिल्हाधिकारी अमित सैनी हे मच्छिंद्री झाल्यावर पंचगंगेवरील शिवाजी पूल बंद करणार, असे म्हणत आहेत, यातील कुणाचे बरोबर म्हणायचे, असा सवाल करत पवार व देवणे यांनी ‘शिवाजी पूल मच्छिंदी झाल्यावरच बंद करू’, असे म्हणणाऱ्या जिल्हाधिकाऱ्यांचा निषेध केला.