शहरं
Join us  
Trending Stories
1
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
2
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
3
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
4
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
5
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
6
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
7
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
8
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
9
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
10
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
11
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
12
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
13
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
14
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
15
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
16
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
17
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
18
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
19
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
20
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
Daily Top 2Weekly Top 5

इतर कर्मचारी बोध घेणार का?

By admin | Updated: September 1, 2015 23:44 IST

सिंगतकर लाच प्रकरण : तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांची अडवणूक थांबणार का ?

दत्ता बीडकर - हातकणंगले  सहकारातील वर्ग-१च्या अधिकाऱ्यावर झालेल्या कारवाईने सरकारी कार्यालये हादरली आहेत. कार्यालयात वेळेवर पोहोचणार नाहीत, असे सर्व अधिकारी-कर्मचारी दोन दिवस वेळेत कार्यालयात दाखल झाले आणि आपापल्या कामाच्या निपटाऱ्याला लागल्यामुळे एका सिंगतकरांवरील कारवाईने सरकारी बाबू धास्तावले. मात्र, याचा धडा घेऊन पुन्हा वेळ जाताच ‘मागे तसे पुढे’ याप्रमाणे लहान-लहान कामांसाठी सर्वसामान्यांची अडवणूक करणार का, हे येणारा काळच ठरविणार आहे.हातकणंगले उपनिबंधक सहकारी संस्था कार्यालयावर शनिवारी सायंकाळी ७.३० वा. कोल्हापूर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक उदय आफळे यांनी दिवसभर सापळा लावून दहा हजारांच्या लाचेसाठी उपनिबंधक सुनील सिंगतकर, सहायक अधिकारी संजय थैल आणि खासगी चालक राजेंद्र चव्हाण या तिघांना जेरबंद केले. लाचखोरीच्या ट्रॅपसाठी दिवसभर मेहनत करणाऱ्या अधिकाऱ्यांना रात्री ७.३० वा. यश आले.तालुक्याच्या ठिकाणचे वर्ग-१चे अधिकारी असलेले सुनील सिंगतकर यांच्यावर झालेली वर्ग-१च्या अधिकाऱ्यावरील पहिलीच कारवाई आहे. सिंगतकर यांनी गेली अडीच वर्षे तालुक्याच्या सहकार क्षेत्रात धुमाकूळ घातला होता. कॉँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडी सरकारमधील सहकारमंत्र्यांपासून जिल्ह्यातील आमदार व माजी आमदारांचे अभय असलेल्या सिंगतकरांनी तालुक्यामध्ये मागे वळून पाहिले नाही. सहकाराची पंढरी असलेल्या हातकणंगले तालुक्यातील प्रत्येक संस्थावर अंकुश ठेवण्याच्या प्रयत्नात स्वत:ची पोळी भाजून घेण्यात सिंंगतकर यशस्वी ठरले होते.गावपातळीवरील विकास सोसायट्यांपासून राज्यभर नावलौकिक असलेल्या बॅँकांच्या चेअरमन, व्हा. चेअरमन निवडीपर्यंत सिंगतकर सभेसाठी हजर राहून थेट तीन ते पाच हजारांची वसुली करीत होते. तालुक्यामध्ये असलेल्या ७२ मागासवर्गीय औद्योगिक संस्थांना शासनाने दिलेले भागभांडवल आणि त्यांची वसुली या निमित्ताने सिंगतकर यांनी संस्था चालकांंची मोठी लूट करून स्वत:चे काम फत्ते करून घेतले होते. यंत्रमाग संस्थांनाही शासकीय अनुदान प्राप्त होते. त्याच्या शिफारशीसाठी सिंगतकरांनी दरच ठरविला होता. सिंगतकरांनी इचलकरंजी अर्बन बॅँकेच्या ठेवीधारकांबरोबर कर्जदाराची सेटलमेंट करून परस्पर रकमा हडप केल्या. ‘कर्ज एकाचे, रक्कम दुसऱ्याची आणि फायदा तिसऱ्याचा’, अशी सहकार योजना सिंगतकरांनी अंगीकारली होती. सिंंगतकरांची तालुक्यातील जवळपास वीस संस्थांवर प्रशासक नियुक्ती होती. या संस्थांचा वारेमाप खर्च, वसुलीबाबतची पद्धत आणि संस्था ऊर्जितावस्थेत आणण्यापेक्षा त्या डबघाईला आणण्यासाठी सिंगतकरांचे प्रयत्न मोठे आहेत.तालुक्यात सिंगतकर यांच्यावरील कारवाईने सरकारी बाबू धास्तावले आहेत. सर्वसामान्य गोरगरिबांच्या कामाच्या निपटाऱ्यासाठी ते सकाळपासूनच कामाला लागले. मात्र, ही वेळ आणि कामाची उरक किती दिवस आत्मसात होणार, हे येणारा काळच ठरविणार आहे. अनेक तक्रारीसिंगतकरांच्या मागे-पुढे राजकीय पक्षाचे वलय होते. कॉँग्रेस-राष्ट्रवादी, शिवसेना, भाजप, मनसेचे नेते सिंगतकरांवर होणाऱ्या तक्रारी थोपविण्याचे काम करीत होते. सिंगतकरांवर विभागीय निबंधकापासून सहकार आयुक्तापर्यंत आणि पालकमंत्र्यांपासून मुख्यमंत्र्यांपर्यंत अनेक तक्रारी होत्या. मात्र, सिंगतकर आपला हुकमी एक्का वापरून तक्रारदाराला निष्प्रभ करीत होते.संस्थांवर कारवाई इचलकरंजी येथील एका नेत्याच्या राजाश्रयामुळे इचलकरंजी शहरामध्ये सिंगतकरांची चलती होती. त्याच्या राजेखुशालीने औद्योगिक व यंत्रमाग संस्थांवर कारवाई होत होती. कारवाईचा बडगा उगारून सेटलमेंट राजमान्य होत असल्यामुळे त्या कार्यकर्त्याचा भाव वधारला होता.