शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

वैचारिक दहशतवाद खपवून घेणार नाही : संजीव पुनाळेकर

By admin | Updated: September 24, 2015 01:12 IST

समीर हा ‘सनातन’शी संबंधित आहे, म्हणून त्याला पोलिसांनी बळीचा बकरा बनविले आहे. समीर हा ‘सनातन’चे काम करतो म्हणजे त्यानेच हे कृत्य केले आहे, असे होत नाही.

कोल्हापूर : गोविंदराव पानसरे, डॉ. नरेंद्र दाभोलकर, कलबुर्गी यांच्याप्रमाणेच काही समाजसेवक आणि प्रसारमाध्यमांनी वैचारिक दहशतवाद मांडला. त्यातच समीरसारख्या ‘सनातन’च्या निर्दोष साधकाला बळीचा बकरा बनविण्याचे काम पोलिसांनी केले आहे. एखाद्या निर्दोषाला कायदेशीर मदत म्हणून वकील मिळणे आवश्यक होते. मात्र, कोणताही वकील पुढे न आल्याने आम्ही सर्व एकाच विचारधारेचे वकील असल्याने ३२ जणांची फौज घेऊन आल्याचे संशयित समीर गायकवाडचे वकील संजीव पुनाळेकर यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले. ते कसबा बावडा येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात पानसरे हत्याप्रकरणी संशयितांची बाजू मांडण्यासाठी बुधवारी आले होते. पुनाळेकर म्हणाले, समीर हा ‘सनातन’शी संबंधित आहे, म्हणून त्याला पोलिसांनी बळीचा बकरा बनविले आहे. समीर हा ‘सनातन’चे काम करतो म्हणजे त्यानेच हे कृत्य केले आहे, असे होत नाही. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी समीर कोल्हापुरात नव्हे तर ठाण्यात होता, हे पोलिसांच्या तपासातच पुढे आले आहे. मग तो येथे नव्हताच तर त्याला या प्रकरणात पोलीस का गोवत आहेत, असा सवालही त्यांनी बोलताना केला. एखाद्याची कायदेशीर बाजू मांडण्यासाठी कोणीच पुढे येत नसेल तर त्याला आम्ही बाहेरून कायदेशीर मदत देऊ शकतो. तसेच समीर हा निष्पाप असून त्याला मदत करण्यासाठी मडगाव, कऱ्हाड, बेळगाव, पुणे, सांगली, मुंबई, औरंगाबाद, अहमदनगर, मिरज, अकोला, आदी ठिकाणांहून ३२ वकिलांची फौज आणली. या वकिलांच्या पथकासाठी कोणत्याही प्रकारचे कॅम्पेनिंग केलेले नाही. आमच्याकडे वकीलपत्र असूनही पोलीस समीरला भेटू देत नाहीत. कायद्याने पोलीस कोठडीत असताना त्याला आठवड्यातून किमान दोन वेळेला भेटता येते; तर न्यायालयीन कोठडीत असताना रोज भेटता येते. मग कोल्हापूरचे पोलीस त्याला भेटू देत नव्हते. आम्ही केवळ त्याला १० मिनिटे भेटू शकलो आहोत. पोलिसांनी तो ‘सनातन’चा साधक असल्याने सात दिवसांची कोठडी मागितली होती. मात्र, न्यायालयाने त्याला तीन दिवसांची कोठडी दिली आहे. समीरच्या पाठीशी आमचे ३२ जणांचे पथक राहणार असून संपूर्ण लढा त्याच्या बाजूने देणार आहोत.समीरच्या बाजूने ३२ वकिलांची फौजएखाद्या खटल्यासाठी प्रथमच ३२ वकिलांची फौज संशयित आरोपीच्या बाजूने उभी केली होती. त्यामुळे या सुनावणीसाठी सरकारी वकील चंद्रकांत बुधले व अतिरिक्त जिल्हा पोलीसप्रमुख एस. चैतन्या यांनी संशयितांविरोधात बाजू मांडली, तर संशयितांच्या बाजूने अ‍ॅड. संजीव पुनाळेकर यांनी बाजू मांडली. त्यांना साहाय्य करण्यासाठी सांगली जिल्हा बार असोसिएशनचे उपाध्यक्ष एम. एम. सुहासे, वीरेंद्र इचलकरंजीकर, बाळासाहेब देशपांडे, नीलेश सांगावकर, संदीप आयशिंगेकर, सुरेश कुलकर्णी, अ‍ॅड. देवदास शिंदे यांच्यासह ३२ वकील उपस्थित होते. समीरचे वकीलपत्र न्यायमूर्तींसमोर ठेवले. त्यावेळी त्याच्या बाजूने इचलकरंजीकर यांच्यासह मुंबई, अहमदनगर, सांगली, पुणे, औरंगाबाद, मिरज, अकोला, बेळगाव (कर्नाटक), गोवा येथील ३१ वकिलांच्या सह्या होत्या.