शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

गणेशोत्सवाचा राजकीय अड्डा करणार नाही:सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 19, 2018 00:21 IST

कोल्हापूर : मी सुसंस्कृत आहे; त्यामुळे नाथा गोळे तालमीच्या गणेशोत्सवाचा मी राजकीय अड्डा करणार नाही, असे स्पष्ट करीत आमदार सतेज पाटील यांनी आपण यापुढे ही आचारसंहिता पाळणार असल्याचे सांगून नवा पायंडा पाडला.नाथा गोळे तालमीने गणेशोत्सवानिमित्त उभारलेल्या ‘गोल्डन टेम्पल’चे मंगळवारी रात्री त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष ...

कोल्हापूर : मी सुसंस्कृत आहे; त्यामुळे नाथा गोळे तालमीच्या गणेशोत्सवाचा मी राजकीय अड्डा करणार नाही, असे स्पष्ट करीत आमदार सतेज पाटील यांनी आपण यापुढे ही आचारसंहिता पाळणार असल्याचे सांगून नवा पायंडा पाडला.नाथा गोळे तालमीने गणेशोत्सवानिमित्त उभारलेल्या ‘गोल्डन टेम्पल’चे मंगळवारी रात्री त्यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी उर्वरित वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष योगेश जाधव, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष संजय पवार यांच्यासह मान्यवरांचा सत्कार झाला.शिवाजी चौकातील गणेशोत्सव उद्घाटनावेळी माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी राजकीय टोलेबाजी केल्यानंतर आमदार पाटील नेमके काय प्रत्युत्तर देणार, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र, शिवाजी चौकातील गणपतीसमोरील राजकीय भाषणांविषयी भाविक आणि नागरिकांतून नाराजीचा सूर उमटल्याने पाटील यांनी राजकीय टीकेला फाटा दिला. गेली ४0 वर्षे प्रल्हाद चव्हाण आणि त्यांच्या परिवाराने समाजसेवा केल्यानेच जनतेने त्यांना कायम निवडून दिले आहे, असे पाटील यांनी सांगितले.सचिन चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमाला महापौर शोभा बोंद्रे, उपमहापौर महेश सावंत, परिवहन सभापती राहुल चव्हाण, शिक्षण सभापती अशोक जाधव, राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष आर. के. पोवार, तौफिक मुल्लाणी, शारंगधर देशमुख, माजी महापौर प्रल्हाद चव्हाण, सागर चव्हाण, नगरसेवक जयश्री चव्हाण आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.मीच फार शहाणामहेश जाधव म्हणाले, ‘गेले दोन दिवस व्हॉट्सअ‍ॅपवरून माझ्याबद्दल गैरसमज पसरविले जात आहेत; परंतु मीदेखील खानदानी मराठा असून, शिवाजी पेठेतीलच आहे. त्यामुळे ‘मीच फार शहाणा,’ असे कुणी समजू नये, असा टोला त्यांनी माजी नगरसेवक रवी इंगवले यांचे नाव न घेता लगावला.