शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
2
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
3
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
4
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
5
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
6
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
7
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
8
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
9
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
10
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
11
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
12
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
13
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
14
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
15
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
16
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
17
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
18
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
19
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग

नगराध्यक्ष आरक्षण प्रश्न सुटणार ?

By admin | Updated: September 30, 2016 01:37 IST

जिल्हाधिकारी कार्यालयाकडून संकलन : सध्या असणाऱ्या आरक्षणाची घेतली माहिती

जयसिंगपूर : आगामी नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सध्या नगरपालिकेकडे असलेल्या नगराध्यक्ष आरक्षणाची माहिती बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून मागविली. जिल्ह्यातील सर्वच पालिकांची माहिती मागविण्यात आल्याचे खात्रिलायक वृत्त आहे. त्यामुळे नगराध्यक्ष आरक्षणप्रश्नी भिजत पडलेला प्रश्न लवकरच मार्गी लागण्याची शक्यता आहे. नोव्हेंबर-डिसेंबर २०१६ मध्ये नगरपरिषदांच्या निवडणुका होणार आहेत. सध्या राज्य निवडणूक आयोगाने नगरपरिषदांच्या निवडणुकांसाठी मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर केला आहे. सोमवारी (दि. २६) मतदार याद्या प्रसिद्ध केल्या असून, त्यावर हरकती व सूचना मागविल्या आहेत. १५ आॅक्टोबरला मतदार याद्या अंतिम करून त्या निश्चित करण्यात येणार आहेत. पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग रचना, आरक्षण यापूर्वी जाहीर झाले आहे. दरम्यान, थेट जनतेतून नगराध्यक्ष निवडला जाणार ही घोषणा यापूर्वीच जाहीर झाली होती. मात्र, नगराध्यक्षपदाची निवडणूक जनतेतून अथवा नगरसेवकांतून होणार, हा निर्णय अद्याप प्रलंबित आहे. यामुळे राष्ट्रीय पक्ष व आघाड्यांच्या स्तरावर गोंधळाचे वातावरण आहे. राज्य सरकारने जनतेतून नगराध्यक्ष निवडण्याचे जाहीर केले होते. मात्र, यापूर्वी झालेली आरक्षण सोडत तशीच राहणार की नव्याने आरक्षण सोडत होणार, याबाबत अजूनही संभ्रमावस्था आहे. मतदार याद्या कार्यक्रमाबरोबरच मतदान केंद्र निश्चितीकरण याची घाईगडबड सुरू असतानाच बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयाने सध्या नगरपालिकेकडे नगराध्यक्ष म्हणून कार्यभार असलेल्या आरक्षणाची माहिती तातडीने मागविली असल्याचे वृत्त आहे. मात्र, यापूर्वीच जिल्ह्यातील सर्वच पालिकांनी सध्या असलेल्या आरक्षणाची माहिती दिली होती. एकूणच सध्या पालिकेकडे नगराध्यक्ष असलेल्या आरक्षणाची माहिती पुन्हा मागविल्याने आरक्षणाच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या असल्या, तरी नगराध्यक्षपद आरक्षणाबाबत नेमके काय होणार, याकडेच इच्छुकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)पंचायत समितीच्या १४ जागांसाठी सोडतशिरोळ : फेब्रुवारी २०१७ मध्ये होणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदारसंघ पुनर्रचना कार्यक्रमानंतर आता इच्छुकांचे आरक्षणाकडे लक्ष लागून राहिले आहे. पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी ५ आॅक्टोबरला सोडत पद्धतीने आरक्षण निश्चित करण्यात येणार असून, शिरोळ येथील महसूल भवन कार्यालयात ही सोडत काढण्यात येणार आहे. आगामी पंचायत समिती निवडणुकीसाठी १६ ऐवजी १४ पंचायत समितींचे मतदारसंघ (गण) निश्चित करण्यात आले आहेत. संभाव्य गणाप्रमाणे दानोळी, कोथळी, उदगाव, अर्जुनवाड, गणेशवाडी, आलास, शिरोळ, अकिवाट, नांदणी, यड्राव, शिरढोण, अब्दुललाट, दत्तवाड, टाकळी या चौदा मतदारसंघांचा समावेश आहे. जिल्हा परिषदेचे आठ ऐवजी सात गट निश्चित करण्यात आले आहेत. त्याची आरक्षण सोडत कोल्हापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालयात होणार आहे.