शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: तांत्रिक बिघाड नाही, यावेळी कारण वेगळंच... अहमदाबाद-लंडन विमान उड्डाण रद्द; एअर इंडियाने दिलं स्पष्टीकरण
2
नाशिकमध्ये भाजपाचं 'बळ' वाढलं! सुधाकर बडगुजरांचा पक्षप्रवेश, महापालिका निवडणुआधी बेरजेचं राजकारण
3
इस्त्रायलविरोधात युद्धात उतरणार 'इस्लामिक सैन्य'?; तुर्की, पाकिस्तान, सौदीला इराणचा प्रस्ताव
4
ज्याला घुसखोर म्हणून महाराष्ट्रातून हाकललं, त्याला ममता सरकारने आणखी ४ जणांसह बांगलादेशमधून परत आणलं  
5
शेतीसाठी AI धोरण मंजूर, धारावीकरांसाठी खुशखबर, 'या' लोकांचे मानधन दुप्पट; मंत्रिमंडळ बैठकीत मोठे निर्णय
6
"कुणाशीही संबंध ठेवा पण भाजपशी..."; राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्यावर शरद पवारांचे स्पष्ट मत
7
होम लोनचा EMI भरुन-भरुन थकलायत, ही पद्धत वापरुन पाहा; लवकर संपेल तुमचं कर्ज
8
KEM Hospital: ‘केईएममध्ये नव्हे; तर आवारात पाणी तुंबले’ रुग्णालय प्रशासनाची न्यायालयाला माहिती
9
"कमेंट्समध्ये ट्रोल करतात अन् पर्सनल मेसेजमध्ये लोक...", राजेश्वरी खरातने व्यक्त केला राग
10
विमान अपघातापासून बॉलिवूडच्या सुपरस्टारचा थोडक्यात वाचलेला जीव, काय घडलेलं?
11
भयावह क्षण...! विमान कोसळताच विद्यार्थ्यांनी हॉस्टेलच्या बाल्कनीतून मारल्या उड्या, समोर आला हृदयाचा ठोका चुकवणारा नवा VIDEO
12
वर्ल्ड कप आधी स्मृती मानधनाची मुसंडी! ५ वर्षांनी पुन्हा झाली वनडेची 'क्वीन'
13
एअर इंडिया विमान अपघात: प्रेमानंद महाराजांची मोठी शिकवण; तुम्हालाही ‘ती’ गोष्ट माहिती हवीच!
14
Sonam Raghuvanshi : "लग्नानंतर राजा त्याच्या मित्रांसह..."; सोनम रघुवंशीने रिसेप्शनला नवऱ्याला दिलेलं 'हे' वचन
15
स्वामी विवेकानंदांना महाकालीकडे मागायचे होते एक, पण मागितले भलतेच आणि ते मिळालेसुद्धा!
16
'आमच्या देशाकडे पाहिलं तरी डोळे काढून...’, पाकिस्तानच्या परराष्ट्रमंत्र्यांची इस्राइलला धमकी
17
चीन-अमेरिका 'व्यापार युद्धात' लागली भारताची लॉटरी! आकडे बघून ड्रॅगनची झोप उडेल, लागेल मिरची
18
मारुतीची पहिली e Vitara लाँच झाली! व्हेरिअंटनुसार ३५ लाख ते ४२ लाख किंमत, फिचर्स, रेंज आणि कोण घेणार पहा...
19
इराण-इस्त्रायल युद्धात पाकिस्तानची लुडबुड; शाहबाज शरीफ यांना कशाची वाटतेय भीती?
20
विरार- अलिबाग कॉरिडोरच्या भूसंपादनाला मिळणार गती!

मोदींची सभा होणारच

By admin | Updated: October 1, 2014 01:17 IST

चंद्रकांत पाटील : शनिवारी आयोजन; मान्यवरांची उपस्थिती

कोल्हापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींची येत्या शनिवारी (दि. ४) कोल्हापुरातील तपोवन मैदानावर होणारी जाहीर सभा निश्चित असल्याची माहिती भाजपचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी आज, मंगळवारी दिली.आमदार पाटील म्हणाले, पंतप्रधान मोदी हे सध्या अमेरिका दौऱ्यावर आहेत. अमेरिकेहून ते दिल्ली येथे येतील. त्यानंतर ते कोल्हापूरला सभेसाठी येणार आहेत. तत्पूर्वी ते पंढरपूरला जाऊन विठ्ठलाचे दर्शन घेणार आहेत. कोल्हापुरात आल्यावर सभेपूर्वी ते अंबाबाईचेही दर्शन घेतील. सकाळी १० किंवा दुपारी दोन वाजता सभा होईल. सभेला भाजपचे महाराष्ट्र प्रभारी राजीव प्रताप रुडी, प्रदेशाध्यक्ष आमदार देवेंद्र फडणवीस, विधानसभेचे विरोधी पक्षनेते एकनाथ खडसे, विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते विनोद तावडे, आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. राज्यात २२ ठिकाणी मोदींच्या जाहीर सभा होणार आहेत. एका दिवसात चार याप्रमाणे याचे नियोजन आहे. कोल्हापुरातील सभेनंतर ते बीडला जाणार आहेत.पाटील पुढे म्हणाले, मोदी यांची ही सभा कोल्हापुरातील ऐतिहासिक सभा होणार आहे. यावेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, भाजप महानगर जिल्हाध्यक्ष महेश जाधव, बाबा देसाई, के. एस. चौगुले, अशोक देसाई, अ‍ॅड. संपतराव पवार, भगवान काटे, आदी उपस्थित होते.