शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

‘एमपीएससी’साठी वयोमर्यादा वाढविणार

By admin | Updated: September 13, 2015 00:16 IST

मुख्यमंत्र्यांचे आश्वासन : राजू शेट्टी यांची मागणी; माहिती जमा करण्याचे आदेश

कोल्हापूर : राज्य लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेची वयोमर्यादा वाढविण्याबाबत राज्य शासन नक्की विचार करील, असे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खासदार राजू शेट्टी यांना लेखी पत्राद्वारे दिले आहे. सामान्य प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांना सर्व माहिती जमा करण्याचे आदेश दिले असल्याचे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे. शेट्टी यांनी त्या संदभातील पत्र मुख्यमंत्र्यांना पाठविले होते. सध्या ही परीक्षेसाठी वयोमर्यादा खुल्या गटातील उमेदवारांसाठी ३३ व आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांसाठी ३८ आहे. त्यानुसार खुल्या जागेवरील उमेदवारांची वयोमर्यादा ४० पर्यंत वाढवावी, असे शेट्टी यांचे म्हणणे होते. वयोमर्यादा वाढविण्याच्या या मागणीबद्दल स्पर्धा परीक्षेसंबंधी जाणकार व प्रत्यक्ष उमेदवारांतून मात्र उलटसुलट प्रतिक्रिया उमटत आहेत. साधारणत: कोणताही तरुण वयाच्या २१ व्या वर्षी पदवीधर होतो. त्यास पुढे चार-पाच वर्षे प्रयत्न करून या परीक्षेत उत्तीर्ण होता येते. त्याने पदवीधर झाल्यानंतर वीस वर्षांनंतर नोकरी लागणार असेल तर हा कालावधी खूप मोठा आहे. चाळिसाव्या वर्षी नोकरी लागल्यावर काम समजून घ्यायलाच त्याला चार-पाच वर्षे लागतात. त्यानंतर पंधरा वर्षांत तो निवृत्त होणार असतो. प्रत्यक्ष सेवेचा कालावधी कमी मिळणार असल्याने त्यातून भ्रष्टाचाराची प्रवृत्ती जास्त वाढीस लागेल अशी भीती व्यक्त होत आहे. खुल्या प्रवर्गातील वय ४० केल्यास आरक्षित प्रवर्गाची वयोमर्यादा ४५ होईल. त्यांना तर सेवेची फक्त १५ वर्षेच मिळतील. पोलीस खात्यामध्ये फौजदारास स्वतंत्र पोलीस ठाणे मिळण्यास १५ वर्षे लागतात. याचाही विचार वयोमर्यादा वाढविताना व्हावा. ३३ वय वाढवलेच तर ३५ पर्यंत करता येऊ शकेल. शिवाय जे तरुण या परीक्षेत यशस्वी होतात, ते पहिल्या दोन-तीन प्रयत्नांत होतात आणि जे अनुत्तीर्ण होतात त्यांना वारंवार प्रयत्न करूनही त्यात यश मिळत नाही. त्यामुळे वयोमर्यादा वाढविली म्हणजे तरुणांना त्यामध्ये जास्त संधी मिळेल, ही शक्यताही धूसर असल्याचे जाणकारांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)