शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

‘चिकोत्रा’च्या गेटची त्वरित गळती काढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 13, 2017 23:52 IST

लोकमत न्यूज नेटवर्कपांगिरे : आज, सोमवार दि. १४ पासून यांत्रिकी विभागामार्फत कामास सुरुवात करून येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर काम करून चिकोत्रा धरणाच्या सर्व्हिस गेटला लागलेली गळती थांबविण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत देशमाने यांनी दिले.चिकोत्रा खोºयातील सुमारे ५२ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी वरदायी ठरलेले चिकोत्रा धरण ...

लोकमत न्यूज नेटवर्कपांगिरे : आज, सोमवार दि. १४ पासून यांत्रिकी विभागामार्फत कामास सुरुवात करून येत्या आठ दिवसांत युद्धपातळीवर काम करून चिकोत्रा धरणाच्या सर्व्हिस गेटला लागलेली गळती थांबविण्याचे आश्वासन पाटबंधारे खात्याचे पुणे विभागाचे कार्यकारी अभियंता प्रशांत देशमाने यांनी दिले.चिकोत्रा खोºयातील सुमारे ५२ गावांच्या पिण्याच्या व शेतीच्या पाण्यासाठी वरदायी ठरलेले चिकोत्रा धरण भरण्यासाठी अनेक ठिकाणचे वाया जाणारे पाणी धरणामध्ये वळवून आणण्यासाठी प्रयत्न सुरु असतानाच धरणामध्ये सध्या साठलेले पाणी धरणाच्या सर्व्हिस गेटलाच मोठ्या प्रमाणात गळती लागली असल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून वाया जात असल्याचे 'लोकमत'ने प्रसिद्ध केले होते. याबाबीची गंभीर दखल घेत आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रमुख उपस्थितीत चिकोत्रा धरणस्थळावर गणेश मंदिर येथे बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे हे होते.सुरुवातीस पॉवर हाऊसच्या बाजूला असलेल्या सर्व्हिस गेटच्या ठिकाणी जाऊन गळतीची पाहणी करण्यात आली. यावेळी गळती मोठ्या प्रमाणात असल्याचे निदर्शनास आले.एकीकडे म्हातारीचे पठार तसेच दिंडेवाडी परिसरातील ओढ्याचे वाया जाणारे पाणी चिकोत्रा धरणात वळविण्यासाठी अनेक प्रयत्न सुरु असतानाच धरणाच्या सर्व्हिस गेटला असलेल्या गळतीचे भीषण वास्तव समोर आले आहे. गेली तीन वर्षांपासून धरणाच्या सर्व्हिस गेटलाच गळती सुरु असून ही गळती अद्याप काढण्यास पाटबंधारे विभागास यश आलेले नाही. गेली तीन वर्षांपासून या सर्व्हिस गेटची गळती काढण्याचा प्रयत्न पाटबंधारे विभाग करीत आहे. तसेच सर्व्हिस गेटमधून जे पाणी सध्या बाहेर पडते ते पाणी सिमेंटकाँक्रीटद्वारे बांधण्यात आलेल्या कनॉलमधून पुढे नदीपात्रात जाते. पण सध्या या कनॉलची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झाली असून, हे पाणी नदीपात्रात सरळ वाहून न जाता कनॉलमधून गळतीद्वारे जमिनीत मुरले जात आहे. त्यामुळे कनॉलची गळती काढणे गरजेचे बनले असल्याचे उपतालुकाप्रमुख अशोक पाटील यांनी सांगितले .गेली तीन वर्षांपासून ही गळती सुरू असून पाटबंधारे विभागाने त्याकडे सोयिस्कर दुर्लक्ष केले असल्याचा आरोप करत धरणातील प्रति सेकंदाला १५ लिटर याप्रमाणे दररोज साधारणत: १३ लाख लिटर्स पाणी वाया जात असल्यामुळे सदर गळतीचे काम वेळीच केले नाही, तर धरणात सध्या साठा झालेले पाणी वाहून वाया जाऊन उन्हाळ्यात तीव्र पाणीटंचाईस सामोरे जावे लागणार आहे. तेव्हा पाटबंधारे विभागानेही सर्व्हिस गेटच्या पाणी गळतीची बाब गांभीर्यीने घेऊन तत्काळ उपाययोजना करण्याची मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे यांनी केली.धरणस्थळावर वीज नाही, त्यामुळे सर्वत्र अंधाराचे साम्राज्य असते, धरण सुरक्षिततेच्यादृष्टीने खासगी सुरक्षारक्षक नेमून धरणावर सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत तसेच धरणाच्या पिचिंवरील झाडेझुडपे तोडावीत, अशी सूचना उमेश देसाई यांनी मांडली. तसेच हिरण्यकेशी नदीचे पाणी कनॉल काढून दाभिल-देवकांडगाव-वझरेमार्गे चिकोत्रा धरणात आणल्यास चिकोत्राचा पाणीसाठा वाढण्यास मदत होईल त्यादृष्टीने सर्व्हे झाला असल्याचे गणपतराव शेटके यांनी निदर्शनास आणून दिले .यावेळी बोलताना आमदार प्रकाश अबिटकर म्हणाले, पाटबंधारे विभागाच्या यांत्रिकी विभागाने कोणत्याही परिस्थितीत सर्व्हिस गेटच्या गळतीचे काम आठ दिवसांत पूर्ण करणे गरजेचे आहे या बैठकीस शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख संभाजी भोकरे, भिकाजी हळ्दकर, अशोक पाटील, महादेव परीट, गोविंद सुर्वे, सदाशिव पाडेकर, दत्तात्रय परीट, निवृत्ती भाटले, राजेंद्र भारमल, तानाजी पाटील, राजाराम भराडे, मारुती भराडे, बाळासो पाटील, शिवराम खवरे, मारुती पाटील, शिवाजी पाटील, सागर मिसाळ, जोतिराम कांबळे, नारायण शेवाळे, आनंदा तिप्पे, केरबा घुरे, आनंदा भाईंगड,े बाळासो चव्हाण, सुधीर शिंदे, सागर गुरव उपस्थित होते. आभार विद्याधर परीट यांनी मानले.पुणे यांत्रिकी विभागाची टीम काम करणारसर्व्हिस गेटची गळती काढण्यासाठी पाटबंधारे खात्याची पुणे यांत्रिकी विभागाची टीम काम करणार आहे. ही गळती काढण्यासाठी गेट बाहेर काढावे लागणार आहे. सर्व्हिस गेट व इमर्जन्सी गेट उघडून हे काम करण्यास आठ दिवसाचा कालावधी लागणार आहे. यावेळी ८० टक्के गळती काढण्यात यश येईल. उर्वरित गळती काढण्याचे काम १५ नोव्हेंबरनंतर पाण्याचे रोटेशन सुरु झाल्यानंतर मेन गेटवर काढूनच करावे लागणार असल्याचे पुणे विभागाचे अभियंता प्रशांत देशमाने यांनी यावेळी सांगितले.