शहरं
Join us  
Trending Stories
1
Waves Summit 2025 मध्ये मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत ८००० कोटींचे सामंजस्य करार
2
'पहलगाम हल्ल्याबाबत सरकारचे धोरण स्पष्ट नाही', मल्लिकार्जुन खरगेंचा केंद्रावर निशाणा
3
जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
4
भरधाव कंटेनरने दोन कारला उडविले; पुण्यातील तीन भाविकांचा मृत्यू
5
हिंदू म्हणून गोळ्या झाडल्या, शुद्ध आल्यावर शेजारी मृतदेह पाहिले; सुबोध पाटलांचा थरारक अनुभव
6
श्रीनगरमधील दल सरोवरात वेगवान वाऱ्यांमुळे बोट उलटली, पर्यटकांकडून मदतीसाठी आरडाओरडा
7
उल्हासनगरात बांगलादेशी नागरिक सापडण्याचे सत्र सुरूच, तीन दिवसात ९ बांगलादेशी नागरिकांना अटक 
8
नॅशनल हेराल्ड प्रकरण; राहुल आणि सोनिया गांधींच्या अडचणी वाढल्या, कोर्टाने बजावली नोटीस
9
शिखर धवनने दिली प्रेमाची कबुली..!! कोण आहे Sophie Shine? पहिली भेट कशी झाली?
10
एजाज खानचा 'हाऊस अरेस्ट' शो बंद होणार? महिला आयोगाचं थेट पोलीस महासंचालकांना पत्र
11
“भावाला न्याय मिळत नाही तोपर्यंत चप्पल घालणार नाही”; संतोष देशमुख यांच्या बहिणीचा निर्धार
12
लग्न ठरलं, साखरपुडा झाला, शरीरसंबंधही ठेवले, त्यानंतर... मुंबई इंडियन्सकडून खेळलेल्या खेळाडूवर गंभीर आरोप  
13
पहलगाममधील हल्ल्याचं निमित्त, पूजा करायची असल्याचे सांगून पुजाऱ्याला गंडा, बँक खातं केलं साफ     
14
“जातनिहाय जनगणनेचा मुद्दाही सुप्रीम कोर्टात जाईल, १० वर्षे तरी...”; वकिलांनी कायदाच सांगितला
15
OLA Electric ची डोकेदुखी वाढली, इनसाइडर ट्रेडिंग प्रकरणी SEBI कडून तपास; प्रकरण काय?
16
"मी माझ्या पत्नीवर खरं प्रेम केलं होतं पण तिने..."; तरुणाने Video बनवून स्वत:वर झाडली गोळी
17
"अनेकांची झोप उडवेल आजचा कार्यक्रम, जेथे मेसेज जायला हवा होता, तेथे पोहोचला"; नेमकं काय म्हणाले पीएम मोदी
18
भारतातील या मुख्यमंत्र्यांनी भारत-पाकिस्तान युद्धावेळी चालवलं होतं विमान, सैनिकांना पोहोचवलं होतं श्रीनगरला
19
भारतीयांवर लक्ष्मी प्रसन्न! लोकांनी तीन वर्षात 'यु ट्यूब'वरून कमावले तब्बल 21000 कोटी
20
एजाज खान अडचणीत, महिला आयोगाची कारवाई; ULLU ने 'हाउस अरेस्ट'चे सर्व एपिसोड हटवले

कारखान्याकडून पहिला हप्ता वेळेत मिळणार का ?

By admin | Updated: November 11, 2016 23:47 IST

शेतकऱ्यांमध्ये संभ्रम : एफआरपी अधिक एकशे पंचाहत्तरची अपेक्षा

आयुब मुल्ला -- खोची--जिल्ह्यात सध्या साखर कारखाने सुरळीतपणे सुरू झाले आहेत. काही कारखान्यांची यंत्रणा अद्याप म्हणावी तितकी सक्षम झालेली नाही. शेतकरी मात्र ऊस घालविण्यासाठी प्रयत्न करीत आहे, पण त्यांच्या मनात खरंच ठरलेल्या फॉर्म्युल्यानुसार उसाचा पहिला हप्ता मिळणार का? असा संभ्रम आहे. एफआरपी अधिक एकशे पंचाहत्तर असेच मिळणे गरजेचे आहे, पण तसे झाले तरच बरे होईल, अन्यथा गतवर्षीसारखे वेटिंग होणार काय, असेही बोलले जात आहे.जिल्ह्यात एकूण बावीस साखर कारखाने आहेत. यातील प्रत्येक कारखान्याची एफआरपी वेगळी आहे. त्यामुळे ज्या त्या कारखान्याचा दर वेगळा राहणार आहे. किमान तो उच्चांकी म्हणजे तीन हजार रुपयांच्या आसपास जाईल. परंतु शेतकऱ्यांच्यामध्ये एफआरपीवरून संभ्रम निर्माण होत चालला आहे. खरंच नेमकी एफआरपी किती, ती पंधरा दिवसांत मिळणार का? सोबत असणारी १७५ रुपयांची अधिक होणारी बेरीज यांचा एकत्रित भरणा प्रतिटनाप्रमाणे बँकेत होणार का? असे प्रश्न घोंगावत चालले आहेत.एकीकडे प्रश्नांचं ओझं डोक्यावर असताना ऊस मात्र घालविणे त्यांना क्रमप्राप्त झाले आहे. त्यामुळे संभ्रमात ऊस घालविण्याचा प्रयत्न शेतकरी करू लागला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पहिली उचल ३२०० रुपये मिळाली पाहिजे, अशी मागणी ऊस परिषदेत केली. त्यानंतर तोडग्यासाठी बैठका सुरू झाल्या. इतर संघटनांनी ३५०० रुपये उचलीची मागणी केली. दोन आठवड्यापूर्वी झालेल्या तीन बैठकांतून अखेर एफआरपी अधिक १७५ असा पहिल्या उचलीचा निर्णय झाला.पाच तारखेला बहुतांश कारखाने सुरू झाले. तत्पूर्वी वारणा, डॉ. डी. वाय. पाटील कारखाने सुरूच झाले होते. तोडग्यानंतर प्रत्येक कारखान्याची फॉर्म्युल्यानुसार किती उचल मिळणार याची चर्चा सुरू झाली. त्यानुसार भरून-ओतून हातात किती राहणार खर्चाच्या तुलनेत याचा हिशेब सुरु झाला. पण दराच्या बाबतीत यावेळी फारसे ताणाताणीचे वातावरण झाले नाही. परंतु तोडगा लवकर निघाला हे मात्र महत्त्वाचे वाटले. कारण उसाचे क्षेत्र घटलेले आहे. जिल्ह्यात सुमारे १५५ लाख टन उसाचे गाळप होईल, असा अंदाज आहे. सांगली जिल्हा याबाबतीत मागे राहील. म्हणजे ५५ लाख टनापर्यंत गाळप होईल.कारखाना व त्यांची एफआरपी अशी कारखान्याचे नावदेय एफआरपीकुंभी-कासारी, कुडित्रे२६०१भोगावती२५५२जवाहर, हुपरी२५४९छ. शाहू, कागल२४९८शरद, नरंदे२४८५दत्त, शिरोळ२५३७डॉ. डी. वाय. पाटील, ग. बावडा२४१४वारणा साखर कारखाना२३८२दूधगंगा वेदगंगा, बिद्री२६९९राजाराम साखर, बावडा२४१०मंडलिक, हमीदवाडा२५९०संताजी घोरपडे, हमीदवाडा२४७२गुरुदत्त, टाकळीवाडी२८३२पंचगंगा, इचलकरंजी२४२४आजरा, गवसे२५०९दालमिया, आसुर्ले पोर्ले२६४६उदयसिंहराव गायकवाड, सोनवडे२५०१इको केन शुगर२४७६हेमरस, चंदगड२६४१महाडिक शुगर, फराळे२४५०