शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

‘दौलत’ आतातरी सुरू होणार का ?

By admin | Updated: October 29, 2014 00:16 IST

कामगार पगाराच्या प्रतीक्षेत : शेतकरी, कामगारांची त्यागाची भूमिका

नंदकुमार ढेरे -चंदगड गेली चार वर्षे बंद अवस्थेत असलेला दौलत शेतकरी सहकारी कारखाना या हंगामात तरी सुरू होणार का? याबाबत कोणीही अधिकृत दुजोरा देण्यास तयार नाही. गेली चार वर्षे या तारखेला, त्या तारखेला पगार देतो, अशी कामगारांची फसवणूक झाल्याने त्यांचाही या तारखांवरील विश्वास उडाला आहे. विधानसभेच्या पार्श्वभूमीवर माजी आमदार नरसिंगराव पाटील व ‘दौलत’चे ज्येष्ठ संचालक यांच्यात झालेली दिलजमाई यामुळे दौलत सुरू होण्याबाबतच्या आशा पल्लवीत झाल्या होत्या. मात्र, या निवडणुकीत नरसिंगराव पाटील यांचा झालेला पराभव व ठरलेल्या तारखेला कामगारांचा न झालेला पगार यामुळे दौलत सुरू होण्याच्या आशा पुन्हा धुसर झाल्या आहेत.दौलत कारखाना बंद झाल्यामुळे शेतकरी, कामगार यांची काय अवस्था झाली आहे, हे सर्वांना ज्ञात आहे. दौलतवर अनेक वर्षे तालुक्याचे राजकारण खेळले गेले. हेही सर्वांना ज्ञात आहे. दौलतचा वापर कशा-कशाला केला हे तालुक्यातील जनतेने पाहिले. दौलतवर अनेक स्थित्यंतरे झाली. २००१ मध्ये दौलतचे तत्कालीन अध्यक्ष नरसिंगराव पाटील यांचे मेहुणे दौलतचे कार्यकारी संचालक गोपाळराव पाटील यांनी बंड करत दौलतची सत्ता हस्तगत केली होती. हा जरी इतिहास असला तरी या सत्तासंघर्षात दौलतचा बळी गेला असून, याची फळे मात्र शेतकरी व कामगारांना भोगावी लागत आहेत.अनेक अडचणींवर मात करून विद्यमान संचालक मंडळ दौलत सुरू करतील, या आशेपोटी कामगारांनी गेले ४५ महिने दौलतची राखण केली. उपाशीपोटी कारखान्याचा सांभाळ केला. कारखाना सुरू करण्यासाठी अनेक कंपन्या आल्या, पण सकारात्मक चर्चा न झाल्यामुळे म्हणा किंवा दौलतवर झालेले अवाढव्य कर्ज यामुळे कंपन्याही धजावत नसाव्यात. तालुक्याची अस्मिता व आर्थिक केंद्रबिंंदू असलेला दौलत सुरू व्हावा, ही जनतेची इच्छा आहे.दौलतसाठी शेतकरी, कामगार यांनी आजपर्यंत त्यागाची भूमिका घेतली आहे. ते यापुढेही घेतील पण खरा प्रश्न आहे तो दौलतवरील कर्जाचा. दिवसेंदिवस कर्जाचा डोंगर वाढत जात आहे. शासनदरबारी प्रयत्न करून या कर्जावरील व्याज तरी थांबवून घेतले पाहिजे. विद्यमान संचालक मंडळाने मरगळ झटकून यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अन्यथा दौलतचा लिलाव एक दिवस ठरलेला आहे. त्यावेळी तालुक्यातील शेतकरी, कामकरी जनता व कामगार या विद्यमान संचालक मंडळाला कधीच माफ करणार नाही.‘दौलत’साठी तालुक्यातून निधी जमवावा !बंद अवस्थेत असलेला दौलत कारखाना सुरू करण्यासाठी विद्यमान संचालक मंडळासह गोपाळराव पाटील, नरसिंगराव पाटील, भरमूअण्णा पाटील, संभाजीराव देसाई, प्रभाकर खांडेकर, मोहन कांबळे, सुरेशराव चव्हाण-पाटील यांच्यासह दौलतच्या माजी संचालकांनी दानशूर व्यक्ती, सेवाभावी संस्था यांनी निधी जमविल्यास दौलत सुरू होऊ शकतो. मात्र, विद्यमान संचालक मंडळाने राजीनामे देऊन दौलत जनतेच्या हाती सोपवायला हवा...तर ‘दौलत’चा लिलाव अटळ४भौगोलिकदृष्ट्या आशिया खंडात परिपूर्ण असलेला दौलत कारखाना ३ हंगाम बंद आहे. सहकाराच्या नियमानुसार ३ वर्षे बंद असलेली सहकारी संस्था आजारी म्हणून घोषित करून ती अवसायनात काढली जाते किंवा त्याचा लिलाव केला जातो. ४राजकारणात व सहकारात कधीही काहीही होऊ शकते. दौलतची वाटचाल ही त्याच दिशेने सुरू असल्याचे सहकारातील जानकारांचे मत आहे. त्यामुळे भविष्यात दौलतचा लिलाव होऊन तो दौलतशी संबंधित व्यक्तीनीच घेतल्यास नवल वाटायला नको ! हे टाळायचे असेल, तर तालुक्यातील जनतेने उठाव करणे गरजेचे आहे. अन्यथा दौलतचा लिलाव अटळ आहे.