शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
2
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
3
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
4
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
5
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
6
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
7
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
8
काश्मीरच्या बडगाममध्ये CRPF च्या वाहनाचा अपघात; अनेक जवान जखमी
9
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी
10
"महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाच्या समस्या सोडवण्यासाठी सर्वतोपरी मदत करणार’’, अजित पवार यांचं आश्वासन
11
पहलगाम हल्ल्यानंतर घेतलेल्या भूमिकेवरून काँग्रेसनं मोदींना घेरलं, हे चार प्रश्न उपस्थित करून केली कोंडी
12
रेल्वे कर्मचाऱ्यांनी निवृत्त सहकाऱ्याला दिला 'असा' निरोप; ये- जा करणारे बघतंच राहिले!
13
INDW vs RSAW : प्रतिकाच्या विक्रमी खेळीनंतर स्नेह राणाचा 'पंजा'; टीम इंडियाचा सलग दुसरा विजय
14
बाबूरावला कंटाळले परेश रावल, म्हणाले- "हेरा फेरी म्हणजे गळ्याला लागलेला फास..."
15
१८ वर्षांची तरुणी पडली ५५ वर्षीय व्यक्तीच्या प्रेमात, पुढं घडलं भयंकर, ऐकून पायाखालची जमीन सरकेल
16
गुगलचे सीईओ सुंदर पिचाई यांचा पगार किती? कंपनीने फक्त सुरक्षेवरच खर्च केले ७१ कोटी रुपये
17
बंगळुरूत 'पाकिस्तान जिंदाबाद' म्हणणाऱ्या व्यक्तीला बेदम मारहाण, जागीच मृत्यू; गृहमंत्री म्हणाले...
18
झिपलाईन ऑपरेटर अल्लाहू अकबर का म्हणत होता? पीडीपी, नॅशनल कॉन्फरन्सच्या नेत्यांचा वेगळाच दावा...
19
तणावपूर्ण परिस्थितीदरम्यान पाकिस्तानकडून सायबर ‘वार’, भारतीय लष्कराची वेबसाईट हॅक करण्याचा प्रयत्न 
20
१ लाखांपेक्षा अधिक गुंतवणूकदार कंगाल झाले; ९२% आपटला हा शेअर, आता विकणंही झालं कठीण

‘दौलत’ पुन्हा न्यायालयीन कचाट्यात अडकणार ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2017 00:46 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबत ‘न्यूट्रीयन्टस’शी झालेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या सभेत झाल्याने नवीन वादास तोंड फुटणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडून पाच वर्षांनंतर कारखान्याचे धुराडे पेटले होते. बॅँकेने करार मोडल्यास कंपनी न्यायालयात जाणार आणि पुन्हा पेच तयार होणार हे ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : हलकर्णी (ता. चंदगड) येथील दौलत साखर कारखाना चालविण्यास देण्याबाबत ‘न्यूट्रीयन्टस’शी झालेला करार रद्द करण्याचा ठराव जिल्हा बँकेच्या सभेत झाल्याने नवीन वादास तोंड फुटणार आहे. न्यायालयीन प्रक्रियेतून बाहेर पडून पाच वर्षांनंतर कारखान्याचे धुराडे पेटले होते. बॅँकेने करार मोडल्यास कंपनी न्यायालयात जाणार आणि पुन्हा पेच तयार होणार हे निश्चित आहेजिल्हा बँकेवर प्रशासक येण्यात ‘दत्त-आसुर्ले’ आणि ‘दौलत’ साखर कारखान्यांचा हातभार लागला. ‘दत्त’ कारखाना १०८ कोटींना विक्री करून जिल्हा बँकेने आपल्याभोवती लागलेल्या फासाची पहिली दोरी काढून टाकली; पण ‘दौलत’ने बँकेला चांगलेच झुंजविले. विकत घेण्यास सोडाच, पण चालविण्यासाठी कोणीही ताकदीने पुढे येत नव्हते. कारखान्याकडील ६८ कोटींच्या येण्यामुळे बॅँक अडचणीत आली होती. कोणत्याही परिस्थितीत कारखान्याचा निर्णय घेणे बँक प्रशासनाला गरजेचे होते, त्यानुसार तब्बल दहावेळा विक्री व भाडेतत्त्वाच्या निविदा बँकेने प्रसिद्ध केल्या; पण अपेक्षित प्रतिसाद मिळाला नव्हता. अखेर न्यूट्रीयन्टस फु्रट कंपनी (गोकाक) यांनी भाडेतत्त्वावर कारखाना चालविण्यास घेतला. मार्च २०१७ अखेर ३४ कोटी भरून उर्वरित रक्कम पाच वर्षे समान हप्त्यात द्यायचे, या बदल्यात ४५ वर्षांच्या दीर्घ मुदतीने चालविण्यासाठी द्यायचा, असा करार कंपनी व जिल्हा बँक यांच्यात झाला. त्यानंतर ‘न्यूट्रीयन्टस’ने सन २०१६-१७ चा हंगाम घेतला. या हंगामात शेतकºयांनी पाठविलेल्या उसाचे पैसे वेळेत देता आले नाहीत, कर्मचाºयांची देणी व त्यानंतर झालेली साखर चोरी यामुळे कंपनीची बदनामी झाली. साखर चोरीनंतर कंपनीशी केलेला करार रद्द करण्याच्या हालचाली गतिमान झाल्या; पण कायदेशीर बाबींचा अभ्यास करता करार मोडणे अडचणीचे ठरणार आहे. शेतकरी, कामगारांची देणी, साखर चोरी व बॅँकेशी झालेला करार या दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. त्यामुळे सर्वसाधारण सभेतील ठरावानुसार बॅँकेने करार रद्द करण्याचा निर्णय घेतला तर कंपनी न्यायालयात जाणार हे निश्चित आहे.यापूर्वी तासगावकर शुगर्सने कारखाना भाडेतत्त्वावर घेतला होता, त्यात थिटे पेपर्स आल्याने तो गुंता सोडविताना जिल्हा बॅँकेची दमछाक झाली. आता नव्याने गुंता तयार झाला तर कारखान्याचा येणारा हंगामही अडचणीत येऊ शकतो.जिल्हा बँकेची भूमिका महत्त्वाचीसर्वसाधारण सभेत जरी ठराव झाला तरी सर्व कायदेशीर बाबींची तपासणी करून निर्णय घेण्याची जबाबदारी बॅँकेची आहे. ‘न्यूट्रीयन्टस’कडून ३४ कोटी वसुली झाल्यानेच बॅँक संचित तोट्यातून बाहेर आली. त्यामुळे बॅँक आक्रमक भूमिका घेण्याची शक्यता फारच कमी आहे.