शहरं
Join us  
Trending Stories
1
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
2
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
3
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
4
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
5
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
6
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
7
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
8
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
9
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
10
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
11
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
12
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
13
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
14
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
15
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
16
‘इराण होर्मुझमध्ये टोल घेणार असेल तर भारतानेही ‘या’ ठिकाणाहून टोल वसूल करावा’, प्रसिद्ध बँकरचा सल्ला   
17
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
18
ही ५ कारणं ज्यामुळे अमेरिका आणि इराणमधील युद्धविराम तुटणार, तिसरा मुद्दा ठरणार कळीचा
19
विमान प्रवास करताय? चुकूनही घालू नका 'काळे मोजे'; ठरू शकतात धोकादायक, असं आहे कारण
20
Vastu Tips: सावधान! पूर्वजांचे फोटो 'या' दिशेला असतील तर घरात टिकणार नाही पैसा; वेळीच बदल करा!
Daily Top 2Weekly Top 5

मूर्तिदान करणाऱ्या मंडळांचा होणार गौरव

By admin | Updated: August 30, 2016 00:57 IST

महापालिकेचा निर्णय : आयुक्तांचा आढावा; दहा फुटांवरील गणेशमूर्तींचे विसर्जन इराणी खणीत करण्याचे आवाहन

कोल्हापूर : यंदाचा गणेशोत्सव पर्यावरणपूरक साजरा करणाऱ्या मंडळांसह इराणी खणीमध्ये गणेशमूर्र्ती विसर्जित करणाऱ्या मंडळांना व गणेशमूर्ती दान करणाऱ्या मंडळांना महापालिकेकडून इराणी खणीजवळ सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्याचा निर्णय सोमवारी झालेल्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मनपा आयुक्त पी. शिवशंकर होते. सोमवारपासून सुरू होणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव नियोजनाबाबत आयुक्त शिवशंकर यांनी आयुक्त कार्यालय पोलिस विभाग व महापालिकेच्या अधिकाऱ्यांची संयुक्त बैठक घेतली. बैठकीमध्ये गणेशोत्सवामध्ये विविध विभागांकडून करण्यात येणाऱ्या कामकाजाचा आढावा घेण्यात आला.महापालिकेकडून गणेशमूर्ती विसर्जनासाठी मंडप, काहिली, विद्युत व्यवस्था, अग्निशमन व वैद्यकीय व्यवस्था, ट्रॉली जादा संख्येने उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. शिवाय मंडळांनी यंदा दहा फुटांवरील गणेशमूर्तीचे विसर्जन पंचगंगा नदीमध्ये न करता इराणी खणीमध्ये करण्यात यावे, यासाठी आवाहन करण्यात आले. ध्वनिप्रदूषण मोजण्यासाठी महापालिकेतर्फे तीन मशिन्स पोलिसांना देण्यात येणार आहे. मिरवणूक मार्ग व मुख्य चौकात सीसीटीव्ही कॅमेरे बसविलेले आहेत. आणखीन आवश्यकता असल्यास कॅमेरे वाढविण्यात येतील. सार्वजनिक मंडळांना परवानगी देताना रस्ता संपूर्ण बंदिस्त न करता अ‍ॅब्युलन्स आणि फायर फायटर गाडी जाईल याची दक्षता घेणेबाबत मंडळांना सूचना करा. यासाठी वॉर्ड आॅफिस व पोलिस विभाग यांनी संयुक्त फिरती करून याची अंमलबजावणी करावी. ही कारवाई गणेश चतुर्थीपूर्र्वी करण्यात यावी, अशा सूचना आयुक्त शिवशंकर यांनी केल्या. उत्सवाच्या काळात महापालिकेच्या दवाखान्यात अत्यावश्यक सेवा सुसज्ज ठेवण्यात याव्यात. तांबट कमान ते इराणी खण येथील रस्त्याचे काम सुरू आहे ते अनंत चतुर्दशीपूर्वी पूर्ण करावे, विसर्जन मिरवणुकीवर स्वागत मंडप उभारण्यास जागा निश्चित करताना प्रथम राष्ट्रीय पक्षांना व नंतर इतर पक्षांना ड्रॉद्वारे वितरीत करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी दिल्या. यावेळी अतिरिक्त आयुक्त श्रीधर पाटणकर, पोलिस उपाधीक्षक भारतकुमार राणे, उपायुक्त ज्ञानेश्वर ढेरे, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, कार्यकारी अभियंता प्रवीण जाधव, तहसीलदार उत्तम दिघे, पोलिस निरीक्षक अमृत देशमुख, तानाजी सावंत, अनिल देशमुख, सहाय्यक पोलिस निरीक्षक सुशांत चव्हाण, वाहतूक पोलिस निरीक्षक अशोक धुमाळ, उपशहर अभियंता एस. के. माने, रमेश मस्कर, हर्षजित घाटगे, एन. एस. पाटील, पर्यावरण अभियंता आर. के. पाटील, मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, मुख्य आरोग्य निरीक्षक विजय पाटील, इस्टेट आॅफिसर प्रमोद बराले, अतिक्रमण प्रमुख पंडित पवार आदी उपस्थित होते. (प्रतिनिधी)मंडळांकडून बक्षिसाची रक्कम स्मशानभूमीस दानपोलिस दलाकडून गणेशोत्सव २०१५ च्या गणराया अवॉर्ड स्पर्धेच्या बक्षीस वितरण समारंभात मिळालेली रोख रक्कम कोल्हापुरातील चार मंडळांनी महानगरपालिकेच्या स्मशानभूमीस दान केली. रक्कम थोडीच असली तरी या चार मंडळांनी एक चांगला आदर्श समाजाला घालून दिला. त्याबद्दल आयुक्त पी. शिवशंकर यांनी या मंडळांच्या कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले.केशवराव भोसले नाट्यगृह येथे नुकताच गणराया अवॉर्ड स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ पार पडला. यामध्ये विजेत्या सार्वजनिक मंडळांना पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र व रोख रक्कम वितरित करण्यात आले. विजेत्या चार मंडळांनी बक्षिसाची रक्कम सहा हजार रुपये आयुक्त पी. शिवशंकर यांच्याकडे स्मशानभूमीसाठी सुपूर्द केली.सबा बावडा मेन रोड येथील छत्रपती शिवाजीराजे तरुण मंडळ (प्रथम क्रमांक - रु. २०००), व्यापारी पेठ येथील शाहूपुरी युवक मित्रमंडळ (द्वितीय क्रमांक - रु. १५००), माळ गल्ली कसबा बावडा येथील जयभवानी तालीम मंडळ (द्वितीय क्रमांक - रु. १५००) व शाहूपुरी चौथी गल्ली येथील पाच बंगला मित्रमंडळ (तृतीय क्रमांक - रु. १०००) यांनी रक्कम दान केली. रक्कम किती आहे, यापेक्षा कशा प्रकारे मदत करू शकतो, हेच या मंडळांनी दाखवून दिले. म्हणून मंडळांचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आयुक्तांनी अभिनंदन केले.