शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

संजय मंडलिक यांच्या राजकारणाची दिशा ठरणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2016 00:36 IST

पुतळा अनावरणाचे निमित्त : राजकीय नेत्यांची आज मांदियाळी; मंडलिक गटाची ताकद दाखविण्याचा प्रयत्न होणार

कोल्हापूर : हमीदवाडा (ता. कागल) येथे लोकनेते माजी खासदार सदाशिवराव मंडलिक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे अनावरण व प्रेरणा स्थळाचे उद्घाटन आज, शनिवारी सकाळी अकरा वाजता कारखाना कार्यस्थळावर होत आहे. या समारंभास शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह अन्य पक्षाचे मान्यवर नेते उपस्थित राहणार आहेत. प्रा. संजय मंडलिक यांची लोकसभा निवडणुकीची राजकीय दिशा काय राहील यासंबंधीची पायाभरणीही यानिमित्ताने होत आहे.या कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही निमंत्रित केले होते. पवार यांनी तर स्वत:हून या कार्यक्रमास येण्याची तयारी दर्शविली होती. त्यामुळे हा कार्यक्रम सर्वपक्षीय करण्याचा संजय मंडलिक यांचा प्रयत्न होता; परंतु मुख्यमंत्री व पवार यांची वेळ न मिळाल्याने अन्य मान्यवरांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम होत आहे. संजय मंडलिक हे सध्या शिवसेनेचे सहसंपर्क नेते असले तरी त्यांना राष्ट्रवादीत घेऊन लोकसभेची उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या समारंभास खासदार राजू शेट्टी, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील व राष्ट्रवादीचे नेते आमदार हसन मुश्रीफ हे प्रथमच एका व्यासपीठावर येत आहेत. या तिघांतही गेल्या काही दिवसांत परस्परांवर जोरात चिखलफेक सुरू आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना भाजपच्या महायुतीचा घटक असूनही शेट्टी काँग्रेसवाल्यांपेक्षा जास्त जळजळीत टीका भाजप व पालकमंत्र्यांवर करीत आहेत. तीच स्थिती शिवसेना व भाजप यांच्यातील संबंधाचीही आहे. गुरुवारी झालेल्या मेळाव्यात मुश्रीफ यांनी माजी आमदार संजय घाटगे यांच्यावरही टीका केली आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर हा समारंभ होत आहे. त्यामुळे पुतळा अनावरणप्रसंगी राजकारणाचे धुमारेही पेटण्याची शक्यता आहे. या समारंभानिमित्त गटाची ताकद दाखविण्याचाही मंडलिक गटाचा प्रयत्न आहे. (प्रतिनिधी)