शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
लाखोंच्या गर्दीत हरवलेला 'मुन्ना' काही मिनिटांत 'अण्णा'च्या गळ्यात; बापलेकांची भावनिक भेट
3
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
4
नवी मुंबई विमानतळाला दि.बा.पाटील यांचेच नाव लागणार; CM फडणवीसांचे कृती समितीला आश्वासन
5
ट्रॅक्टरमध्ये बसून थेट बांधावर... सोलापूरच्या अधिकाऱ्यांची तत्परता, शेतकऱ्यांना दिला धीर
6
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
7
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
8
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
9
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
10
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
11
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
12
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
13
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
14
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
15
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
16
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
17
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
18
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
19
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
20
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!

वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’वर राबविणार

By admin | Updated: March 12, 2016 01:06 IST

महापालिकेचे ११५८ कोटींचे अंदाजपत्रक ‘स्थायी’ला सादर

कोल्हापूर : मर्यादित आर्थिक उत्पन्न लक्षात घेऊन नवीन योजनांच्या फंदात न पडता सध्या अपूर्ण असलेल्या सर्वच प्रकल्पांच्या कामांना गती देणारे सन २०१६-२०१७ चे अंदाजपत्रक महानगरपालिका प्रशासनाने शुक्रवारी स्थायी समितीसमोर मांडले. पुढील आर्थिक वर्षात कोल्हापूर शहर वायफाय सिटी प्रकल्प ‘बीओटी’ तत्त्वावर कार्यान्वित करण्याचा निर्धार प्रशासनाने केला आहे; तर रंकाळा, क ळंबा तलाव, सार्वजनिक उद्याने, पर्यावरण संवर्धनास अंदाजपत्रकात प्राधान्य दिले आहे. विशेष म्हणजे यंदाच्या अंदाजपत्रकात कोणतीही करवाढ सुचविण्यात आलेली नाही. कोल्हापूर महानगरपालिकेचे सन २०१६-२०१७ सालाचे महसुली, भांडवली व विशेष प्रकल्प मिळून ११५८ कोटी ४६ लाख १९ हजार ५५६ रुपयांचे नवीन अंदाजपत्रक आयुक्त पी. शिवशंकर यांनी स्थायी समितीसमोर मांडले. उत्पन्नाचे मर्यादित स्रोत, आस्थापनांवरील वाढता खर्च यांचा ताळमेळ घालताना मेटाकुटीस आलेल्या प्रशासनाने नवीन अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात उत्पन्न वाढविण्यावर जोर दिला आहे. त्यामुळे एलबीटी, नगररचना, घरफाळा, आदी विभागांकडून पुढील वर्षात किमान ५८ ते ६० कोटींचे जादा उत्पन्न मिळेल, असा दावा प्रशासनाने केला आहे. शिवाय खर्चात काटकसर करण्याचाही निर्धार केला आहे. त्याचाच एक भाग म्हणून संपूर्ण शहरातील पथदिव्यांसाठी एलईडी बल्ब बसविण्यात येणार आहेत. यामुळे आठ कोटींचे वीज बिल चार कोटींपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. शहरात सुरू असलेली काळम्मावाडी थेट पाईपलाईन, सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प, सेफ सिटी योजना, तीर्थक्षेत्र विकास प्रकल्प, घनकचरा व्यवस्थापन अशा महत्त्वाच्या प्रकल्पांना गती देऊन नवीन वर्षात ते पूर्ण करण्याचा संकल्प प्रशासनाने केला आहे. पर्यावरण संवर्धनाच्या कामास भांडवली खर्चाच्या २५ टक्के म्हणजे तब्बल ११९ कोटी रुपयांची तरतूद अंदापत्रकात करण्यात आलेली आहे. शिवाय ४०० कोटींच्या भुयारी गटार योजना व जुन्या जलवाहिन्या बदलण्याचे प्रस्ताव राज्य तसेच केंद्र सरकारकडे पाठविण्यात आले असून ते मंजूर करून आणण्याचा प्रशासनाचा प्रयत्न राहणार आहे. (प्रतिनिधी) रंकाळा, क ळंबा तलाव, सार्वजनिक उद्याने, पर्यावरण संवर्धनास प्राधान्यशहरातील पथदिव्यांसाठी एलईडी बल्ब बसविणार