शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
3
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
4
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
5
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
6
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
7
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
8
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
9
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
10
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
11
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
12
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
13
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
14
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
15
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
16
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
17
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
18
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
19
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
20
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

रेल्वेने ठोकरल्याने पत्नी ठार, पती गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 00:53 IST

जयसिंगपूर : रेल्वेमार्ग ओलांडत असताना मोटारसायकलला रेल्वेची धडक बसल्याने दानोळी (ता. शिरोळ) येथील महिला जागीच ठार झाली, तर तिचा ...

जयसिंगपूर : रेल्वेमार्ग ओलांडत असताना मोटारसायकलला रेल्वेची धडक बसल्याने दानोळी (ता. शिरोळ) येथील महिला जागीच ठार झाली, तर तिचा पती गंभीर जखमी झाला. निमशिरगाव (ता. शिरोळ) येथे रविवारी रात्री साडेसातच्या सुमारास ही घटना घडली. सविता शीतल पाटील-पाराज (वय २८) असे मृत महिलेचे नाव आहे, तर शीतल सुरगोंडा पाटील-पाराज (३५) असे जखमीचे नाव आहे. त्यांच्यावर सांगलीतील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सुदैवाने या अपघातात पती-पत्नीसोबत असणारी लहान मुलगी बाजूला उभी असल्याने बचावली.निमशिरगाव येथील भाच्याचे मंगळवारी लग्न असल्याने सविता पाटील, शीतल पाटील व त्यांची लहान मुलगी असे तिघेजण दानोळीहून मोटारसायकलीवरून निघाले होते. निमशिरगाव येथील चवगोंडा मळ्याजवळ रेल्वे फाटक बंद असल्याने फाटकापासून बाजूला असणाऱ्या काही अंतरावरून रेल्वे रूळ ओलांडायचा निर्णय त्यांनी घेतला. सुरुवातीला सविता व त्यांच्या मुलीने हातातील साहित्य रेल्वेमार्गाच्या पलीकडे नेऊन ठेवले. मुलगी त्याच ठिकाणी उभी होती, तर शीतल हे मोटारसायकल चालवत रेल्वे रूळ ओलांडत होते.यावेळी पत्नी सविता हिने पाठीमागून मोटारसायकल पकडली होती. या दरम्यान कोल्हापूरहून मिरजकडे पॅसेंजर रेल्वे निघाली होती. काही समजण्याअगोदरच रेल्वेची धडक बसल्याने सविता या रुळाच्या बाजूला फरफटत जाऊन पडल्या व जागीच ठार झाल्या, तर शीतल हे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर सांगली येथील शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनास्थळी नातेवाइकांसह बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. जयसिंगपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनानंतर मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देण्यात आला. घटनास्थळी जयसिंगपूर पोलिसांनी पाहणी केली. मात्र, रेल्वेच्या हद्दीत अपघात झाला असल्याने रेल्वे पोलिसांकडून रात्री उशिरापर्यंत पंचनामा करण्याचे काम सुरू होते.