लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : पोलिसांत तक्रार दिली म्हणून पत्नी व मुलाला लोखंडी पाईपने बेदम मारहाण करण्याचा प्रकार कळंबा कारागृहासमोरील शिवाजीनगरात घडला. याप्रकरणी पती अमर शरद केसरकर (वय ३२ रा. शिवाजीनगर, कळंबा कारागृहासमोर) याच्यावर जुना राजवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला आहे. पत्नी पोलीस ठाण्यात तक्रार देऊन घरी परतल्यानंतर त्याने रागातच पत्नी अमृता व मुलगा नितीन या दोघांना मारहाण केली होती. ही घटना मंगळवारी घडली.
आठ फलकांची चोरी
कोल्हापूर : येथील मंगळवार पेठेतील मंडलिक वसाहतमधील महालक्ष्मी फॅब्रिकेटस या कारखान्याबाहेर तयार करून ठेवलेले ४ बाय ३ लांबी रुंदीचे लोखंडी फलक अज्ञाताने चोरून नेले. याबाबत सुमारे २० हजाराचे एकूण आठ फलक अज्ञाताने चोरल्याची तक्रार सचिन मारुती नारायणकर (रा. जवाहनरगर) यांनी जुना राजवाडा पोलीस ठाण्यात दिली.