शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
2
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
3
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
4
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला! ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार!
5
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
6
अमेरिका-इराणमध्ये युद्धविरामाची घोषणा; जगभरातील देशांनी काय म्हटले? पाकिस्तानच्या भूमिकेची चर्चा
7
स्मरण दिन २०२६: ७ दिवस ३ उपाय, ‘ही’ सेवा सुरक्षा कवच ठरेल; स्वामी कृपेचा अद्भूत अनुभव येईल!
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १० एप्रिल रोजी खुला होणार; १२.२५% पर्यंत परताव्याचा दावा
9
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
10
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
11
School bus Accident: काळजाचा ठोका चुकवणारा अपघात; ३५ विद्यार्थ्यांसह शालेय बस खड्ड्यात उलटली!
12
७ मिनिटांच्या बैठकीत निवडणूक आयुक्त म्हणाले, Get Lost...; डेरेक ओ ब्रायन यांचा गंभीर आरोप
13
नवऱ्याचे ९ महिलांसोबत संबंध, १४ वर्षांचा संसार मोडला; प्रसिद्ध अभिनेत्रीचा खुलासा, एकटीने करतेय मुलाचा सांभाळ
14
आसाराम बापूच्या मुलाचा घटस्फोट, पत्नीला द्यावी लागणार कोट्यवधी रुपयांची पोटगी, कोर्टाचे आदेश
15
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
16
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
17
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
18
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
19
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
20
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
Daily Top 2Weekly Top 5

महापालिकेचे रस्ते खराब का झाले?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2016 01:03 IST

अवस्था दयनीय : अधिकारी-ठेकेदार ‘मिलीभगत’ पुन्हा ऐरणीवर, कारवाई होणार की पाठीशी घालणार?

भारत चव्हाण --कोल्हापूरशहरातील एखाद्या रस्त्याचे काम मिळाले की किमान तीन वर्षे तो खराब होणार नाही, इतका दर्जेदार आणि टिकाऊ रस्ता करण्याची जबाबदारी ठेकेदाराची असते. काम सुरू झाले की रस्त्यासाठीचे डांबर, खडी यांचे मिश्रण प्रमाणात आहे की नाही, वापरण्यात येणारी सामग्री उच्च प्रतीची आहे की नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असते. दोघांनी अत्यंत चोख भूमिका पार पाडली तर रस्ते चांगले, टिकाऊ होतील; पण दोघेही भ्रष्ट ठरले तर काय होते, हे आता शहरातील रस्त्यांच्या झालेल्या दयनीय अवस्थेवरून स्पष्ट झाले आहे. शहरात चार दिवसच पाऊस झाला आणि या पावसाने ठेकेदार, अधिकारी यांच्यातील भ्रष्ट साखळीचा पर्दाफाश करून टाकला. खराब रस्त्यांवर चर्चा सुरू आहे. जबाबदारी कोणी घ्यायची आणि कोणावर टाकायची, हा कळीचा मुद्दा बनला आहे. जबाबदारी केवळ ठेकेदारांवरच टाकायची म्हटले तर अधिकारी काय करीत होते, असा प्रश्न निर्माण होतो. ठेकेदार मूळ एस्टिमेटच्या पन्नास-पंचावन्न टक्केच रक्कम खर्च करीत असेल तर अधिकाऱ्यांनी चुप्पी का बाळगली, असाही प्रश्न उपस्थित होतो.रस्ते खराब झाले याला लोकप्रतिनिधी किती जबाबदार आहेत, असा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ‘नगरसेवकांनीच मलिदा खाल्ला आणि आज रस्त्यांची दुर्दशा झाली,’ असा शहरवासीयांचा समज होणे स्वाभाविक आहे; परंतु रस्त्याचे एस्टिमेट करण्यापासून ठेकेदाराचे अंतिम बिल अदा करण्यापर्यंतची सर्व कामे अधिकाऱ्यांच्याच हातात असतात. नगरसेवक फक्त स्थायी समितीमध्ये निविदा मंजूर करतात, तीसुद्धा अधिकाऱ्यांनी केलेल्या शिफारशीनुसार! अमुक एका ठेकेदाराची निविदा ‘कमीत कमी दरा’ची असून त्यांचीच निविदा मंजूर व्हावी, अशीही शिफारस प्रशासनाकडून केली जाते. त्यावर स्थायी समिती मंजुरीची मोहर उठविते. मग खराब रस्त्यांची जबाबदारी नगरसेवकांवरच का टाकली जाते? आणि हे सगळे करणारे अधिकारी नामानिराळे का राहतात? हा प्रश्न कोणाला पडत नाही. कामे निकृष्ट झाली तर त्याचा जाब अधिकाऱ्यांना विचारण्याची आवश्यकता आहे. +ठरावीक ठेकेदारांची मक्तेदारीशहरातील कोणते काम कोणाला द्यायचे याचा निर्णय निविदा प्रक्रियेपूर्वीच होतो. त्यामुळे महानगरपालिकेत ठरावीक ठेकेदारांची मक्तेदारी निर्माण झालेली आहे. काही कामांत एकच ठेकेदार तीन वेगवेगळ्या फर्मच्या नावे निविदा भरतात. एक निविदा मंजूर केली जाते. अधिकाऱ्यांना हे ठाऊक असतानाही, ते डोळेझाक करतात. ठरावीक मुदतीत काम पूर्ण झाले नाही तर त्याला दंड करायचा किंवा नाही, हे अधिकारीच ठरवितात. जास्तच आरडाओरड झाली तरच दंड होतो, अन्यथा नाही. काम वेळेत पूर्ण झाले नाही आणि कामाचे बिल वाढले तर ते देण्यास अधिकारी आग्रही असतात. यापूर्वी अशा अनेक कामांत एस्टिमेट रक्कम वाढवून दिली आहे. ठेकेदारांशी मिलीभगतकेलेल्या एस्टिमेटपेक्षा कमी दराने काम कसे काय केले जाऊ शकते, असा प्रश्न अधिकाऱ्यांना कधीच पडत नाही, तो पडणारही नाही; कारण त्यांची ठेकेदारांशी मिलीभगत असते. तसा आरोप महासभेतही झाला आहे. एखाद्या कामाची सगळी प्रक्रिया पार पाडण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांची असताना ते निष्क्रिय असतात. कमी दरात काम घेतल्यानंंतर दर्जा तपासण्याची जबाबदारी असतानाही अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करतात. हा सगळा मामला दोघांच्या ‘मिलीभगत’शी जोडला गेला आहे.एस्टिमेट कशी चुकतात? महानगरपालिकेच्या अभियंत्यांनी एखादा रस्ता करताना त्याचा खर्च किती येऊ शकतो याचा नेमका अंदाज बांधून त्याचा आराखडा तयार करणे याला ‘एस्टिमेट’ म्हणतात. अधिकारी रस्त्याची मापे घेऊन रस्त्यासाठी खडी, डांबर किती लागणार यावर खर्चाचे एस्टिमेट करतो. जर अभियंते फूटपट्टी लावून एस्टिमेट बनवत असतील तर ठेकेदार निविदा भरताना १५ ते २५ टक्के कमी दराने ती का भरतात, याचा संशय कोणालाच येत नाही. कायद्यावर बोट ठेवून ‘ज्याची कमी दराची निविदा, त्यालाच काम’ या निकषावर ठेकेदाराला काम मिळते. मग या ठिकाणी ठेकेदाराचे व्यावसायिक गणित बरोबर म्हणायचे की महापालिकेच्या अभियंत्यांनी केलेली एस्टिमेटस चुकीची?लुटणारी नवीन जमात!गेल्या काही वर्षांपासून महापालिकेत पैसा लुटणारी ‘सल्लागार’ नावाची नवीन जमात निर्माण केली आहे. कोणत्याही कामात सल्लागार नेमण्याची पद्धत रूढ झाली आहे. महापालिकेकडे तंत्रज्ञ, अभियंते असताना सल्लागार नेमले जातात. दोन टक्के त्यांची फी असते. कोटीच्या कामात दोन लाख रुपये फी होते. ठेकेदारांशी सलगी असलेले हे सल्लागार महापालिकेपेक्षा ठेकेदाराच्याच घरचे पाणी भरत राहतात. त्यातून नुकसान महापालिकेचे होते. नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी ते पार पाडत नाहीत. अधिकारी, ठेकेदार, सल्लागार हे मिळून कामे कशी करायची, हे ठरवितात. पन्नास टक्केच रक्कम खर्चमहापालिकेत सगळीच कामे टक्केवारीवर होतात. ठेकेदार एखादे काम १५ ते २५ टक्के कमी दराने घेतो. निविदा मंजुरीवेळी दोन ते पाच टक्के मोजतो. अधिकारी तसेच विविध करांसाठी ठेकेदारास १४ ते १५ टक्के खर्च करावे लागतात. टक्केवारीतच रक्कम खर्च होत असल्यामुळे ठेकेदार रस्त्यांवर ५० ते ५५ टक्केच रक्कम खर्च करतो. यामुळे रस्ते खराब होतात. जनतेच्या करांचा पैसा असा खर्च होत असेल तर जबाबदार कोण? नगरसेवक महिन्याला ७५०० रुपये मानधन घेतात, तर अधिकारी ६० ते ६५ हजार रुपये पगार घेतात. मग जबाबदारी अधिकाऱ्यांवरच येते.