शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
2
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
3
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
4
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
5
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
6
शालेय सहलींनी भरली एसटीची तिजोरी, मिळाले तब्बल १२७ कोटी रुपयांचे उत्पन्न
7
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
8
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खोळतात? असं आहे यामागचं गुपित
9
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
10
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
11
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
12
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
13
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
14
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
15
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
16
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
17
VIRAL : लेकाच्या कष्टाचे फळ! मुलगा घरी घेऊन आला पहिला फ्रीज; आईच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून व्हाल भावुक 
18
Video - संतापजनक! फक्त एक पेरू तोडला म्हणून ४ वर्षांच्या मुलीला दोरीने बांधून बेदम मारहाण
19
भिवंडीत तरुणाचा मृत्यू झाल्यानंतर विशेष सुरक्षा; भाड्यात दरवर्षी १० टक्के वाढ
20
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
Daily Top 2Weekly Top 5

एलबीटीची वसुली कमी का? शासनाकडून विचारणा : कारणे दाखवा

By admin | Updated: May 14, 2014 00:09 IST

सांगली : महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी वसुली का कमी झाली आहे?, अशी विचारणा

सांगली : महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू होऊन वर्षाचा कालावधी लोटला तरी वसुली का कमी झाली आहे?, अशी विचारणा नगरविकास खात्याकडून आज, मंगळवारी करण्यात आली. नगरविकासच्या कक्ष अधिकार्‍यांनी महापालिका आयुक्तांना तातडीने कमी वसुलीच्या कारणांची माहिती पाठविण्याचे आदेश दिले आहेत. महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू होऊन एक वर्षाचा कालावधी झाला. जकात असताना पालिकेचे उत्पन्न १०५ कोटीच्या घरात होते. एलबीटी लागू झाल्यानंतर दरमहा उत्पन्नात मोठी घसरण झाली. पहिल्या चार महिन्यात कर्मचार्‍यांच्या पगाराइतकेही उत्पन्न मिळाले नाही. त्यासाठी महापालिकेच्या ठेवीही मोडाव्या लागल्या होत्या. महापालिका निवडणुकीनंतर मात्र प्रशासनाने एलबीटी वसुलीबाबत कडक भूमिका घेतली. व्यापार्‍यांना नोटिसा बजावून नोंदणीस प्रवृत्त केले. पालिका हद्दीत एलबीटीअंतर्गत सुमारे साडेतेरा हजार व्यापारी येतात. त्यापैकी ८ हजार ७०० व्यापार्‍यांनी नोंदणी केली आहे. मात्र प्रत्यक्षात १८०० ते २००० व्यापारी दरमहा कर भरत आहेत. उर्वरित व्यापार्‍यांना नोटिसा बजाविण्याची कार्यवाही सुरू आहे. अशातच नोंदणी न केलेल्यांवर पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. वारंवार नोटिसा बजावूनही सुनावणीला गैरहजर राहणार्‍या आणि नोंदणी न करणार्‍या १७० व्यापार्‍यांना गत आठवड्यातच मालमत्ता जप्तीची नोटीस बजाविण्यात आली आहे. एलबीटीला महापालिका हद्दीतील व्यापार्‍यांनी विरोध केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी एलबीटीचा फेरविचार करण्याचे आश्वासन दिल्याने व्यापार्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. त्यातच आज नगरविकास खात्याने महापालिकेच्या एलबीटीचे उत्पन्न का घटले, याच्या कारणांची माहिती मागविली आहे. तसे पत्रही आयुक्त अजिज कारचे यांना पाठविण्यात आले आहे. व्यापार्‍यांचा विरोध हेच प्रमुख कारण वसुली कमी होण्यामागे असल्याचे बोलले जात आहे. (प्रतिनिधी)