शहरं
Join us  
Trending Stories
1
IND W vs PAK W "म्हारी छोरियां छोरो से कम है के.." हरमनप्रीत ब्रिगेडनंही पाकची जिरवली!
2
'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
3
मुंबईतील राजकीय नेत्याच्या मुलाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार, शौचालयात गाठले आणि...
4
गाझातील सत्ता सोडण्यास नकार दिल्यास हमासची धुळधाण उडवू, डोनाल्ट ट्रम्प यांची ताकिद 
5
नेपाळमध्ये हाहाकार... मुसळधार पावसाचा कहर! आतापर्यंत 51 जणांचा मृत्यू; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केलं दुःख, म्हणाले - भारत...!
6
Muneeba Ali Controversial Run Out : हुज्जत घालून पाक क्रिकेटच्या इज्जतीचा फालुदा; असं काय घडलं?
7
हिमालयात दार्जिलिंगपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत विध्वंस, ६० हून अधिक मृत्यू, कारण काय?
8
IND vs AUS : ३०० पारच्या लढाईत अभिषेक-तिलकनं तलवार केली म्यान; वादळी शतकासह प्रभसिमरन सिंगची हवा
9
'जेव्हा शिंदे CM आणि फडणवीस DCM होते तेव्हा...!', अमित शाह यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
10
प्रवाशांनी भरलेली विरार ते पालघर रो-रो बोट जेट्टीवर अडकली; हायड्रॉलिक पाईप तुटल्याने मनस्ताप
11
"काटा मारुन पैसे जमा करता आणि..."; पूरग्रस्तांसाठी मदत न देण्यावरुन CM फडणवीसांचा साखर कारखान्यांना इशारा
12
’अमित शाह महाराष्ट्रात आले पण नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत देण्याबाबत शब्दही बोलले नाहीत’, काँग्रेसची टीका   
13
Irani Cup 2025: नागपूरच्या मैदानात फुल्ल राडा! यश धुलला तंबूत धाडल्यावर ठाकूर त्याच्या अंगावर धावला (VIDEO)
14
ऑटो कंपनीची 'कमाल', गुंतवणूकदारांना केलं मालामाल...! 1 वर्षात पैसा डबल; सोमवारी दिसणार चमत्कार?
15
जळालेल्या चार्जरमुळे सापडला दहशतवाद्यांना मदत करणारा युसूफ; पहलगाम हल्ल्याआधी चारवेळा भेटला
16
जीवघेण्या कफ सिरपचा कहर सुरूच, मध्य प्रदेशात आणखी २ मुलांचा मृत्यू, आतापर्यंत १६ जणांचा गेला बळी
17
IND vs PAK: टॉस वेळी पाकिस्तानी कॅप्टनची चिटिंग? ते हरमनप्रीतलाही नाही कळलं (VIDEO)
18
एक फोन कॉल अन्...! मामे भावाच्या प्रेमात 'पागल' झाली पत्नी, 'लव्ह अफेअरचा चक्कर'मध्ये पतीची निर्घृन हत्या केली! 
19
सयाजी शिंदेंचा मोठा निर्णय, 'सखाराम बाईंडर'च्या १० प्रयोगांचे मानधन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार
20
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत

...मग शेतकऱ्यांना हमीभाव का नाही ?

By admin | Updated: March 7, 2016 01:32 IST

नानांचा सरकारला सवाल : केशवराव भोसले नाट्यगृह, खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन

कोल्हापूर : हमीभाव नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत येत आहे. शासन कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग देत आहे त्याबद्दल दु:ख नाही; परंतु शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव का देत नाही, असा सवाल प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी रविवारी केला. सर्वच पक्षांतील राजकारण्यांनी विश्वासार्हता गमाविल्यामुळे शेतकऱ्यांच्या मदतीसाठी कार्यरत असलेल्या नाम फौंडेशनला सामान्य माणूसही आर्थिक मदत करीत आहे, असेही त्यांनी राजकीय नेत्यांच्या तोंडासमोर स्पष्ट केले. येथील संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृह, शाहू खासबाग कुस्ती मैदानाचे उद्घाटन पाटेकर यांच्या हस्ते झाले. त्यानंतर नाट्यगृहात झालेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. आपल्या ‘खास शैली’त त्यांनी राजकारण्यांचा समाचार घेत अंतर्मुख करण्यास भाग पाडले. पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील अध्यक्षस्थानी होते. आमदार सतेज पाटील, आमदार हसन मुश्रीफ, राजेश क्षीरसागर, महापौर अश्विनी रामाणे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. अभिनेते पाटेकर म्हणाले, पेन, पाण्याची बाटली अशा सर्वच वस्तूंचे दर ठरलेले आहेत; पण शेतकऱ्यांच्या मालाचा भाव निश्चित नाही. परिणामी तो आर्थिक अडचणीत येतो आहे. आपल्या आई-वडिलांच्या आजारपणातील औषधोपचाराचा खर्च तो करू शकत नाही. मुलांच्या अपेक्षा पूर्ण करण्यात त्याला अपयश येते. त्यामुळेच शेतकरी आत्महत्या करीत आहे. आई, वडील, दोन लेकरांना मागे सोडून तो गळफास घेतो. बळिराजाला एकाकी वाटत आहे. तो निराश झाला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांनी संप केल्यानंतर शासनाचे अडते.त्यामुळे तेथे शासन झुकते. शेतकऱ्याने आत्महत्या केल्यानंतर कोणाचेही अडत नाही. त्यामुळे वर्षानुवर्ष दुर्लक्ष झाले आहे. बैलाच्या गळ्यातील दोरी राज्यकर्त्यांच्या गळफासासाठी वापरण्याची वेळ शेतकऱ्यांवर आणू नये. वीज, पाणी सर्व शेतकऱ्यांना देण्याची माफक अपेक्षा राज्यकर्त्यांनी पूर्ण करावी. अडचणीतील शेतकऱ्यांना दिलासा आणि संघर्ष करत जगण्याची उमेद देण्यासाठी नाम फौंडेशन कार्यरत आहे. मी कोणत्याही पक्षाचा नाही, जे दिसतंय ते बोलतो. शरद पवार जवळचे मित्र आहेत. बाळासाहेब ठाकरे वडिलांच्या स्थानी आहेत. मात्र, कधी हात पसरला नाही. हात पसरले की किमतीचे लेबल लागते अन् मैत्री संपते.एकेकाळी भाकरीचा तुकडा केशवराव भोसले नाट्यगृहाने दिला आहे; पण आता पहिल्यानंतर हेच केशवराव भोसले नाट्यगृह का असा प्रश्न पडावा, अशी नूतनीकरण करून रूप पालटले आहे. शासनाच्या निधीतून नूतनीकरण झालेले नाट्यगृह सुस्थितीमध्ये ठेवण्यासाठी पुढची जबाबदारी प्रेक्षकांची आहे. माझं म्हणून नाट्यगृहाची जपणूक करणे गरजेचे आहे. न ऐकल्यास पान, तंबाखू खाऊन नाट्यगृहात थुंकणाऱ्यांच्या कानपटीतही लावा. नेमकेपणाने कुठे हात उचलावे, हे कोल्हापूरकरांना माहीत आहे. पालकमंत्री पाटील म्हणाले, नाट्यगृहासाठीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी शासन निधी देईल. सुर्वेनगर, कळंबा परिसरातील उपनगरांत महापालिकेने दुसरे नाट्यगृह बांधण्याचे नियोजन करावे. आमदार पाटील म्हणाले, येत्या अधिवेशनात सर्व आमदारांनी आपले एक महिन्याचे मानधन नाम फौंडेशनला द्यावे. त्यासाठी पालकमंत्री पाटील यांनी पुढाकार घ्यावा. केशवराव भोसले नाट्यगृहाच्या नूतनीकरणाच्या दुसऱ्या टप्प्यातील कामांसाठी शासनाकडून निधी मिळण्यासाठी पालकमंत्र्यांनी पाठपुरावा करावा. आमदार हसन मुश्रीफ म्हणाले, रामनवमीदिवशी माझा वाढदिवस असतो. यंदाच्या वाढदिवसादिवशी ११ लाखांचा निधी नाम फौंडेशनला देणार आहे. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज म्हणाले, संगीत नाटकांची परंपरा जपण्यासाठी त्या नाट्यनिर्मात्यांना विशेष अनुदान द्यावे.आमदार राजेश क्षीरसागर, अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई यांची भाषणे झाली. शाहीर आझाद नाईकवडी यांनी पोवाडा सादर केला. संगीतसूर्य केशवराव भोसले यांचे वंशज व नातू सुरेश शिंदे आदींचा सत्कार झाला. आदिल फरास यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी यांच्यासह नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते. शुभदा हिरेमठ यांनी सूत्रसंचालन केले. निमंत्रण पत्रिकेत नाव असूनही खासदार धनंजय महाडिक, आमदार अमल महाडिक गैरहजर राहिले.शेणही... मेथी म्हणून सांगण्याची वेळआमच्या नटाचं बरं असते. सर्व काही खुलेपणाने बोलता येते. चुकला असेल तर त्याचवेळी झोडता येते. राजकारण्याचं तसे नसते, त्यांना पक्षाची आचारसंहिता पाळावी लागते. आपल्याच पक्षातील एखाद्याने ‘शेण’ खाल्ल्यानंतर तर पक्षाची बदनामी झाली म्हणून मनात खूप राग, चीड असते. मात्र, पक्षाच्या बंधनामुळे ‘शेणही मेथीची भाजी होती,’ असे सांगावे लागते, असा उपरोधिक टोला पाटेकरांनी राजकारण्यांना लगावताच प्रेक्षकांतून दाद मिळाली. भाषणात त्यांनी ‘टू बी आॅर नॉट टूबी’ असे अनेक डायलॉग त्यांनी सादर केले.खणखणीत आवाज पाहिजे महापौर अश्विनी रामाणे यांनी सरकारकडून विकासकामांसाठी निधीची मागणी केली. त्या भाषण वाचून दाखविताना अडखळत होत्या. घाबरत बोलत असल्याचे जाणवत होते. हे निदर्शनास आल्यानंतर भाषण संपताच रामाणे यांना व्यासपीठावर खणखणीत आवाजात भाषण करायचे घाबरायचे नाही, असे नानांनी सांगितले. त्यांनी आपल्या जाहीर भाषणांतही हा सल्ला रामाणेंना दिला. आमचं वाटोळे होते..सरकार कोणाचे असो, पहाट आमची होवो, अशी जनतेची अपेक्षा असते. त्यामुळे निवडणुका झाल्यानंतर सर्व पक्षांच्या नेत्यांची ‘तोंडे’ एकाच बाजूला असावीत, अन्यथा आमचे वाटोळे होते, असे सर्व पक्षांच्या नेत्यांकडे पाहत पाटेकर यांनी टोला लगावताच प्रचंड हशा पिकला. ते म्हणाले, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी शेतकऱ्यांसाठी पॅकेज दिले, पण ते तळागाळापर्यंत पोहोचले नाही. आत्महत्या षंढाचे लक्षण..पाटेकर म्हणाले, अनेक संघर्ष करीत मी इथंपर्यंत पोहोचलो आहे. अनेकवेळा फुटपाथवर झोपलोही. दहा-पंधरा रुपयांत दिवस काढले. त्यामुळे शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता अडचणींना सामारे जावे. आत्महत्या करणे हे षंडपणाचे लक्षण आहे म्हणून अडचणीतील शेतकऱ्यांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याचे काम नाम फौंडेशन करीत आहे.कधी-कधी चांगली कामेआमदार सतेज पाटील यांना उद्घाटनाच्या कार्यक्रमास अभिनेते नाना पाटेकर यांना आणून चांगले काम केले आहे.‘बंटी कधी-कधी चांगली कामे करतो’ असे आमदार हसन मुश्रीफ यांनी टोला लगावता हशा पिकला.माईकमध्ये बिघाड..अगदी नाना पाटेकर नाट्यगृहात आगमनाच्या अगोदरपर्यंत माईक टेस्टिंग सुरूच होते तर नाना बोलण्यास उभे राहिल्यानंतरही माईक बंद पडला आणि पुन्हा सुरूही झाला. त्याची चर्चाही उपस्थितांमध्ये जोरदारपणे सुरू होती.