शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक पन्हाळगडाची आर्त हाक कोण ऐकणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 30, 2021 04:24 IST

कोल्हापूर : पौराणिक परंपरा असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रथम ब्रिटिशांनी आणि नंतर राज्यकर्त्यांनी विकास केला. आज ...

कोल्हापूर : पौराणिक परंपरा असलेल्या ऐतिहासिक पन्हाळगडाचा थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रथम ब्रिटिशांनी आणि नंतर राज्यकर्त्यांनी विकास केला. आज तोच विकास पन्हाळकरांच्या मुळावर उठला आहे. ३६१ वर्षांपूर्वीच्या पावसाळ्यात पाहिलेला वेढा आजही पन्हाळकर वेगळ्या स्वरूपात अनुभवत आहेत. त्यावेळी सिद्दी जौहरचा, तर आज निसर्गाचा वेढा पन्हाळ्याभोवती पडला आहे.

पन्हाळ्यावर येणारा एकमेव वाहतुकीचा रस्ता २३ जुलै रोजी खचला आणि पन्हाळ्यावरील नागरिकांचीही सक्तीने नजरकैद झाली. सिद्दी जौहरचा वेढा २ मार्च १६६० रोजी पडला, तो शिवाजी महाराजांनी १२ जुलै १६६० रोजी तोडला; परंतु गेल्या वर्षी एप्रिल महिन्यापासून कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे पन्हाळ्यावर पर्यटक न आल्याने, तत्पूर्वी २०१९ मध्ये पन्हाळगडाला जोडणारा रस्ता खचल्यामुळे या निसर्गाच्या वेढ्यात अडकलेल्या रहिवाशांची सुटका कोण करणार? मधल्या पाच महिन्यांचा कालावधी सोडला तर गेली तीन वर्षे पन्हाळकर या वेढ्यात अडकून पडलेले आहेत. पर्यटकांवर अवलंबून असलेला येथील रहिवासी पुन्हा उपासमारीच्या विळख्यात सापडला आहे.

पन्हाळ्याच्या चारी बाजूंनी गेल्या काही वर्षांपासून मोठ्या प्रमाणात भूस्खलन होते आहे. पन्हाळगडावर येण्यासाठी जे तीन प्रमुख मार्ग आहेत, त्यांतील आज जो रस्ता खचला, तो ऐतिहासिक चार दरवाजा ब्रिटिशांनीच १८१८ मध्ये पाडला. तीन दरवाजा येथून मोठा उतार असल्यामुळे तेथील रस्ता वाहतुकीसाठी बंद केला होता; परंतु आता आणीबाणी म्हणून मिनी व्हॅनच्या माध्यमातून तेथून वाहतूक सुरू केली आहे.

तिसरा मार्ग हा ऐतिहासिक वाघ दरवाजा येथून जातो; परंतु तबक उद्यानामुळे तेथून केवळ चालतच जाता येते. त्यामुळे खऱ्या अर्थाने पन्हाळावासीय नजरकैदेत आहेत.

सन २०११ च्या गणनेनुसार पन्हाळ्याची लोकसंख्या ३०२१ इतकी आहे. गडावरील तीन दरवाजा, तबक वन उद्यान, अंबरखाना, याशिवाय मध्यवर्ती बसस्थानक परिसरातील छोटे हॉटेल व्यावसायिक, झुणका-भाकरी विकून गुजराण करणाऱ्या छोट्या व्यावसायिकांना नातेवाइकांकडून पैसे आणून जगावे लागले. पर्यटकांवर अवलंबून असणारे छोटे भेळचिरमुऱ्यांचे गाडे, आइस्क्रीम विक्रेते, मिनी ट्रेन चालविणारे, घोड्यावरून पन्हाळादर्शन घडविणारे, रिक्षा व्यावसायिक, पन्हाळ्याचा ऐतिहासिक वारसा शब्दांतून मांडणारे वाटाडे या साऱ्यांची रोजीरोटी बंद पडली आहे.