शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

उदगावातील अपघाताचे नियंत्रण राखणार कोण?

By admin | Updated: March 3, 2017 23:03 IST

पोलिस व ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष : वारंवार अपघाताच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

संतोष बामणे --जयसिंगपूर --सांगली-कोल्हापूर महामार्गावरील उदगाव येथील अवजड व बेकायदेशीर वाहनांच्या वाहतुकीमुळे नागरिकांची मोठी डोकेदुखी वाढली आहे. सांगली-कोल्हापूर महामार्गाला पर्यायी मार्ग असतानाही जयसिंगपूर शहरातून होत असलेल्या वाहतुकीमुळे वारंवार उदगाव परिसरात अपघात होत आहेत. त्यामुळे अवजड व बेशिस्त वाहतुकीला शिस्त लावण्याची गरज आहे. गेल्या दोन वर्षांपासून जयसिंगपूर शहरातून अवजड वाहने नकोत यासाठी सांगलीकडून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी उदगाव, केपीटी, नांदणी नाका, चौंडेश्वरी असा मार्ग, तर कोल्हापूरहून येणाऱ्या अवजड वाहनांसाठी तमदलगे, निमशिरगाव, जैनापूर, उदगाव असा मार्ग उपलब्ध आहे. मात्र, अवजड वाहतूक करणाऱ्या चालकांना एक ते दोन किलोमीटरचा त्रास नको, यासाठी जयसिंगपूर शहरातून सर्रास अवजड वाहनांची वाहतूक केली जाते. उदगाव बसस्थानक व टोलनाका परिसरात अरुंद रस्ते व अतिक्रमण असल्यामुळे सातत्याने लहान-मोठे अपघात व वाहतुकीची कोंडी होत आहे. येथील बसस्थानक हे महामार्गावर असल्याने प्रवाशांच्याही जिवाला धोका निर्माण झाला आहे. तसेच खोत पेट्रोलपंप याठिकाणी असलेले बाह्य वळण, महामार्गालगत असलेला नवीन वैरण बाजार, बसस्थानक, शिरोळ रस्ता, रेल्वे ओव्हरब्रिज, टोल नाका याठिकाणीच वारंवार अपघात होऊन अनेकांनी आपला जीव गमावला आहे.अपघाताचे क्षेत्रसांगली-कोल्हापूर महामार्गावर वारंवार अपघात होत असलेले ठिकाणी म्हणून उदगाव या गावची ओळख झाली आहे. जयसिंगपूर, सांगली, शिरोळ, चिंचवाड, बायपास कोल्हापूर, रेल्वेस्टेशन असे मार्ग उदगावमध्ये येत असल्याने अरुंद रस्त्यामुळे सातत्याने अपघात होत आहेत. उदगाव बसस्थानक व टोल नाका परिसरातील अतिक्रमणे काढण्यासाठी बांधकाम विभागाने पुढाकार घेतला पाहिजे. पोलिस चौकीची गरजशिरोळ तालुक्यातील उदगाव हे २२ हजार लोकसंख्या असलेले निमशहरी गाव आहे. याठिकाणी होत असलेले अपघात, अवैध धंदे, बेकायदेशीर उत्खनन, ओव्हरलोड वाहतूक होत असते. यामुळे येथे नेहमीच अपघात होत असतात. त्यातच अपघातग्रस्त या गावची ओळख असल्यामुळे उदगाव येथे पोलिस चौकीची गरज आहे.