शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
3
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
4
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
5
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
6
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
7
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
8
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
9
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
10
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
11
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
12
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
13
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
14
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
15
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
16
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
17
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
18
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
19
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
20
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
Daily Top 2Weekly Top 5

वाहतूक कोंडी फोडणार कोण ?

By admin | Updated: June 20, 2016 00:58 IST

उचगाव ब्रीजची समस्या : वाहतूक नियंत्रणासाठी संबंधित विभागांनी लक्ष देण्याची गरज

 मोहन सातपुते ल्ल उचगाव उचगाव (ता. करवीर) येथे वाहन पार्किंगचा पेच कायम असून, रस्त्यावर वाहतुकीची कोंडी होत आहे. कोल्हापूर शहरात, एमआयडीसीकडे ये-जा करण्याकरिता बहुतेक वाहनधारक याच ब्रीजचा वापर करतात. शहराकडून येणारी वाहनांची संख्या दिवसागणिक वाढत वर्दळ वाढली आहे. असे असताना येथील वाहतूक कोंडीकडे कोणत्याच विभागाचे लक्ष नाही. ही वाहतूक कोंडी फोडणार कोण, हा प्रश्न वाहनधारक विचारत आहेत. उचगाव-हुपरी या मार्गावर चांदी व्यवसायाच्या निमित्ताने अनेक वाहनधारक व उद्योजक या मार्गाचा वापर करीत आहेत. बंदी असतानाही अवजड वाहने नो एन्ट्रीच्या मार्गावरच थांबलेली असतात. सार्वजनिक जागांवरही अतिक्रमणाचा घट्ट विळखा पडला आहे. दाटीवाटीनं पानटपऱ्या, खोकी, हातगाडी, फेरीवाले याच रोडवर हातावरची पोटं भरण्यासाठी गर्दी करून राहिले आहेत. मटन, चिकन, मासे विक्रीचा व्यवसायही या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालत असतो. या निमित्ताने येणारी-जाणारी वाहने, सायकल, मोटारसायकल, आॅटो रिक्षा, कार, डिलिव्हरी व्हॅँन, ट्रक व बस, ट्रॅक्टर, स्कूल बस यासारखी वाहने रस्त्यावरच थांबल्याने मोठ्या ट्राफिकच्या समस्येला सामोरे जावे लागते आहे. मुख्य रस्त्यावरच चार बीअर शॉपी, बार अ‍ॅन्ड रेस्टॉरंट, देशी दारू दुकानामुळे तळिरामांची गर्दी वाढत आहे. यांचा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेवर परिणाम होत आहे. काही खासगी इमारती व दुकानदारांकडे स्वमालकीचे पार्किंग नसल्याने भरीस भर म्हणून त्यांचीही वाहने रस्त्यावर थांबल्या कारणामुळे वाहतुकीची बारमाही कोंडी होत आहे. वाहनांच्या गर्दीतून सामान्य लोकांना रस्ता शोध अवघड झाले आहे. धोका : रस्त्यावर पार्किंग ४उचगाव ब्रीज ते उचगाव नाका या मुख्य रस्त्यावर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. जीव मुठीत घेऊनच वाहन चालवावे लागते. ४उचगाव कमानीशेजारील चौकात अस्ताव्यस्त पार्किंगने डोकेदुखी वाढवली आहे. चौकातूनच गावातील मुख्य रस्त्याकडे वळावे लागत आहे. परिणामी अपघातांचा धोका वाढलेला आहे.