शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

‘मोरांवर चोर’ कोण हे गुलदस्त्यातच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 21, 2017 00:07 IST

वनखात्याचा डोळेझाक कारभार : मोरांचे अवशेष मिळूनही तक्रार नाही

लोकमत न्यूज नेटवर्क--कोल्हापूर : कंदलगाव येथील मोर चोरी प्रकरण घडून दहा दिवस उलटले तरीही वनखात्याकडून या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जात नसल्याचे दिसून आले आहे. कंदलगावच्या माळावर दोन मोरांचे अवशेष मिळूनही वनखात्याकडून कोणतीही तक्रार दाखल न झाल्यामुळे या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला नसल्याची माहिती करवीर पोलीस उपअधीक्षक सूरज गुरव यांनी पत्रकारांशी बोलताना दिली. या प्रकारामुळे वनखात्याचा डोळेझाक कारभार चव्हाट्यावर आला आहे.कंदलगाव (ता. करवीर) येथील करमाळा मळ्यात दि. ९ जुलै रोजी सायंकाळी पांढऱ्या रंगाच्या मोटारीतून सात ते आठजणांनी जाळी लावून आठ ते नऊ मोर पकडून गाडीत घालून नेले. नागरिकांनी मोटारीच्या क्रमांकासह सर्व माहिती त्वरित पोलिसांना कळविली. पोलिसांनी संबंधित गाडी ताब्यात घेतली. मात्र, आरोपी पोलिसांच्या हाती लागले नाहीत. दुसऱ्या दिवशी कंदलगावातीलच खड्याच्या माळावर बाभळीच्या झुडपात काही शेतकऱ्यांना मोरांची पिसे दिसली; पण त्यानंतर वनखाते आणि पोलीस यंत्रणेची हतबलता दिसून आली. मोर हा राष्ट्रीय पक्षी असूनही हे चोरीचे प्रकरण दोन्हीही विभागांनी गांभीर्याने घेतले नसल्याचे उघड झाले आहे. शुक्रवारी (दि. १४) पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक संजय मोहिते यांनी, मोरांच्या चोरीबाबत काही माहीत नसल्याचे सांगितले; पण नंतर त्यांनी या प्रकरणाची चौकशी करू, असे आश्वासन दिले.राजकीय दबावाची कंदलगावात चर्चामोर या राष्ट्रीय पक्ष्याच्या तस्करीसाठी जिल्ह्यात मोरांची चोरी झाल्याचे उघड झाले आहे. दरम्यान, पोलीस खात्याने याबाबत पंचनामा करून अहवाल वनखात्याकडे पाठविला; पण याकडेही वनविभागाने डोळेझाक करण्याचीच भूमिका बजावली. राजकीय दबावापोटी वनखात्यातर्फे या प्रकरणी तोंडावर बोट ठेवून, ‘असे घडलेच नसल्या’ची भूमिका घेतली असल्याची कंदलगाव परिसरातील नागरिकांत चर्चा सुरू आहे.कंदलगाव येथील माळावरून मोरांच्या चोरीप्रकरणी पोलीस खात्याने सखोल चौकशी करून त्याचा वनविभागाकडे अहवाल पाठविला आहे; पण वन विभागाकडून तक्रार देण्यासाठी पुढाकार घेतला नसल्याने पोलिसांत कोणतीही तक्रार दाखल करण्यात आलेली नाही.- सूरज गुरव, उपअधीक्षक, करवीर विभाग.वनपरिक्षेत्र अधिकाऱ्याकडून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. कंदलगाव माळावर मोराचे काही अवशेष मिळाले आहेत. पोलीस खात्याचा अहवाल बुधवारी प्राप्त झाला आहे. चौकशीसाठी स्वतंत्र अधिकाऱ्याची नियुक्ती केली आहे. या प्रकरणाचा सखोेलपणे तपास करून आरोपींचा छडा लावू. - प्रभुनाथ शुक्ल, उपवनसंरक्षक