शहरं
Join us  
Trending Stories
1
Ceasefire Violation: पाकिस्तानने खरंच सीमेवर गोळीबार केला का?; लष्कराने दिली महत्त्वाची माहिती
2
Aarti Sathe Judge: "काँग्रेसवाल्यांनो आणि रोहित पवार आता याचे उत्तर द्या"; भाजपचे विरोधकांना आव्हान
3
गझल हेच व्रत हाच ध्यास! पंडित भीमराव पांचाळे यांना गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार प्रदान
4
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
5
एका कसोटी मालिकेत सर्वाधिक धावा करणारे संघ, भारताने मोडला ९६ वर्षांचा जुना विक्रम!
6
अजितदादांचा शरद पवारांना धक्का, तानाजी सावंतांचंही टेन्शन वाढवलं, माजी आमदार राहुल मोटे अजित पवार गटात
7
"मी अजून करिअरमध्ये मध्यंतरापर्यंतही पोहोचलेलो नाही", जीवनगौरव पुरस्कारानंतर अनुपम खेर यांची प्रतिक्रिया
8
Joe Root: जो रूट सुसाट! सचिन तेंडुलकरचा 'हा' विश्वविक्रमही धोक्यात, फक्त 'इतक्या' धावा दूर
9
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
10
छ. शिवरायांच्या किल्ल्यांना जागतिक दर्जा मिळवून देण्यात योगदान देणाऱ्या विशाल शर्मांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान
11
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
12
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
13
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
14
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
15
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
16
अभिनेत्री मुक्ता बर्वे व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित, भावना व्यक्त करत म्हणाली...
17
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
18
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
19
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
20
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...

धुमश्चक्रीस जबाबदार कोण?

By admin | Updated: August 24, 2015 00:36 IST

शिक्षक बँक : पळपुटेपणामुळेच घटना - प्रसाद पाटील; सभासदांनी नाकारलेल्यांकडूनच कृत्य : राजमोहन पाटील

 कोल्हापूर : शिक्षक बॅँकेच्या सभेत रविवारी सत्तारूढ व विरोधकांमध्ये जोरदार धुमश्चक्री उडाली. या राड्यास जबाबदार कोण? याबाबत दोन्ही गटांच्या नेत्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी एकमेकांकडे बोट करून निषेध नोंदवला. पळपुटेपणामुळेच राडा : पाटील शिक्षकांची अस्मिता असणाऱ्या प्राथमिक शिक्षक बॅँकेच्या सभेतील राड्यास सत्तारूढ गटाचा पळपुटेपणाच जबाबदार असल्याची घणाघाती टीका पुरोगामी शिक्षक समितीचे राज्याध्यक्ष व बॅँकेचे संचालक प्रसाद पाटील यांनी यावेळी केली. आम्ही रितसर लेखी प्रश्न विचारले होते. निवडणूक डोळ्यांसमोर ठेवून खोटा ताळेबंद प्रसिद्ध करून सहकार खात्याबरोबर सभासदांची दिशाभूल केली आहे. रिझर्व्ह बॅँकेच्या नियमानुसार देणे व्याजाची सर्व तरतूद १०० टक्के केल्याशिवाय ताळेबंद अंतिम करता येत नाही. मुदत ठेवीवर कोट्यवधीचे येणे व्याज तरतूद न करता बॅँक नफ्यात चालविल्याच्या गप्पा मारत आहेत. याबाबत आम्ही रिझर्व्ह बॅँकेकडे तक्रार केली आहे. याबाबत रविवारच्या सभेत आम्ही जाब विचारणार होतो; पण विषयपत्रिकेवरील एकाही विषयावर चर्चा न करता वंदे मातरम् घेऊन सभा संपविल्यानंतर सभासद आक्रमक झाले. सभा संपल्यानंतर वास्तविक त्यांनी बाहेर जाणे अपेक्षित होते. आम्ही लोकशाही मार्गाने समांतर सभा घेणार होतो; पण तिथेही गावगुंडांच्या माध्यमातून आमच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. रविवारच्या सभेत झालेल्या मारहाणीसह सर्वच गैरकृत्यांचा आम्ही निषेध करत असल्याचेही पाटील यांनी सांगितले. सभासदांनी नाकारलेल्या मंडळींकडूनच राडा : राजमोहन पाटील बॅँकेच्या निवडणुकीत सभासदांनी नाकारलेल्या दलबदलू मंडळींमुळेच सभेत राडा झाल्याचा पलटवार बॅँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी केला. सभेला चांगल्या प्रकारे सुरुवात झाली होती. प्रास्ताविकातच लेखी प्रश्नांसह आयत्यावेळी येणाऱ्या प्रश्नांवर समर्पक उत्तर दिल्याशिवाय सभागृह सोडणार नाही, अशी ग्वाही दिली होती. गेली सहा वर्षे बॅँकेला आर्थिक अरिष्टातून बाहेर काढून नफ्यात आणली. गेले चार-पाच महिने विरोधकांना विश्वासात घेऊन बॅँकेचा कारभार सुरू असताना केवळ विरोधाला विरोध करणे योग्य नाही. आपण शिक्षक आहोत, याचे भान अनेक मंडळींना नाही. ज्यांना सभासदांनी नाकारले, अशा मंडळींनी सामान्य सभासदाला मारहाण केली. अशा प्रवृत्तीचा आम्ही निषेध करतो. आम्ही सभा चालविण्यासाठी बांधील होतो; पण जाणीवपूर्वक गोंधळ करून शिक्षक पेशाला गालबोट लावण्याचा उद्योग विरोधकांनी केला आहे. बॅँकेच्या नफ्याबाबत बोलणाऱ्यांनी मुळात ताळेबंद म्हणजे काय हे समजून घ्यावे. लेखापरीक्षकांनी आमचा कारभार पाहून ‘अ’ वर्ग दिला, ही गेल्या सहा वर्षांतील कामाची पोहोचपावती आहे. दुर्दैवाने विरोधकांना चांगल्याला चांगले म्हणण्याची सवय नसल्याने गोंधळ करून सभासदांना वेठीस धरण्याचे काम केल्याचा आरोप अध्यक्ष पाटील यांनी केला. विरोधकांनीच सभा उधळली : राजाराम वरुटे सभासदांच्या लेखी प्रश्नांसह आयत्या वेळी येणाऱ्या प्रश्नांची उत्तरे देण्याची तयारी अध्यक्ष राजमोहन पाटील यांनी केली होती. सभा अतिशय शांतपणे चालविली जाईल, यासाठी आमचे प्रयत्न होते; पण दुर्दैवाने विरोधकांना सभा उधळायची होती. माझ्यावर गुंड आणल्याचा आरोप करणाऱ्यांनी आत्मचिंतन करावे. स्वत:च गुंडांसारखे कृत्य करून सभासदांना मारहाण करण्याचे काम विरोधकांनी केले आहे. ज्यांना बॅँकेच्या निवडणुकीत सत्तारूढ पॅनेलमध्ये संधी दिली नाही, ती मंडळी बिनबुडाचे आरोप करून शिक्षकी पेशाला बदनाम करण्याचा उद्योग करत आहेत, असे राजाराम वरूटे म्हणाले महिला सभासदांची तारांबळ शिक्षक बॅँकेची सभा म्हटले की ताटे फेकाफेकी, हाणामारी असेच समीकरण असल्याने महिला सभासद सभेकडे पाठ फिरवत होत्या. मात्र, गेल्या पाच-सहा वर्षांपासून बँकेची सभा शांततेत पार पडत असल्याने गेल्या दोन सभांपासून महिला सभासद येत होत्या. यावेळी मात्र हाणामारीमुळे त्यांची चांगलीच तारांबळ उडाळी. गोंधळ उडाल्यानंतर त्यांनी स्वत:ला सावरत वाट मिळेल तेथून सभागृहातून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अध्यक्षांना बदनाम करण्यासाठीच वरुटेंची खेळी बॅँकेचे अध्यक्ष राजमोहन पाटील यांना सभा हाताळता येत नाही, हा ठपका ठेवण्यासाठीच राजाराम वरुटे यांनी करवीर तालुक्यातील समर्थक आणून गोंधळ घातल्याचा आरोप शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष (थोरात गट) रवी पाटील यांनी केला.