शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून वाहनांवरील नवीन करप्रणाली लागू; सीएनजी असो की पेट्रोल किंवा डिझेल... एवढा कर...
2
भारतापासून १४ हजार किलोमीटर दूर 'या' देशात राहतात असंख्य भारतीय! दरवर्षी साजरी होते दिवाळी
3
ZIM vs SA Test: खतरनाक 'सुपर स्पिन'! गोलंदाजाच्या भन्नाट फिरकीने केली फलंदाजांची 'दांडी गुल' (Video)
4
जळगावच्या मुलीचे कोल्हापूरमध्ये लग्न! बापाने घेतला गळफास; आईला माहिती होती सगळी गोष्ट
5
'कुणीही स्वतःच्या खिशातून पैसे देत नाही', CM फडणवीसांचं महाराष्ट्रातील जनतेला आवाहन
6
अंबानी-अदानींना टाकले मागे! नागपूरच्या कंपनीने घडवला इतिहास! 'या' अब्जाधीशाची विक्रमी कमाई!
7
खळबळजनक! सोनमपासून प्रेरणा घेऊन बायकोने काढला नवऱ्याचा काटा, बाईकला GPS अन्...
8
जल्लोष करा पण कशाचा? राज ठाकरेंच्या एकेकाळच्या आमदाराने उबाठासोबत युतीवर मोठी भविष्यवाणी केली
9
विधानसभेला बंडखोरी केली, अपक्ष निवडणूक लढवली, काँग्रेसकडून बड्या नेत्याचं निलंबन अखेर मागे  
10
Accident Video: भयंकर... धडकी भरवणारा! हॉटेलच्या समोर कारने चौघांना चिरडले; अपघात सीसीटीव्हीत कैद
11
Mumbai: धक्कादायक! पतीला चोरीच्या खोट्या गुन्ह्यात अडकवून पत्नीवर बलात्कार; पैसे, दागिनेही लुबाडले
12
१ जुलैपूर्वी तिकीट काढलं असेल तर प्रवाशांना द्यावे लागतील अतिरिक्त पैसे? अखेर रेल्वेने केलं स्पष्ट
13
गुरुवारी गुरुपौर्णिमा: गुरुचरित्र सप्ताह करायचा आहे? पारायण कसे करावे? पाहा, नियम व पद्धती
14
धक्कादायक! रिक्षावाल्याला थांबवलं, पैसे घेऊन येतो म्हणाला अन्...; गोरेगावमध्ये तरुणाने संपवले स्वतःचे आयुष्य
15
इराण-इस्रायल युद्धबंदीनंतर सोन्याच्या किमतीत पहिल्यांदाच सर्वात मोठी वाढ! चांदीही चमकली!
16
'या' अभिनेत्याने घेतली निलेश साबळेंची जागा, 'चला हवा येऊ द्या'च्या नव्या पर्वाचं सूत्रसंचालन करणार
17
ENG vs IND : १२३ वर्षांत जे घडलं नाही ते करून दाखवण्याचं चॅलेंज; इथं पाहा टीम इंडियाचा रेकॉर्ड
18
वनप्लस पुन्हा एकदा डबल धमाका करणार; एकात वनप्लस १३ चा कॅमेरा? कोणते फोन येतायत...
19
हुंड्यासाठी पती झाला हैवान! दागिने, AC साठी टॉर्चर; लग्नानंतर ३ दिवसांनी नववधूने संपवलं जीवन
20
५०० वर्षांनी गुरु-शनिचा पॉवरफूल योग: ९ राशींचे कल्याण, अपार लाभ; भरघोस भरभराट, बक्कळ पैसा!

कुणी जागा देता का जागा ?

By admin | Updated: November 22, 2014 00:17 IST

जागांचे भाव गगनाला : आजरा शहरातील व्यावसायिकांची अवस्था

ज्योतीप्रसाद सावंत - आजरा -शहरातील मर्यादित बाजारपेठेमुळे बाजारपेठेतील रिकाम्या जागांसह व्यवसाययोग्य जागांचे भाव गगनाला भिडले असून अनेक व्यावसायिकांना जागा शोधत भटकावे लागत आहे. कुणी जागा देता का जागा ? असे म्हणण्याची वेळ दुकानदार व व्यावसायिकांवर आली आहे.गेल्या दहा ते पंधरा वर्षांत आजरा शहराचा विस्तार प्रचंड वाढला आहे. शहर चारही बाजूंना उपनगरांच्या माध्यमातून विस्तारत गेले आहे. एकीकडे शहराचा विस्तार होत असताना मुख्य बाजारपेठ संभाजी चौक ते आजरा अर्बन बँक एवढीच मर्यादित राहिली आहे. अनेक सुशिक्षित बेरोजगार तरुण व्यवसायाकडे वळत असल्याने व्यवसाय उभे करण्याची इच्छा आहे; परंतु व्यवसायासाठी जागाच नाही, अशी परिस्थिती या तरुणवर्गाची आहे.मूळ जागामालकांना व्यावसायिक जागांच्या टंचाईची कल्पना आल्याने व्यवसाययोग्य तयार इमारतींच्या भाड्यामध्ये प्रचंड वाढ सांगितली जात आहे. इमारत भाडे, अनामत रक्कम, नोकर पगार व व्यवसायातील गुंतवणुकीवरील व्याज याचा ताळमेळ बसत नसल्याने अनेक व्यावसायिक व्यवसाय बंद ठेवण्याला प्राधान्य देत आहेत.ग्रामपंचायत मालकीच्या गाळ्याच्या भाडेकरूंनी पोटभाडेकरू ठेवून नाममात्र भाड्यावर मिळालेले दुकानगाळे स्वकमाईचे साधन बनवून टाकले आहेत.ग्रामपंचायत मालकीच्या ठिकठिकाणच्या खोक्यांची अवस्था फारशी वेगळी नाही. या सर्व प्रकारामुळे छोटे भांडवल गुंतवून व्यवसाय करू इच्छिणारे नवोदित व्यावसायिक अडचणीत येत आहेत. व्यवसायासाठी कुणी जागा देता का जाग ? असे म्हणण्याची वेळ आली आहे.मुख्य बाजारपेठेत जागांचे विक्री दर सात हजार ते दहा हजार रूपये प्रती चौरस फुटापर्यंत गेले आहेत, तर तयार गाळे ३० ते ५० रूपये प्रती चौरस फूट भाड्याने दिले जात आहेत.एकीकडे व्यापारी, व्यावसायिक जागांच्या शोधात असताना दुसरीकडे स्थिरस्थावर असणाऱ्या सहकारी संस्थांही जागांच्या शोधात असल्याने बाजारपेठेतील जागांचे दर गगनाला भिडले आहेत.