शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

Vidhan Sabha Election 2024: अनुदान दिले, लाडक्या बहिणींच्या प्रश्नांचे काय ?

By इंदुमती सूर्यवंशी | Updated: November 9, 2024 16:22 IST

पैसे देऊनही प्रश्नांचा गुंता कायम 

इंदूमती गणेश कोल्हापूर : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेद्वारे महिलांच्या खात्यावर दरमहा १५०० रुपये जमा केले आणि राज्यातील महिलांचे सर्वच प्रश्न सुटले, असा समज राजकीय मंडळींचा झालाय की काय, असेच सध्याचे निवडणुकीतील वातावरण आहे. लाडकी बहीण योजनेची मोठ्या प्रमाणात जाहिरातबाजी हाेत असताना लहान मुली, महिला युवतींवरील अन्याय अत्याचार, स्त्री भ्रूणहत्या, सबलीकरणातील अडथळे, मोफत शिक्षणाचा फार्स, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी होणारी कोंडी अशा अनेक विषयांवर सर्वच राजकीय पक्षांनी मौन बाळगले आहे.राज्यातील एकूण लोकसंख्येच्या आणि मतदारांमध्ये अर्धा वाटा हा महिलांचा असताना निवडणुकीत महिलांशी संबंधित प्रश्नांना कधीच प्राधान्य दिले गेले नाही. आताची निवडणूकदेखील त्याला अपवाद नाही. लहान मुलींपासून युवती व महिलांपर्यंत सर्वांना सुरक्षित वातावरण हवे आहे. घर, शाळा, महाविद्यालये, सार्वजनिक ठिकाणी वावरताना किंवा कामाच्या ठिकाणी अन्याय-अत्याचाराला सामोरे जावे लागते. मागील दोन-चार महिन्यांतील घटना, तर अस्वस्थ करणाऱ्या आहेत. पण, त्यावर ठोस काही कायदे झाले नाहीत. महिलांना सुरक्षितता प्रदान करण्यासाठीचे घोषणा, जाहीरनामे पुढे आले नाहीत.

मुलींना माेफत शिक्षणाची घोषणा झाली, पण अजूनही या अध्यादेशाच्या अंमलबजावणीबाबत महाविद्यालयीन स्तरावर गोंधळलेपण आहे. स्त्री भ्रूण हत्येचे प्रकार आजही राजरोसपणे चालतात. सासरी हुंड्यासह अन्य कारणांसाठी छळ, मुलगी नको म्हणून छळ, मुलगी झाली तरी छळ, नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी स्त्रीच्या कर्तृत्वापेक्षा तिच्या स्त्री असण्यावरून केले जाणारे कमेंट, विनयभंगाचे प्रकार किंवा मानसिक छळ या अशा विविध कारणांमुळे महिला-मुलींवरील अत्याचारात वाढच होत असताना, त्यांना सुरक्षित वातावरण मिळावे, अत्याचार करणाऱ्याविरोधात कडक कायदे करावे, त्यांना आरोग्य व शैक्षणिक सुविधा मिळून द्याव्यात, असा कोणताही मुद्दा निवडणुकीत चर्चिला जात नाही.

हे आहेत प्रश्न

  • शिक्षणावरील वारेमाप खर्च
  • आरोग्य सुविधा
  • रोजगार
  • स्त्री भ्रूण हत्या
  • लैंगिक अत्याचार
  • कौटुंबिक छळ, हुंड्यासाठी छळ
  • कामाच्या ठिकाणी अन्याय
  • छेडछाड, सार्वजनिक ठिकाणी असुरक्षितता

फक्त मतदार म्हणून महिलांकडे बघण्याऐवजी त्यांना शिक्षण रोजगाराच्या संधी निर्माण करून आत्मविश्वास, आत्मसन्मानाने जगता यावे, यासाठी प्रयत्न व्हावेत. त्यांना निर्भय वातावरणात जगता यावे, यासाठी गुन्हेगारांना कडक शासन करणे, आरोग्य सुविधा देणे हे खरेतर सरकारचे काम आहे. एकीकडे १५०० रुपये द्यायचे दुसरीकडे महागाई वाढवून दुप्पट वसूल करायचे, याचा काही उपयोग नाही. - मेघा पानसरे, सामाजिक कार्यकर्त्या. 

आयजीच्या जिवावर बायची उदार, असेच वर्णन या योजनेचे आहे. सरकारने याेजना महिलांसाठी नाही तर स्वत:साठी आणली आहे. महिला गरजेकडून चैनीकडे जात आहेत. गरजुंच्या हाताला काम देण्याऐवजी फुकट देऊन त्यांना आळशी बनवण्याचा प्रकार आहे. दुसरीकडे महिलांचे मूलभूत प्रश्न जैसे थे ठेऊन सगळे आनंदीआनंद असल्याचा आभास निर्माण केला आहे. - अनुराधा मेहता, सामाजिक कार्यकर्त्या.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४kolhapur-north-acकोल्हापूर उत्तरladki bahin yojanaलाडकी बहीण योजनेचाwestern maharashtra regionपश्चिम महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024