शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

धरणे भरणार की नाही याची धास्ती

By admin | Updated: August 7, 2015 22:54 IST

अपुऱ्या पावसाचा परिणाम : जलविद्युत निर्मिती ठप्प, उन्हाळ््यात पाणी प्रश्न उद्भवणार

राधानगरी : अपुरा पाऊस होऊनही शेतकऱ्यांनी कशीतरी शेतीकामे उरकली खरी, मात्र अशीच स्थिती राहिल्यास उन्हाळ््यात उद्भवणाऱ्या पाणी प्रश्नांची धास्ती निर्माण झाली आहे. दरवर्षी या काळात ‘ओव्हर फ्लो’ होणारी धरणे भरतात की नाही, अशी स्थिती आहे. शिवाय यावर्षी जलविद्युत निर्मिती ठप्प झाल्याने मोठे नुकसान संबंधितांना सोसावे लागणार आहे. राधानगरी व काळम्मावाडी येथील वीज केंद्रांतून गतवर्षी जवळपास पन्नास लाख युनिट वीज निर्मिती या काळात झाली होती.राधानगरीच्या ऐतिहासिक लक्ष्मी तलावाच्या सभोवताली अभयारण्याचे संरक्षण कवच असल्याने येथे प्रचंड पाऊस कोसळतो. परिणामी महिन्याभरातच धरण पूर्ण भरू शकते. म्हणून येथील दोन्ही केंद्रांतील जलविद्युत निर्मिती जूनपासूनच सुरू होते. जुलैच्या शेवटच्या आठवड्यात धरणाचे स्वयंचलित दरवाजे सुरू होतात. गतवर्षी पावसाच्या सुरुवातीला २.४0 टी.एम.सी. पाणीसाठा शिल्लक होता. जूनपासून ‘महाजनको’च्या केंद्रांतून ३१ जुलैपर्र्यंत ६५ हजार युनिट, तर सप्टेंबरपर्यंत दोन लाख ५७ हजार युनिट वीज तयार झाली होती. मोहिते कंपनीच्या केंद्रातून केवळ जुलै माहिन्यातच २२ लाख, तर जून महिन्यात दहा लाख युनिट वीज निर्माण झाली होती.गतवर्षी ३१ जुलैपर्यंत २७५७ मि. मी. पाऊस झाला होता. धरणात ७.९१ टी.एम.सी. पाणी होते. १ आॅगस्ट २0१४ रोजी स्वयंचलित दरवाजे सुरू झाले होते. यावर्षी येथे १८३६ मि.मी. पाऊस झाला आहे, तर धरणात ५.८२ टी. एम. सी. पाणीसाठा आहे. यावर्षी केवळ ‘महाजनको’च्या केंद्रातून चाचणीसाठी पाणी सोडल्याने ११ हजार युनिट विजेची निर्मिती झाली आहे.जिल्ह्यातील सर्वांत मोठे धरण अशी ओळख असणाऱ्या काळम्मावाडी येथील शाहू सागर जलाशयाचीही अपूर्णच स्थिती आहे. येथे मे २0१४ अखेर धरणात ६.३४ टी.एम.सी. पाणी शिल्लक होते. ३१ जुलै २0१४ पर्यंत येथे १८८२ मि.मी. पाऊस होऊन पाणीसाठा १६.१९ शिल्लक राहिला होता. शिवाय या काळात वीजनिर्मिती केंद्रात सोडलेल्या पाण्यामुळे २८ लाख ६३ हजार युनिट वीजनिर्मिती झाली होती.यावर्षी ३१ मे अखेरीस ७.३६ टी. एम. सी. इतका पाणीसाठा होता, तर केवळ १२८७ मि. मी. पाऊस पडल्याने ३१ जुलैचा पाणीसाठा १४.४६ टी. एम. सी. झाला आहे. हे धरण पूर्ण भरायला अजून ११ टी. एम. सी. पाणीसाठा कमी आहे. पावसाची स्थिती पाहता, हे धरण भरण्याची अनिश्चितता आहे. असे झाल्यास उन्हाळ््यात पाण्याच्या वापरावर मर्यादा येणार आहेत. (प्रतिनिधी)