कोल्हापूर : काँग्रेसची सत्ता राज्यात असताना तेव्हा सहकारमंत्री असलेले हर्षवर्धन पाटील यांनी ऊसदराचा प्रश्न सुटावा, यासाठी एकदाही बैठक घेतली नाही. आता सत्तेवरून पायउतार झाल्यावर त्यांनी सरकारने हा प्रश्न सोडवावा, अशी अपेक्षा व्यक्त करणे हा त्यांचा कावेबाजपणा असल्याची टीका शेकापचे नेते व भोगावती साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष अशोकराव पवार-पाटील यांनी आज, सोमवारी पत्रकारांशी बोलताना केली.ते म्हणाले, ‘स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आज पुण्यात साखर संकुलाची तोडफोड केली. त्याचे समर्थन कुणीच करणार नाही. परंतु, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्र्नांकडे लक्षच देणार नसेल तर किती दिवस संयम बाळगायचा, हा देखील प्रश्न आहे. शेतकरी कामगार पक्षही ऊसदराच्या प्रश्नांवर सातत्याने आंदोलन करत आला. परंतु, तोडफोडीचे समर्थन आम्ही कधीच करणार नाही. माजी सहकारमंत्री हर्षवर्धन पाटील यांनी हा प्रश्न सुटावा, यासाठी कधीही पुढाकार घेतला नाही. आज मात्र तेच दुसऱ्याकडे बोट दाखवित आहेत.’ सांगली जिल्ह्णातील सर्व कारखान्यांनी एकत्रित येऊन टनास १८०० रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे तिथे शेतकऱ्यांना ऊस कुणाला घालायचा? असा प्रश्न पडला आहे. सांगलीतील कारखानदार संघटित असल्याने त्यांनी एकत्रित असा निर्णय घेतला. परंतु, कोल्हापूर जिल्ह्णात हे शक्य झाले नाही, कारण ऊसदर देण्याबाबतही काही कारखानदार दुटप्पी भूमिका घेतात. भोगावती कारखान्याने दराच्या स्पर्धेत राहायचे म्हणून ‘एफआरपी’प्रमाणे २५९२ रुपये दर देण्याचा निर्णय घेतला. (प्रतिनिधी)शेतकऱ्यांसाठी समन्वयातून मार्ग काढासहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील हे कारखान्यांवर कारवाई करण्याची भाषा करत आहेत; तर माजी आमदार के. पी. पाटील यांनी त्यांना कारवाई कराच, असा इशारा दिला आहे. या दोन्ही भूमिका साखर कारखानदारीस अडचणीत आणणाऱ्या आहेत. दोघांनी समन्वयानेच या अडचणीतून मार्ग काढून शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे.
तेव्हा हर्षवर्धन पाटील कुठे गेले होते?
By admin | Updated: January 13, 2015 00:49 IST