शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
2
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
3
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
4
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
5
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
6
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
7
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
8
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
9
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
10
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
11
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
12
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
13
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
14
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
15
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
16
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
17
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
18
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
19
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
20
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा बँकेला जाब विचारणारे आजपर्यंत कुठे होते?

By admin | Updated: November 8, 2015 23:42 IST

भरमूअण्णा पाटील : ‘दौलत’बाबत जिल्हा बँकेला सहकार्य करणार

चंदगड : दौलत सहकारी साखर कारखाना सुरू करण्याच्याबाबतीत जिल्हा सहकारी बँकेकडून योग्य तो प्रयत्न केला जात आहे. मात्र, त्याला आडकाठी ‘दौलत’वर सत्ता भोगणारे माजी आमदार नरसिंगराव पाटील करत आहेत. दौलतबाबत आज जिल्हा बँकेला जाब विचारण्याचा ढोंगीपणा करण्याचा खटाटोप करत आहेत. त्यामुळे त्यांच्या मनात दौलत साखर कारखाना सुरू करायचा आहे, की हे सर्व नाटक-ढोंग आहे, असा सवाल माजी राज्यमंत्री भरमूआण्णा पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. दौलत कारखान्याच्या भवितव्याबाबत चंदगड येथे झालेल्या पत्रकार पत्ररिषदेत ते बोलत होते.ते म्हणाले, दौलत कारखाना हा तालुक्यातील शेतकरी व कामगार यांना तारणहार होता. दौलत बंद पडल्यामुळे शेतकरी, कामगार देशोधडीला लागले आहेत. ‘दौलत’ची आजची स्थिती येऊ नये म्हणून मी प्रत्येक वार्षिक सर्वसाधारण सभेत प्रश्न विचारत होतो. मात्र, यावेळी माईक बंद करणे, बोलण्यास मज्जाव करणे, कार्यकर्त्यांना मारहाण करणे, असे प्रकार केले जात होते. मी व माझ्या कार्यकर्त्यांनी मारहाण सहन केली आहे. डोकी फोडून घेतली आहेत, हे पूर्ण तालुकावासीयांना माहीत आहे. दौलतच्या कारभाराची माहिती पूर्ण राज्यभर सर्वांना माहीत आहे. पाईपच्याद्वारे स्पिरीटची केलेली चोरी, दौलतचा वापर राजकारण्यासाठी केला. दौलत कारखाना स्वत:च्या हितासाठी केला. गेली चार वर्षे कारखाना बंद आहे. तो सुरू करण्यासाठी जिल्हा बँक प्रभावीपणे प्रयत्न करीत आहे. जिल्हा बँक व दौलत कारखान्यात माजी आमदार नरसिंगराव पाटील बरेच वर्षे कार्यरत आहेत. दौलत कारखाना सुरू व्हावा यासाठी त्यांनीच अधिक प्रयत्न करावयास हवा होता. मात्र, तसे न होता जे कोणी प्रयत्न करत आहेत, त्यांना ते आडकाठी करत आहेत. त्यामुळे त्यांचे हे दुटप्पी धोरण सर्वांनाच समजले आहे. दौलत जर यावर्षी सुरू झाला नाही, तर जनता त्यांना माफ करणार नाहीत.