शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
4
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
5
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
6
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
8
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
9
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
10
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
11
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
12
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
13
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
16
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
17
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
18
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
19
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
20
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
Daily Top 2Weekly Top 5

कोरोना नियंत्रण दक्षता समिती आहे तरी कुठे?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:28 IST

सतीश नांगरे लोकमत न्यूज नेटवर्क शित्तूर-वारूण : शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत अलगीकरणात ठेवण्यात आलेले कोरोनाबाधित रुग्ण ...

सतीश नांगरे

लोकमत न्यूज नेटवर्क

शित्तूर-वारूण :

शित्तूर-वारूण (ता. शाहूवाडी) येथील केंद्रीय प्राथमिक शाळेत अलगीकरणात ठेवण्यात आलेले कोरोनाबाधित रुग्ण हे रातोरात पळून गेले असल्याने गाव पातळीवरील कोरोना नियंत्रण दक्षता समिती नेमकी आहे तरी कुठे, असा उद्विग्न सवाल ग्रामस्थांमधून विचारला जात आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेत कोरोना दक्षता समिती ही अहोरात्र राबत होती. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी त्यावेळी वेळोवेळी निरनिराळ्या उपाययोजना केल्या जात होत्या. त्यामुळेच गावामध्ये कोरोनाचा संसर्ग रोखण्यात यंत्रणेला यश आले होते. मात्र दुर्दैवाने कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत राबणारी कोरोना दक्षता समिती व शासकीय यंत्रणा ही पूर्णता निष्क्रिय असल्याचे दिसून येत आहे.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्‍वभूमीवर घेण्यात आलेल्या ९७७ जणांच्या चाचणी अहवालात एकूण १६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यापैकी काही जणांना काल (दि. ९) रोजी केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये अलगीकरणात ठेवण्यात आले होते. मात्र हे रुग्ण शाळेतून रातोरात पळून गेले आहेत. कोरोनाबाधित असलेल्या रुग्णांचा वावर गावभर सुरू असल्याने कोरोना संसर्गाची बाधा अखंड गावालाच होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

तालुक्याचे तहसीलदार व संबंधित प्रशासकीय यंत्रणेने याची गांभीर्याने दखल घेऊन तत्काळ योग्य त्या उपाययोजना करणे गरजेचे आहे.

चौकट -

ज्या केंद्रीय प्राथमिक शाळेमध्ये अलगीकरणाची सोय करण्यात आली आहे, तिथे ना धड पाण्याची सोय आहे, ना लाइटची. ना तिथे रुग्णांच्या देखरेखीसाठी कोणत्याही शासकीय कर्मचाऱ्यांची उपस्थिती.

अलगीकरणात असणाऱ्या रुग्णांना आज सकाळी भेटण्यासाठी शाळेमध्ये गेलो असता त्या ठिकाणी एकही रुग्ण आढळून आला नाही. कोरोनाबाधितांसाठी त्या ठिकाणी कोणतीच व्यवस्था करण्यात आलेली नाही.

तानाजी भोसले (माजी सरपंच-शित्तूर-वारूण)

ील (सरपंच-शित्तूर-वारूण) आम्ही आमच्या पातळीवर सगळे प्रयत्न करीत आहोत. मात्र कोरोनाबाधित रुग्णांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळत नाही.

नीता पाटील (सरपंच-शित्तूर-वारूण)