शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

चंद्रकांतदादा, शेट्टी कोठे आहेत ?

By admin | Updated: December 13, 2014 00:27 IST

के. पी. पाटील यांचा सवाल : शेतकरी संघटना, राज्यकर्त्यांना ऊसदराचा विसर

कोल्हापूर : ऊस परिषदेत २५ नोव्हेंबरची डेडलाईन देणारे खासदार राजू शेट्टी व डेडलाईन अगोदर ऊसदराचा प्रश्न सोडवणारे सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील कोठे आहेत ? असा सवाल करत उसाचा प्रश्न शेतकरी संघटनेसह राज्यकर्ते विसरले असल्याचा टोला राष्ट्रवादी कॉँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष के. पी. पाटील यांनी हाणला.राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी पक्षाचे ज्येष्ठ नेते बी. एन. पाटील-मुगळीकर होते. पाटील म्हणाले, आघाडी सरकारच्या काळात राजू शेट्टी व विरोधकांनी पॅकेज व अनुदानाची मागणी करत सातत्याने टीका केली. आता ते सत्तेत आहेत. शेट्टींनीच सरकारला २५ नोव्हेंबरची डेडलाईन दिली होती. यावर इतके दिवस लागणार नाही, चुटकीसरशी उसाचा प्रश्न सोडवण्याची वल्गना मंत्री पाटील यांनी केली होती; पण त्यांना याची आठवण नाही. येथे उसाची ‘एफआरपी’ देण्यासाठी पैसे नाहीत. मात्र, कापसाला ‘एफआरपी’पेक्षा जास्त पैसे देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस करत आहेत. वेगळ्या विदर्भाचे बीज ते येथूनच पेरत असल्याची टीकाही त्यांनी केली. कॉँग्रेस पक्षापासून जनता बाजूला जात आहे. अशा परिस्थितीत राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खंबीरपणे जनतेचे प्रश्न घेऊन रस्त्यावर उतरले पाहिजे. टोलसह इतर सामाजिक प्रश्नांसाठी जिल्हा राष्ट्रवादी एकसंधपणे रस्त्यावर उतरेल, असेही पाटील यांनी यावेळी सांगितले.शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. त्याचबरोबर राष्ट्रवादी सभासद नोंदणीचा प्रारंभही पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस अनिलराव साळोखे यांनी प्रास्ताविकात सभासद नोंदणीची माहिती दिली. घरात एका जागी बसून नोंदणी न करता जनतेच्या दारात जाऊन नोंदणी करण्याचे आवाहनही त्यांनी केले. प्रा. किसन चौगुले यांनी मनोगत व्यक्त केले. राष्ट्रवादीचे कागल तालुकाध्यक्ष शिवानंद माळी यांनी आभार मानले. माजी आमदार नामदेवराव भोईटे, राजेंद्र पाटील-यड्रावकर, भैया माने, महिला राष्ट्रवादी जिल्हाध्यक्षा संगीता खाडे, कागलच्या नगराध्यक्षा आशाकाकी माने, ‘भोगावती’चे अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर, जिल्हा परिषद सदस्य ए. वाय. पाटील, बाबूराव हजारे, मुकुंद देसाई, बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर, रामराजे कुपेकर, प्रदीप पाटील, आप्पासाहेब धनवडे उपस्थित होते.