शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
3
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
4
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
5
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
6
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
7
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
8
लग्नानंतर ४ महिन्यांतच सूरज चव्हाण होणार बाबा? पत्नी संजनाचे बेबी शॉवरचे फोटो व्हायरल
9
व्हायरल 'IIT बाबा'ने गुपचूप लग्न उरकलं अन् फ्यूचर प्लॅनिंगही सांगितलं! आता त्याची पत्नी म्हणते.. 
10
रेल्वे रुळावर गॅस सिलेंडर ठेवून प्रवाशांचा काळ बनणार होते 'ते' दहशतवादी; एटीएसचा मोठा खुलासा!
11
केंद्र सरकारचा मोठा निर्णय! ५ किलो सिलेंडरसंदर्भात सर्व राज्य सरकारांना पत्र; दिले महत्वाचे आदेश
12
मोजतबा खामेनेई कोमात, ना युद्धाची माहिती, ना..., अमेरिका-इस्राइलला ठावठिकाणाही कळला?
13
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
14
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
15
Ghatkopar Crime: घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
16
Baramati bypoll Election: बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
17
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
18
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
19
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
20
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
Daily Top 2Weekly Top 5

साखर कारखान्यांना पाझर फुटणार कधी?

By admin | Updated: May 26, 2015 00:49 IST

दोनच कारखान्यांकडे दातृत्व : आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाबाबत उदासीन

प्रवीण देसाई  - कोल्हापूर -कर्जाचा डोंगर असाह्य झाल्याने मृत्यूला कवटाळणाऱ्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांची अवहेलना अद्याप संपलेली नाही. या पीडितग्रस्तांच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च करण्यासाठी साखर कारखान्यांनी त्यांना दत्तक घ्यावे, असा निर्णय झाला असताना जिल्ह्यातील शरद सहकारी साखर कारखाना, नरंदे (ता. हातकणंगले) व आजरा सहकारी साखर कारखाना वगळता एकाही कारखान्याने दातृत्व दाखविलेले नाही. दहा वर्षांत कर्जाची परतफेड न झाल्याने आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांची संख्या जिल्ह्यात ८५ पर्यंत आहे. त्यांच्यापैकी ६३ जण शासकीय सानुग्रह अनुदानास पात्र आहेत. त्यांच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांची परिस्थिती दयनीय आहे. त्यांची ससेहोलपट सुरू आहे. पोटाची खळगी भरताना त्यांना अनेक दिव्ये पार करावी लागत आहेत. त्यातच आपल्या पाल्याने शिकावे, असे कुठल्या आईला वाटणार नाही; परंतु दोन वेळच्या जेवणाची भ्रांत असताना शिक्षणाचा खर्च करायचा कुठून, असा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. त्यामुळे या मुलांचे भवितव्य अंधकारमय आहे. ९ डिसेंबर २००९ मध्ये तत्कालीन जिल्हाधिकारी लक्ष्मीकांत देशमुख यांची साखर कारखान्यांच्या प्रतिनिधींसमवेत बैठक झाली. यावेळी आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांना दत्तक घेऊन त्यांचे शिक्षण पूर्ण करण्याचा निर्णय झाला. आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या न्याय्य हक्कांसाठी लढणाऱ्या एका संघटनेने सुचविलेल्या ‘फॉर्म्युल्या’नुसार इयत्ता पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांसाठी २५०० रुपये व पाचवी ते दहावीच्या मुलांसाठी ५००० रुपये देण्याचे निश्चित झाले. प्रत्येक वर्षाला मिळणाऱ्या या रकमेमध्ये खंड पडू नये, यासाठी ही रक्कम ठेव म्हणून बँकेत ठेवून त्याच्या व्याजावर ही मदत त्या मुलांना द्यावी, असेही ठरले होते. परंतु, जिल्ह्यातील १८ साखर कारखान्यांपैकी शरद व आजरा साखर कारखाना सोडले, तर इतरांनी दातृत्व दाखविलेले नाही. कोल्हापूर जिल्हा प्रशासनाकडून वारंवार याबाबत पत्रव्यवहार करूनही त्याला ‘केराची टोपली’ दाखविल्याचे दिसत आहे. या दोन्ही साखर कारखान्यांनी आपली सामाजिक बांधीलकी जोपासत आपल्या कार्यक्षेत्रातील मुलांना दत्तक घेतले आहे.यांना घेतले दत्तकशरद साखर कारखान्याचे अध्यक्ष राजेंद्र पाटील-यड्रावकर यांनी आत्महत्याग्रस्त शेतकरी कै. संजय पाटील (रा. टाकवडे) यांचा मुलगा गंगाधर याच्या शिक्षणाचा खर्च उचलला आहे, तर आजरा साखर कारखान्याच्यावतीने कै. राजाराम भीवा धडाम (मोरेवाडी) यांच्यासाठी पांडुरंग याच्या शिक्षणासाठी मदत केली आहे.शेतकऱ्यांविषयी वरवरची आस्था दाखविणारे लोकप्रतिनिधी व शासकीय अधिकारी प्रत्यक्षात जेव्हा शेतकऱ्यांना मदतीची गरज असते, तेव्हा पाठ फिरवितात. या प्रश्नावर शुक्रवारी (दि.२२) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे. यावेळी सकारात्मक मार्ग निघाला नाही, तर पावसाळी अधिवेशनावेळी सरकारविरोधी मुंबईत आंदोलन करू.- शिवाजीराव परुळेकर, अध्यक्ष, जनता नागरी निवारा संघटना