शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

पाच हजारांची लाच घेताना दोघे जाळ्यात

By admin | Updated: February 28, 2015 00:26 IST

कनिष्ठ अभियंत्याचा समावेश : ‘लाचलुचपत प्रतिबंधक’ची कारवाई

कोल्हापूर : उचगाव (ता. करवीर) येथील महापालिकेच्या हद्दीत असलेल्या जागेच्या बांधकाम परवाना मंजुरीसाठी लाच मागितल्याप्रकरणी महापालिकेच्या ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयाचा कनिष्ठ अभियंता संशयित मिलिंद जनार्दन पाटील (वय ३५ रा. शासकीय विश्रामगृहाजवळ, ताराबाई पार्क, मूळ राहणार चिंचणी-वांगी ता. कडेगांव जि. सांगली) याला व संशयित मिलिंद केरबा वावरे (२५ रा. कसबा बावडा) या दोघांना शुक्रवारी दुपारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने लाच घेतल्याप्रकरणी अटक केली.संशयित मिलिंद वावरेला राजारामपुरी जनता बझार येथील विभागीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये तक्रारदाराकडून पाच हजारांची लाच स्वीकारताना पोलिसांनी रंगेहात पकडले. वावरेने मिलिंद पाटील याच्या सांगण्यानुसार लाच घेतल्याचे पोलिसांना सांगितले. त्यानुसार पाटीललाही पोलिसांनी अटक केली.याबाबत पोलिसांनी सांगितले की, उचगांव परिसरातील तक्रारदाराच्या वडिलांनी जागा घेतली आहे. तक्रारदार मूळ सौदलगा-निपाणी परिसरातील रहिवासी असून ते सध्या वकिली करतात. उचगाव येथील जागेवर घर बांधण्याकरिता तक्रारदारांचे वडील राजारामपुरी कार्यालयात कागदपत्रांची फार्ईल घेऊन गेले. त्याठिकाणी तेथील लिपीक देसाई यांनी फाईल पाहून ‘तुमच्या अभियंत्यांच्या परवान्याची मुदत संपली आहे. तुम्ही मिलिंद वावरे यांना भेटा,’असे सांगितले. त्याप्रमाणे ते वावरेला भेटले.‘माझ्या अधिकाऱ्यांशी ओळखी आहेत. तुमचे काम मी करून देईन. परंतु, महापालिकेतील अधिकाऱ्यांना देण्यासाठी माझ्याकडे ११ हजार रुपये द्यावे लागतील,’असे वावरेने त्यांना सांगितले. त्यानंतर तक्रारदारांनी चलनाने रक्कम भरून ती फाईल वावरे यांच्यामार्फत ताराराणी मार्केट विभागीय कार्यालयात दाखल केली. दरम्यान, गुरुवारी (दि. २६) याबाबत तक्रारदाराने समक्ष लाचलुचपत प्रतिबंधक कार्यालयात येऊन तक्रार दिली. ‘शुक्रवारी महापालिकेचे अधिकारी तुमच्या प्लॉटचा सर्व्हे करण्यासाठी येणार आहेत,’ असे वावरेने फोन करून तक्रारदारांना सांगितले. त्यावेळी ठरल्या ११ हजार रुपयांपैकी ५ हजार रुपये अ‍ॅडव्हान्स द्या, असे तक्रारदारास त्याने सांगितले. त्यानुसार राजारामपुरी विभागीय कार्यालयाच्या पार्किंगमध्ये मिलिंद वावरेला दुपारी तक्रारदारांकडून पाच हजार रुपयांची लाच स्वीकारताना पकडले. कारवाईत पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पद्मा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक उदयसिंह पाटील, पोलीस हेडकॉन्स्टेबल जितेंद्र शिंदे, अमर भोसले, मनोहर खणगांवकर आदींनी भाग घेतला