शहरं
Join us  
Trending Stories
1
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा
2
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
3
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
4
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
5
“त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय घेणार”; CM फडणवीसांनी केले स्पष्ट
6
ENG vs IND : फलंदाजांनी आपलं काम केलं! टीम इंडियानं हा मंत्र जपला तर विजय पक्का, पण...
7
“स्वसंरक्षणाचा इराणला पूर्ण अधिकार”; रशियाने स्पष्टच सांगितले, तणाव वाढण्याची चिन्हे
8
ठरले! महादेव बाबर NCPमध्ये करणार प्रवेश; DCM अजित पवार राहणार उपस्थित, पुण्यात ताकद वाढणार
9
कुर्ला-सायनदरम्यान ओव्हरहेड वायर तुटली; मध्य रेल्वेच्या जलद फेऱ्या ठप्प, प्रवाशांचे हाल
10
"...तेलाच्या किमती कमी ठेवा, मी बघतोय!" इराण-इस्रायल युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्प यांचं मोठं विधान
11
ENG vs IND: KL राहुल-पंतच्या सेंच्युरीनंतर जड्डूची उपयुक्त खेळी! इंग्लंडसमोर ३७१ धावांचे टार्गेट
12
इस्रायलचा इराणवर मोठा हल्ला, ५० हून अधिक लढाऊ विमानांचा कहर; महत्त्वाच्या लष्करी तळांवर तुफान बॉम्बिंग
13
"२०२२ मध्ये केवळ वादळ होतं, २०२७ मध्ये....", पोटनिवडणुकीच्या निकालानं केजरीवाल खूश, केली मोठी भविष्यवाणी
14
खामेनेई पळून जाण्याच्या तयारीत! इराणच्या माजी युवराजांचा दावा, 'सुप्रीम लीडर'बद्दल काय म्हणाले?
15
२८ जुलैचा दावा खरा होणार? तिसरे महायुद्ध अटळ? बाबा वेंगा-नास्त्रेदमस यांची मोठी भविष्यवाणी
16
"तमीज से खेलने के चक्कर में..." कडक खेळी शिवाय पंतची 'मन की बात' चर्चेत (VIDEO)
17
राजाच्या पैशानेच बनली त्याच्या मृत्यूची योजना! लग्नाआधीच सुरू केलेलं नवं खातं, सोनमनं तेच पैसे वापरले अन्... 
18
रिषभ पंतला तोड नाय! सेंच्युरीसह रचला इतिहास; स्टेडियम स्टँडमधून गावसकरांचा 'कोलांटी उडी' मार असा इशारा
19
७६ लाख रहस्यमय मतांबाबतच्या याचिकेवर हायकोर्टात सुनावणी पूर्ण; प्रकाश आंबेडकरांनी मांडली बाजू
20
आषाढी वारीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ सहभागी होणार; दिवसभर दिंडीसोबत चालणार

दहा हजारांची लाच घेताना ‘करवीर’च्या पोलिसाला अटक

By admin | Updated: June 11, 2014 01:15 IST

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई

कोल्हापूर : गुन्ह्यातील दोषारोपपत्र न्यायालयात लवकर पाठविण्यासाठी १० हजार रुपयांची लाच घेताना आज, मंगळवारी करवीर पोलीस ठाण्याचा पोलीस नाईक सुरेश रामचंद्र लोहार याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोलिसांनी अटक केली. रात्री साडेनऊ वाजता दसरा चौक मैदानात त्यांनी ही कारवाई केली. हा प्रकार समजताच पोलीस वर्तुळात एकच खळबळ उडाली. बाजीराव तुकाराम पाटील (रा. आमशी, ता. करवीर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार पोलिसांनी ही कारवाई केली.याबाबत माहिती अशी : बाजीराव पाटील यांचा पुतण्या सुनील राजाराम पाटील याला बलात्कारप्रकरणी करवीर पोलिसांनी अटक केली असून, तो सध्या बिंदू चौकातील कारागृहात आहे. त्याच्यावरील गुन्ह्याबाबतचे दोषारोपपत्र न्यायालयात केव्हा पाठविणार, अशी विचारणा तक्रारदार पाटील यांनी पोलीसनाईक लोहारकडे केली. त्यावर मला २० हजार रुपये द्या, दोषारोपपत्र लवकर पाठवितो असे त्याने सांगितले. त्यावर पाटील आणि लोहार यांच्यात चर्चा होऊन १० हजार रुपयांवर तडजोड झाली. त्यावेळी लोहारने आज रक्कम घेऊन येण्यास सांगितले होते. त्याबाबतची तक्रार पाटील यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला दिली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लावला. रात्री साडेनऊ वाजता दसरा चौक मैदानात पाटील यांच्याकडून १० हजार रुपयांची लाच घेताना लोहार याला पोलिसांनी रंगेहात पकडले. लाचलुचपत विभागाच्या सापळ्यात सापडत असल्याचे लक्षात येताच लोहारने लाच म्हणून घेतलेले पैसे या मैदानातच फेकून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला पोलिसांनी पकडले. या कारवाईत पोलीस अधीक्षक सारंग आवाड यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस उपअधीक्षक उदय आफळे, पोलीस उपअधीक्षक पद्मा कदम, पोलीसनाईक जितेंद्र शिंदे, मनोज खोत, पोलीस कॉन्स्टेबल संदीप पावलेकर, दयानंद कडूकर, उल्हास हिरवे यांनी सहभाग घेतला. (प्रतिनिधी)