शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
“शशिकांत शिंदे हे मूळचे शिवसैनिक, शिवसेनेत आल्यास पहिले स्वागत मी करेन”; कुणी दिली ऑफर?
3
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
4
शेअर बाजाराची दमदार सुरुवात, Sensex ५०० अंकांनी वधारला; Bank Nifty मध्ये ७०० अंकांची जोरदार तेजी, मात्र IT Stocks मध्ये विक्री
5
STचा सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा; मोफत प्रवास पाससोबत डिजिटल NCMC प्रणालीची जोड
6
TCS Salary Hike 2026: टीसीएस जवळपास ६ लाख कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! सॅलरी वाढीवर आली मोठी अपडेट, जाणून घ्या
7
विशेष लेख: बारामती पोटनिवडणुकीत काँग्रेसने माघार घेतली तर आधी अट्टाहास का केला?
8
‘घोस्ट मर्मर’! ६४ किमीवरून ओळखली धडधड.. अमेरिकेच्या इतिहासातील सर्वांत धाडसी शोध
9
मध्यस्थीच्या नादात पाकिस्तान तोंडघशी! मध्यस्थी करताना निष्पक्ष राहा म्हणत इस्रायलने सुनावले खडेबोल
10
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
11
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
12
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
13
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
14
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
15
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
16
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
17
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
18
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
19
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
20
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
Daily Top 2Weekly Top 5

घनकचऱ्यावर प्रक्रिया कधी?

By admin | Updated: April 19, 2015 01:09 IST

विभागीय आयुक्तांची आयुक्तांना विचारणा : पंचगंगा प्रदूषण प्रश्नी घेतला आढावा

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेअंतर्गत १६५ टन नागरी घनकचरा प्रतिदिन निर्माण होतो. या घनकचरा निर्मितीवर प्रक्रिया कधी करणार, असा प्रश्न आयुक्त पी. शिवशंकर यांना करून या प्रश्नावर लवकरात लवकर तोडगा काढावा, अशा सूचना पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्कलिंगम यांनी शनिवारी येथे दिल्या. पंचगंगा प्रदूषणासंदर्भात कोल्हापूर महानगरपालिका, इलचकरंजी नगरपालिका, औद्योगिक वसाहती, जिल्हा परिषद, निरी, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांची आढावा बैठक जिल्हाधिकारी कार्यालयात विभागीय आयुक्त चोक्कलिंगम यांच्या अध्यक्षतेखाली झाली. चोक्कलिंगम यांनी १६५ टन नागरी घनकचरा प्रतिदिन निर्माण होतो. या घनकचरा निर्मितीवर प्रक्रिया कधी करणार, असा प्रश्न महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांना विचारून लवकर तोडगा काढावा, अशी सूचना केली. महानगरपालिकेच्या हद्दीतील ३५ टक्के क्षेत्रात भुयारी गटारे नाहीत त्याबाबतचेही नियोजन तत्काळ करावे. यासाठी जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी भूसंपादनामध्ये येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी संबंधितांची बैठक घ्यावी, अशा सूचनाही त्यांनी दिल्या. प्रदूषण नियंत्रण महामंडळाने न्यायालयाच्या आदेशान्वये कोणती कार्यवाही सुरू केली आहे. ‘निरी’ने केलेल्या शिफारशींचे पालन कसे केले जात आहे. जनजागृती कशी केली जात आहे. पंचगंगा प्रवाहित ठेवण्यासाठी कोणते प्रयत्न केले जात आहेत. सांडपाणी व मैला, घनकचरा, जैव वैद्यकीय कचरा, द्रवकचरा यांच्यावरील प्रक्रिया व व्यवस्थापन, आदी बाबींचा सविस्तर आढावा चोक्कलिंगम यांनी यावेळी घेतला. इचलकरंजी नगरपालिकेने प्रतिदिन १०० टन निर्माण होणाऱ्या नागरी घनकचरा यावर प्रक्रिया प्रकल्प उभारणीसाठी प्रयत्न करावेत. शहरात अद्यापही ४० टक्के क्षेत्रात भुयारी गटारे नाहीत ती आॅगस्टपर्यंत पूर्ण करून घ्यावीत. तसेच जे प्रोसेसिंग युनिट पंचगंगेत थेट सांडपाणी मिसळतात त्यांच्यावर कठोर कारवाई करावी, अशा सूचना दिल्या. (प्रतिनिधी)