शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

‘स्वबळ’ म्हणजे काय रे भाऊ ?

By admin | Updated: December 22, 2016 23:46 IST

कार्यकर्त्यांना प्रश्न : जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका

ज्योतीप्रसाद सावंत ल्ल आजरानगरपंचायतीचे वादळ शमते न शमते तोच आता जिल्हा परिषद निवडणुकांची रणधुमाळी सुरू झाली आहे. राष्ट्रीय काँगे्रस, राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपची नेतेमंडळी या निवडणुका ‘स्वबळावर’ लढणार अशी भीमगर्जना करू लागले आहेत. सुरुवातीला स्वबळाची भाषा व शेवट आघाडी, स्थानिक आघाडी, महाआघाडी, युती असाच होत असल्याने कार्यकर्त्यांना आता ‘स्वबळ’ म्हणजे काय रे भाऊ? असा प्रश्न विचारावा लागत आहे.जिल्हा परिषदेच्या निवडणुकांची आचारसंहिता व निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. जागावाटपात दबाव निर्माण करण्यासाठी प्रमुख पक्षांची नेतेमंडळी ‘स्वबळावर’ निवडणुकीला सामोरे जाण्याची भाषा करीत आहेत. प्रथम स्वबळाची भाषा त्यानंतर ज्या पक्षासोबत निवडणुकीला सामोरे जायचे त्या पक्षासोबत वाटाघाटीच्या फेऱ्या, ताणाताणी आणि शेवटी एखाद्या ठिकाणी ‘मैत्रिपूर्ण’ लढतीचे गोंडस नाव देऊन इतरत्र आघाडी प्रमुखांचा गळ्यात गळे घालून, हात उंचावून विजयाची खूण करीत दिसणारी छायाचित्रे, असा प्रकार वारंवार जिल्हा, गावपातळीपासून अनुभवताना दिसतो आहे.स्वबळाच्या भाषेत जोर असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या फळीतील कार्यकर्ते नेटाने कामाला लागतात. यामुळे अनेक ठिकाणी एकमेकांच्या विरोधातील कार्यकर्त्यांमध्ये संघर्ष होताना दिसतो. हा संघर्ष अगदी शिवीगाळ, मारामारी, बाचाबाची असा होऊन पोलिस ठाण्याच्या दारापर्यंत कधी गेला, हे कार्यकर्त्यांच्याही लक्षात येत नाही. काही कार्यकर्त्यांना ज्या पक्षासाठी अथवा संघटनेसाठी पोलिस ठाण्याचे उंबरे झिजवावे लागतात. त्यापैकी वरिष्ठ नेत्यांच्या तडजोडीमुळे अनेक पक्ष, संघटन यांची चिन्हेदेखील गायब होताना दिसतात.