शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
2
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
3
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
4
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
5
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
6
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
7
Health Tips: लघवीची दुर्गंधी म्हणजे केवळ उष्णता नव्हे, तुमच्या शरीराने दिलेला 'हा' गंभीर इशारा असू शकतो!
8
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
9
'स्ट्रेट ऑफ होर्मुझ'मध्ये ट्रॅफिकजाम; युद्धविरामानंतरही १०००+ जहाजे अडकून पडली...
10
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
11
Summer Special: भेळ तर नेहमीच खाता, पण 'हा' सिक्रेट' मसाला वाढवेल सुकी भेळेची लज्जत
12
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
13
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
14
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
15
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
16
Latest Marathi News Live: डहाणूला जाणाऱ्या लोकलची म्हशीला धडक; उपनगरीय रेल्वे सेवा विस्कळीत, गाड्या १५ मिनिटे उशिराने
17
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
18
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
19
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
20
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
Daily Top 2Weekly Top 5

पोटनिवडणुकीच्या जय-पराजयात दडलंय काय?

By admin | Updated: April 17, 2015 00:13 IST

नव्या नेतृत्वाचा उदय : तासगाव-कवठेमहांकाळ मतदारसंघाला पहिल्या महिला आमदार

अर्जुन कर्पे - कवठेमहांकाळ -तासगाव-कवठेमहांकाळच्या राजकीय पटलावर सुमनताई रावसाहेब पाटील या नव्या महिला नेतृत्वाचा उदय झाला. या मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीने भविष्यातील राजकारणाची अनेक बीजे पेरली गेली, तर अनेक प्रश्नही निर्माण केले, परंतु सुमनताई पाटील यांच्या विजयात आणि अपक्ष उमेदवाराच्या पराभवात दडलंय काय, याची चर्चा मतदारसंघात जोरदार सुरू आहे. खासदार संजयकाका पाटील यांचे या पोटनिवडणुकीत शांत राहणे आणि माजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांचे या निवडणुकीत भाग घेणे, या दोन भूमिका भविष्यातील राजकीय संघर्षाच्या व नवीन राजकीय समीकरण निर्माण करणाऱ्या ठरणार आहेत.सुमनताई पाटील यांनी विजय मिळवून मतदारसंघाचे नेतृत्व स्वीकारले, परंतु आर. आर. पाटील तथा आबांची अफाट लोकप्रियता, सर्वसामान्यांचे आबांवरील प्रेम, त्यांनी मतदारसंघात केलेली अफाट विकासकामे याचा सुमनतार्इंच्या विजयात मोठा वाटा आहे. विकास हा मुद्दा बाजूला राहून भावनेच्या आधारावर ही पोटनिवडणूक लढली गेली. सुमनताई पाटील यांच्यारूपाने तासगाव - कवठेमहांकाळ मतदारसंघाला पहिल्या महिला आमदार लाभल्या. मतदारसंघातील राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दु:खातून बाहेर काढून आधार देणे, हे काम त्यांना प्रथम करावे लागणार आहे. राष्ट्रवादी कार्यकर्त्यांमध्ये तसेच पहिल्या व दुसऱ्या फळीतील नेत्यांमध्ये असणारे गटा-तटाचे राजकारण संपवावे लागणार आहे. त्याचबरोबर मतदारसंघातील शेतीच्या पाण्याचा प्रश्न त्यांना प्रामुख्याने सोडवावा लागणार आहे. ढालगाव परिसराला आबांनी दिलेला टेंभू योजनेचा शब्द त्यांना पूर्ण करावा लागणार आहे. अशा अनेक विकास कामांना प्राधान्य देऊन मतदारसंघातील कार्यकर्त्यांना संपर्कात ठेवण्याचे मोठे आव्हान त्यांना पेलावे लागणार आहे.भाजपचे बंडखोर स्वप्नील पाटील यांच्या पराभवात अनेक राजकीय बाबी लपल्या आहेत. मुळात ही पोटनिवडणूक बिनविरोध व्हावी, असे सर्वसामान्य जनतेला वाटत होते. परंतु स्वप्नील पाटील यांनी पोटनिवडणुकीत उडी घेतल्याने यामागे कोणाची राजकीय चाल असावी, असा प्रश्न मतदारसंघात निर्माण झाला. अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्नील पाटील यांच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतल्याने ही पोटनिवडणूक सुमनताई पाटील विरोधात घोरपडेंचे कार्यकर्ते असे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्ष मतदानादिवशी कवठेमहांकाळ तालुक्यात असेच चित्र दिसत होते. स्वप्नील पाटील यांच्या पराभवातून घोरपडे गटाचे राजकीय मनसुबे मतदारांनी उधळल्याचे स्पष्ट झाले आहे.या पोटनिवडणुकीत अनेक राजकीय बीजे पेरली गेली आहेत, तर भविष्यातील राजकारणही लपले आहे. प्रश्न आहे तो या राजकीय पटलावर भविष्यात कोण कशी चाल खेळतो हाच. घोरपडे गटाच्या भूमिकेला मतदारांनी नाकारले. या पोटनिवडणुकीत खा. पाटील यांचे शांत राहणे, तर घोरपडे यांचे निवडणूक प्रक्रियेत सहभाग घेणे, या दोन्ही भूमिका भविष्यातील राजकीय संघर्षाच्यादृष्टीने महत्त्वाच्या व मतदारसंघातील राजकारण स्पष्ट करणाऱ्या ठरणार आहेत. पोटनिवडणुकीच्या जय-पराजयात भविष्यातील राजकीय संघर्षाची बीजे पेरली गेल्याचे चित्र स्पष्ट दिसत आहे.घोरपडे गटाला मतदारांनी नाकारलेमाजी राज्यमंत्री अजितराव घोरपडे यांच्या कार्यकर्त्यांनी स्वप्निल पाटलांच्या प्रचाराची सूत्रे हाती घेतल्याने ही पोटनिवडणूक सुमनताई पाटील विरोधात अजितराव घोरपडेंचे कार्यकर्ते, असे चित्र निर्माण झाले. प्रत्यक्ष मतदानादिवशी कवठेमहांकाळ तालुक्यात मतदार कार्यकर्ते असे चित्र निर्माण झाले. स्वप्निल पाटील यांच्या पराभवातून घोरपडे गटाचे राजकीय मनसुबे मतदारांनी उधळल्याचे स्पष्ट झाले आहे.भाजपचे घोरपडे स्वप्निल पाटील यांच्या प्रचारात सक्रिय सहभागी झाले असताना खासदार संजयकाका पाटील यांनी मात्र प्रचारात सहभाग घेतला नव्हता. त्यांच्या कार्यकर्त्यांनीही राष्ट्रवादीला मदत केल्याचे मतदानाच्या टक्केवारीवरून स्पष्ट दिसत आहे. एवढेच नव्हे, तर संजयकाका पाटील यांच्या चिंचणी या गावातही सुमनताई पाटील यांना मतदानाची आघाडी मिळाली आहे.आर. आर. पाटील (आबा) यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले होते. या कार्यकर्त्यांमध्ये निवडणुकीतील विजयानंतर उत्साह दिसत असल्याचे चित्र आहे.