शहरं
Join us  
Trending Stories
1
"शरद पवारांचा वारकरी विचारांशी फार संबंध नाही, कारण...", 'त्या' विधानावर मुख्यमंत्री फडणवीसांचे रोखठोक उत्तर
2
"रिकामी तेल जहाजे प्रचंड संख्येने अमेरिकेकडे येताहेत", पाकिस्तानात चर्चा सुरू असताना डोनाल्ड ट्रम्प यांचं विधान
3
CSK vs DC : कडक फिफ्टी; संजूसोबत तगडी भागीदारी; तरी Ayush Mhatre वर का आली Retired Out होण्याची वेळ?
4
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना ह्रदयविकाराचा झटका, ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू
5
रानगव्याच्या हल्ल्यात शेतकरी रक्ताच्या थारोळ्यात! शिंग छातीत घुसल्याने शामराव कोराणे यांचा मृत्यू
6
Sanju Samson Century : संजू सॅमसन पेटला! सलग तीन सामन्यातील फ्लॉप शोनंतर 'शतकी' कमबॅक
7
"वारकरी संप्रदायात प्रतिगामी लोकांची घुसखोरी, धर्मांध शक्तींना बळ देणारी मांडणी", शरद पवार यांचे विधान
8
'सरपंच साब' श्रेयस सह प्रियांश-प्रभसिमरनचा जलवा! सनरायझर्स हैदराबादसमोर पंजाब किंग्सचा भांगडा
9
१३ कोटी भारतीयांना मोठा धक्का! स्मार्ट टीव्हीवरचे फ्री चॅनेल्स होणार बंद? जाणून घ्या नेमकं कारण
10
इराणने इस्लामाबादमध्ये अमेरिकेसमोर ठेवल्या ४ कडक अटी; आता चेंडू बायडेन-ट्रम्पच्या कोर्टात
11
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
12
IPL 2026, PBKS vs SRH: Priyansh Arya चं वादळी अर्धशतक! Nicholas Pooran चा विक्रम मोडला
13
Relationship: तुमचं जोडीदारावर खूप प्रेम आहे? फक्त 'या' ५ गोष्टी करा! कधीच तुटणार नाही तुमचं नातं!
14
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
15
IPL 2026: भर मैदानात विराट कोहलीचा नागिन डान्स; आरसीबीच्या खेळाडूंसह प्रेक्षकांनाही हसू आवरलं नाही!
16
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
17
अंधश्रद्धेचा अघोरी कळस! सापाने चावलेल्या मुलाला हात-पाय बांधून गंगा नदीत लटकवले; १२ तास मृत्यूशी झुंज, शेवटी...
18
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
19
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
20
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
Daily Top 2Weekly Top 5

फडणवीस सरकारने काय दिवे लावले माहीत आहेत;चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्ली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 4, 2020 12:23 IST

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.

ठळक मुद्देसत्तेवर असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावले? : विजय वडेट्टीवारसारथीला ५० कोटी दिले; ५०० कोटी दिल्यासारखे विरोधक वागतात

कोल्हापूर : सत्तेवर असताना फडणवीस सरकारने काय दिवे लावलेत माहीत आहेत, असा टोला मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी शुक्रवारी लगावला. राज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवला असता, असे वक्तव्य करणाऱ्या भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांना दोन दिवसांचा कालावधीही जास्त होईल, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली.

कोल्हापूर दौऱ्यावर आल्यावर ते पत्रकारांशी बोलत होते. सारथीसाठी ५० कोटींचा निधी दिला असताना ५०० कोटींचा निधी दिल्यासारखे विरोधक वागत आहेत. कोकणातील चक्रीवादळाचा पंचनामा नाही, मदत नाही, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्याचाही समाचार त्यांनी यावेळी घेतला.

मंत्री वडेट्टीवार म्हणाले, सारथी (छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था, पुणे) सुरू झाल्यानंतर सत्ता बदलली. मागील सरकारने केवळ ५० कोटींचा निधी दिला. आमची सत्ता आल्यानंतर आम्हीही ५० कोटी दिले.

अर्थसंकल्पात ५५० कोटी रुपयांची तरतूद केली आणि आम्ही ती दिली नाही, असे झाले नाही. मात्र विरोधक नको त्या टीका करीत आहेत. आम्ही कुठेही कमी पडत नाही. कोरोनाच्या संकटात विरोधकांनी समजून घ्यावे. 

चंद्रकांत पाटील यांच्या वक्तव्याची खिल्लीराज्यात फडणवीस सरकार असते, तर कोरोनाचा मुद्दा केवळ दोन दिवसांत सोडवण्यात आला असता, असे वक्तव्य भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले आहे. याबाबत आपले काय मत आहे, असे विचारल्यानंतर वडेट्टीवार म्हणाले, दोन दिवसांचा कालावधीही त्यांना जास्त होईल, असे मला वाटते. ते दोन मिनिटांतच तो सोडवतील, असे उपहासात्मक टोला लगावून पाटील यांच्या वक्तव्याची त्यांनी खिल्ली उडविली. 

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारkolhapurकोल्हापूरchandrakant patilचंद्रकांत पाटीलDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस