शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
2
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
3
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
4
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
5
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
6
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
7
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
8
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
9
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
10
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
11
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
12
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
13
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
14
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
15
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
16
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!
17
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
18
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
19
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
20
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा

वासनांधांचे काय करावे?-- समाजभान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2017 01:20 IST

पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून झाला. कुरुंदवाड येथे एका नऊ वर्षांच्या मुलीचा ४५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक छळ केला. गेल्या दोन-तीन दिवसांत वर्तमानपत्रात वाचायला मिळालेल्या या बातम्या.

ठळक मुद्देलैंगिक अत्याचाराला बळी पडणाºया महिलांची संख्या खूप मोठी आहेकाही पुरुषांनी असा आवाज उठविणाºया महिलांविरुद्ध मोहीम सुरू केली आहेसंबंध उघड होताच त्या पुरुषावर सगळे ढकलून आपण नामानिराळ्या होणाºया काही महिला असतीलही

- चंद्रकांत कित्तुरे

पुण्यात आठ वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून झाला. कुरुंदवाड येथे एका नऊ वर्षांच्या मुलीचा ४५ वर्षांच्या नराधमाने लैंगिक छळ केला. गेल्या दोन-तीन दिवसांत वर्तमानपत्रात वाचायला मिळालेल्या या बातम्या. तसे पाहिले तर महिलांवरील अन्याय अत्याचाराची बातमी वर्तमानपत्रात किंवा दूरचित्रवाणी वाहिन्यांवर नाही असा एकही दिवस जात नाही. बलात्कार, लैंगिक अत्याचार, लग्नाच्या आमिषाने फसवणूक, चारित्र्याच्या संशयावरून छळ, हुंड्यासाठी छळ अशा अनेकप्रकारे महिलांवर अत्याचार होत असल्याचे या बातम्या वाचल्यानंतर आपल्या लक्षात येते.

एका बाजूला महिलांना समान दर्जा देण्याची भाषा बोलायची आणि दुसºया बाजूला पुरुषी वर्चस्व कसे कायम राहील, हे पहायचे, हा दुटप्पीपणा आपल्या समाजात पदोपदी जाणवतो. बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी कितीही कडक कायदे केले तरी त्यांचा धाक नसल्याचेच या घटना पाहता म्हणावेसे वाटते. सुरुवातीला ज्या दोन घटनांचा उल्लेख केला त्या तर अतिशय चीड आणणाºया आहेत.आठ, नऊ वर्षांच्या अजाण मुलींसोबत असे प्रकार करताना या वासनांधांना त्यांच्या आया-बहिणी आठवत नसतील का? त्यांना होणारा त्रास पाहून काही वाटत नसेल का? की केवळ विषय वासना शमविण्यासाठी बालिका असो की वृद्धा की आणखी कुणी तुटून पडायचे इतकाच अशा वासनांधांचा एककलमी कार्यक्रम असतो, असे या घटना वाचून म्हणावेसे वाटते. बरे असे प्रकार करते कोण तर त्या जवळच्याच व्यक्ती असतात.

कुणी शेजारी असतो, कुणी ओळखीचा असतो तर कुणी नातेवाईक असतो. अगदी नात्याला काळिमा फासणाºया लैंगिक अत्याचाराच्या घटनाही घडतात. लहान वयात अशा लैंगिक अत्याचाराला बळी पडणाºया महिलांची संख्या खूप मोठी आहे. अशा अत्याचाराच्या पोलिसांपर्यत गेलेल्या घटनाच आपल्याला समजतात. समाजाच्या, अब्रुच्या भीतीने अनेकजणी असे अत्याचार मूकपणे सहन करत असतात, सोसत असतात. अशा अत्याचाराला बळी पडलेल्या महिलांनी आपल्यावरील अत्याचाराच्या या प्रकारांना वाचा फोडली आहे ती एका समाजमाध्यमातील घटकामधून. टिष्ट्वटर हे त्याचे नाव.

‘हॅश मीटू’ या हॅशटॅगखाली सुरू असलेल्या या वाचाफोड मोहिमेला जगभरातल्या महिलांकडून मोठा प्रतिसाद मिळत आहे. अनेक महिला त्यावर व्यक्त होऊ लागल्या आहेत. यात सेलिब्रिटीसह सर्व स्तरातील, वयोगटातील महिला आहेत. बॉलिवूडमधल्या अनेक सेलिब्रिटी या मोहिमेत व्यक्त झाल्या आहेत. आपले अनुभव त्यांनी शेअर केले आहेत. त्यांच्या या मोहिमेत महिलांवरील लैंगिक अत्याचाराविरुद्ध आवाज उठविणारे पुरूषही सहभागी झाले आहेत. तर काही पुरुषांनी असा आवाज उठविणाºया महिलांविरुद्ध मोहीम सुरू केली आहे. त्यांना धमक्या देण्यांसह विविध प्रकारचे हातखंडे वापरले जात आहे. हे रोखण्याची विनंती टिष्ट्वटरला केली. मात्र त्यास नकार मिळाल्यानंतर टिष्ट्वटर अकौंटच बंद करणाºया महिलांची संख्याही लक्षणीय आहे. या मोहिमेमुळे अत्याचारित महिलांना न्याय मिळेल असे वाटत नाही. पण या प्रश्नाची तीव्रता किती भयावह आहे, हे तरी किमान कळाले.

यातून महिला अत्याचाराच्या विरोधात समाजमन तयार झाले तरी ते खूप मोठे यश मानावे लागेल. निर्भया प्रकरणानंतर लैंगिक अत्याचाराविरुद्ध केंद्र सरकारने कठोर कायदा केला आहे. अगदी फाशीची तरतूदही केली आहे. यानुसार गुन्हे नोंद होऊन खटले चालत आहेत. शिक्षा होत आहेत. तरी अशा घटना कमी होत नाहीत. सर्वच प्रकरणामध्ये पुरुषच दोषी असतात, असेही नाही. आपल्या अंगावर येतंय असे वाटताच किंवा लपून छपून चालू असलेले संबंध उघड होताच त्या पुरुषावर सगळे ढकलून आपण नामानिराळ्या होणाºया काही महिला असतीलही पण म्हणून समस्त स्त्रीवर्गाला त्या पठडीत बसविण्याचा प्रयत्न काही महाभागांकडून सुरू असतो. तो थांबला पाहिजे. लंैगिक अत्याचार करणाºयाला भरचौकात फाशी देण्याची तरतूद केली तरच अशा वासनांधांना जरब बसेल. 

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाsexual harassmentलैंगिक छळ