शहरं
Join us  
Trending Stories
1
Asha Bhosale: सूरसम्राज्ञी आशा भोसले अनंतात विलीन, दिग्गज गायकांनी गाणं गाऊन दिली अखेरची स्वरांजली
2
होर्मुझ सामुद्रधुनीवर ब्रिटन-फ्रान्सचा 'बिग प्लॅन'; ४० देशांना एकत्र आणणार, ट्रम्प यांना डच्चू
3
दिल्ली, हरयाणा, पंजाबमधील CCTV चे फुटेज थेट पाकिस्तानला, चिनी कॅमेऱ्यातून भारताची हेरगिरी
4
सिंगल चार्जवर ३२० KM रेंज...किंमत फक्त ₹१.२९ लाख! Ola ची नवीन EV स्कूटर लॉन्च
5
Latest Marathi News LIVE: सूरसम्राज्ञी आशा भोसले पंचत्वात विलीन, चाहत्यांनी साश्रू नयनांनी दिला अखेरचा निरोप
6
बालेन शाह यांनी PM मोदींना भेटण्यासाठी ठेवली अट; नेपाळ-भारत संबंध पुन्हा सुधारणार
7
"काही लोकांना ४ लग्नांची सूट, भाजप सत्तेत आल्यास...";  अमित शाह यांनी बंगालमध्ये सभा गाजवली, स्पष्टच बोलले
8
इराणी नेत्यांच्या सुरक्षेसाठी पाकिस्ताननं अख्खी ताकद पणाला लावली; कसं केले होते नियोजन?
9
सीलिंग फॅन की टेबल फॅन? वीज बिल वाचवण्यासाठी कोणता पर्याय सर्वोत्तम? खरेदीपूर्वी नक्की वाचा
10
"US-इराणमध्ये तयार होता अंतिम करार; शेवटच्या क्षणी आला एक कॉल अन् २१ तासांची चर्चा फिस्कटली"
11
श्रीलंकेत भारताची मोठी खेळी; खरेदी केली मोठी शिपबिल्डिंग कंपनी, चीन पाहतच राहिला
12
आशा भोसलेंची नात जनाईला धीर द्यायला पोहोचला 'मानलेला भाऊ' मोहम्मद सिराज, पाहा VIDEO
13
Garud Puran: गरुड पुराणानुसार मृत्यूपूर्वी मिळतात 'हे' रहस्यमयी संकेत; अखेरच्या काळात नेमकं काय घडतं?
14
MPSC भरती प्रक्रियेत मोठा बदल; राज्य मंत्रिमंडळाने घेतले ७ महत्त्वाचे निर्णय, जाणून घ्या
15
आले कधी अन् गेले कधी, समजलंच नाही! आयपीएलमध्ये सर्वात कमी धावसंख्येवर ऑलआउट झालेले संघ
16
८ व्या वेतन आयोगाची बंपर भरती; १.८० लाख रुपये महिना पगार, जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
17
पत्नीला काम सांगायचे म्हणून मुलाने केला पित्याचा खून; गडचिरोलीतील धक्कादायक घटना
18
Kalyan Accident: कल्याण-अहिल्यानगर महामार्गावर भीषण अपघात; ११ जणांचा मृत्यू, दोन गंभीर
19
IPL 2026: "सरळ मैदानाबाहेर जा...!" लाईव्ह सामन्यात सुनील गावस्कर आरसीबीच्या खेळाडूवर भडकले
20
इस्रायलचा महात्मा गांधी हॉस्पिटलवर हल्ला; सगळीकडे विध्वंस, इराणनं शेअर केला Video
Daily Top 2Weekly Top 5

‘पी.एन.’नी काय उजेड पाडला

By admin | Updated: January 17, 2017 00:30 IST

धैर्यशील पाटील, पवार यांचा पलटवार : पारदर्शकतेमुळेच ‘भोगावती’ कर्जमुक्तीकडे

कोल्हापूर : गेल्या पाच वर्षांत पारदर्शक कारभार केल्यामुळेच भोगावती साखर कारखाना कर्जमुक्तीकडे चालला आहे; पण आमच्यावर आरोप करणाऱ्यांनी वीस वर्षे सत्ता असताना पी.एन. पाटील यांनी काय उजेड पाडला, सूज्ञ सभासदांना माहिती आहे, असा पलटवार परिते (ता. करवीर) येथील भोगावती साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील-कौलवकर व माजी उपाध्यक्ष अशोक पवार-पाटील यांनी सोमवारी पत्रकार परिषदेत कॉँग्रेसवर केला. ‘राष्ट्रवादी काँग्रेसमुळे कारखाना मोडला’ अशी टीका काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष पी.एन. पाटील यांनी रविवारी परिते येथील मेळाव्यात केली होती. त्यावर राष्ट्रवादी, शेकाप, जनता दल व आमदार चंद्रदीप नरके गटाच्यावतीने पत्रकार परिषदेत कॉँग्रेसवर जोरदार हल्ला चढविला. धैर्यशील पाटील म्हणाले, ‘भोगावती’ची सलग वीस वर्षे सत्ता कॉँग्रेसकडे होती. त्या काळात कारखाना ३५ कोटींच्या संचित तोट्यात, २८ कोटींचे कर्ज, २२ कोटींची देणी अशा आर्थिक अरिष्टात सापडला होता. सूज्ञ सभासदांनी परिवर्तन करून राष्ट्रवादी आघाडीच्या ताब्यात कारखाना दिला. त्यानंतर संचित तोटा २९ कोटींनी कमी केला. कर्मचाऱ्यांचा सात महिन्यांचा पगार देऊन नियमित पगार देण्याचा प्रयत्न केला. सध्या कारखान्यावर १९ कोटींचे सॉफ्ट लोन तर तेवढेच गॅप लोन आहे. राज्यात पहिल्या पाचमध्ये आम्ही ऊस दर दिला आहे; पण विरोधक ४२५ कोटींचे कर्ज असल्याचा कांगावा करत सुटले आहेत. ‘टीआरएफ’ खरेदीत पुणे येथे झालेल्या ठेकेदाराच्या खुनाची चौकशी ‘सीआयडी’मार्फत करावी म्हणजे सर्व स्पष्ट होईल, असेही त्यांनी सांगितले. नोकरभरती गरजेनुसारच केली आहे. त्यामुळे कारखान्यावर कोणताही अतिरिक्त भार पडलेला नाही. आमचा कारभार सभासदांनी बघितला आहे, सूज्ञ सभासद तुलना करून चांगलाच निर्णय घेतील, असा विश्वास व्यक्त करत निवडणुकीत ‘दादासाहेब पाटील-कौलवकर विकास आघाडी’ एकसंध आहे. भाजपसह आणखी काहीजण आमच्या संपर्कात असल्याचेही धैर्यशील पाटील यांनी सांगितले. यावेळी कारखान्याचे माजी संचालक उपस्थित होते. एका व्यासपीठावर येऊन आरोप करापाच वर्षांत आम्ही पारदर्शक कारभार केला म्हणूनच कारखाना वाचला, अन्यथा ‘दौलत’सारखी अवस्था झाली असती. विरोधाला विरोध करा पण चांगल्याला चांगले म्हणण्याची सवयही असावी. आरोपच करायचा असेल, तर एका व्यासपीठावर येऊन करावेत, आम्हीही वीस वर्षांचा पाढा वाचतो, असा इशारा अविनाश पाटील-राशिवडेकर यांनी दिला.