शहरं
Join us  
Trending Stories
1
विठुमाऊलीच्या मंदिरात मायमराठीची उपेक्षा, गुरुजींनी हिंदीत सांगितली पूजा? पोस्ट व्हायरल
2
AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची संधी! एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाने जाहीर केली बंपर नोकरभरती
3
'मत चोरी'ची तक्रार करण्यासाठी राहुल गांधींनी जारी केली वेबसाइट; नागरिकांना केले आवाहन...
4
'आम्ही धर्म विचारून नाही, कर्म पाहून मारतो', पहलगाम हल्ल्याबाबत राजनाथ सिंह यांचे मोठे वक्तव्य
5
Video: टोल प्‍लाझावर गजराजची एन्ट्री; कारवर केला हल्ला, एका क्षणात काचा फोडल्या अन्...
6
"घटस्फोटानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी डेटसाठी विचारलेलं", ६६ वर्षीय हॉलिवूड अभिनेत्रीचा मोठा दावा, म्हणाली- "त्यांनी मला फोन करून..."
7
'द इंटर्न'च्या हिंदी रिमेकमधून दीपिका पादुकोणची माघार, फक्त निर्मिती करण्याचा घेतला निर्णय
8
पतीच्या अनैतिक संबंधांना वैतागलेल्या पत्नीने कापला त्याचा प्रायवेट पार्ट, गुंगीचं औषध दिलं आणि...
9
“भारत महाशक्ती, लादलेले टॅरिफ असंविधानिक”; ट्रम्प यांना अमेरिकन अर्थशास्त्रज्ञांचा घरचा अहेर
10
बेंगळुरूत 'मेट्रो यलो'चे उद्घाटन, काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांसोबत पंतप्रधान मोदींचा मेट्रोतून प्रवास (Video)
11
क्राइम पेट्रोलचे ५० भाग बघितले, बॉयफ्रेंडला घरी बोलावलं अन् खेळ खल्लास केला! घटनाक्रम ऐकून बसेल धक्का
12
"जे देश सध्या दादागिरी करताहेत ते..."; भारत-अमेरिका तणावावर नितीन गडकरी यांचे रोखठोक विधान
13
लवकरच भडकणार पुढचं युद्ध! लष्करप्रमुख उपेंद्र द्विवेदी यांचा सूचक आणि गंभीर इशारा  
14
मंगळवारी संकष्ट चतुर्थी: श्रावणात अत्यंत शुभ अंगारक योग; पाहा, वैशिष्ट्ये, महात्म्य, मान्यता
15
'कृपया मला काम द्या...', हिना खानने मांडल्या भावना; म्हणाली, "कॅन्सरनंतर कोणीही..."
16
तिसरा श्रावण सोमवार: कोणती शिवामूठ वाहावी? ‘असे’ करा शिवपूजन; पाहा, सोपी पद्धत अन् मंत्र
17
जगदीप धनखड गायब? राऊतांना वेगळाच संशय; म्हणाले, “रशिया-चीनची पद्धत भारतात सुरू केली का?”
18
“शरद पवारांनंतर ते लोक उद्धव ठाकरेंनाही भेटले, लोकसभा अन् विधानसभेला...”; संजय राऊतांचा दावा
19
“RSS शिस्तबद्ध संघटना, ७५ वर्षे अटीचे पालन करेल”; शरद पवारांचा नाव न घेता PM मोदींकडे रोख!
20
अमेरिका-भारत नव्हे, 'या' देशाने बनवला जगातील सगळ्यात घातक ड्रोन! ११ टन वजन अन् AIवर चालणार

बजेट म्हणजे काय रे भाऊ ?

By admin | Updated: March 17, 2015 00:06 IST

‘लोकमत’संगे जाणून घेऊ : सोप्या भाषेत जाणून घ्या

कोल्हापूर : कर कुणाच्या खिशाला हात घालतो, राज्याच्या अर्थव्यवस्थेत रुपया येतो कसा, जातो कसा, या प्रश्नांची उत्तरे सोप्या भाषेत जाणून घेण्याची संधी अर्थसंकल्प २०१५ करविषयक चर्चासत्रामध्ये नागरिकांना मिळणार आहेत. ‘लोकमत’तर्फे कोल्हापुरातील राजारामपुरी येथील व्ही. टी. पाटील सभागृहात गुरुवारी (दि. १९) सायंकाळी साडेचार वाजता हे चर्चासत्र होणार आहे. या चर्चासत्रात सी. ए. उमेश शर्मा मार्गदर्शन करणार आहेत. राज्याचा अर्थसंकल्प उद्या, बुधवारी सादर केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हे चर्चासत्र होत आहे. अर्थसंकल्प म्हटले की, सर्वसामान्यांच्या दृष्टीने महागाई एवढाच विषय असतो; पण या अर्थसंकल्पाशी संबंधित कररचना, राज्य आणि केंद्र सरकार अर्थसंकल्प संबंध, आर्थिक वृद्धी, गुंतवणूक, बँकांचे व्याजदर, राज्यातील नवीन शासकीय योजना अशा अनेक बाबी सर्वसामान्यांच्या जीवनावर प्रभाव टाकतात. या संकल्पना सहज आणि सोप्या भाषेत नागरिकांना समजावून सांगण्यात येणार आहेत. सर्वसामान्य माणूस ज्या वस्तू विकत घेतो, त्यांची किंमत कशी ठरते, कर कुणी भरायचा असतो, एलबीटी म्हणजे काय, एलबीटीऐवजी येणारा जीएसटी कसा असेल, संपत्ती कर कुणी भरायचा, कोणत्या रकमेपर्यंतचे व्यवहार रोखीने करावेत, काळ्या पैशाचे व्यवहार रोखण्यासाठी चेकचा वापर कसा उपयुक्त आहे, परदेशी गुंतवणूक आणि देशाचा पर्यायाने राज्याचा विकास, राज्यांना केंद्राकडून मिळणारे अनुदान, कर रूपातील हिस्सा यांची माहिती सोदाहरण मिळणार आहे. देशाचा अर्थसंकल्प सोप्या भाषेत जाणून घेण्याच्या या अनोख्या संधीचा फायदा घेण्यासाठी सर्वांना मोफत प्रवेश आहे. प्रवेशिका लोकमत कार्यालय, पूर्णिमा अपार्टमेंट, कोंडा ओळ येथे उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी ७७९८३४४७४४ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी)