शहरं
Join us  
Trending Stories
1
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
2
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
3
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
4
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
5
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
6
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
7
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
8
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
9
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
10
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
11
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
12
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
13
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
14
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
15
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
16
बलूचिस्तानात सैन्याला मिळाले बेफाम अधिकार; सर्वसामान्यांविरोधात पाकिस्तानात बनला कठोर कायदा
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

संजय कुलकर्णींवर काय कारवाई केली

By admin | Updated: February 25, 2016 01:40 IST

पणन संचालकांची जिल्हा उपनिबंधकांना विचारणा

कोल्हापूर : कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीचे वादग्रस्त कनिष्ठ अभियंता संजय कुलकर्णी यांच्यावर काय कारवाई केली, याचा अहवाल तातडीने पणन कार्यालयाकडे सादर करण्याचे आदेश पणन संचालकांनी जिल्हा उपनिबंधकांना दिले आहेत. बाजार समितीमध्ये नोकरीस लागल्यापासून संजय कुलकर्णी यांनी आपल्या पदाचा गैरवापर करून किमान १२ लाखांचा गैरव्यवहार केल्याचे चौकशीमध्ये स्पष्ट झाले. समितीकडे नोकरीस असताना खासगी आर्किटेक्ट म्हणून काम करणे, पत्नीच्या नावे असलेल्या ‘सुशाम एंटरप्रायजेस’ या फर्मच्या नावावर स्वत:च कोट्यवधींची कामे करणे, आदी ठपके चौकशी अधिकाऱ्यांनी कुलकर्णी यांच्यावर ठेवले आहेत. याबाबत मानसिंग ढेरे (चोकाक) यांनी जिल्हा उपनिबंधकांकडे चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार सहायक निबंधक ए. व्ही. पाटील यांनी कुलकर्णी यांच्या कारभाराची चौकशी करून अहवाल सादर केला आहे. त्यामध्ये त्यांनी बारा लाखांचा गैरव्यवहार केल्याचे स्पष्ट झाले. जिल्हा उपनिबंधकांनी संबंधितांकडून पैसे वसूल करण्याचे आदेश दिले आहेत, पण समिती प्रशासनाने पुढील काहीच कारवाई केली नसल्याने ढेरे यांनी थेट पणन संचालकांकडे तक्रार दाखल केली होती. (प्रतिनिधी)