शहरं
Join us  
Trending Stories
1
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
2
युद्धविरामानंतर फ्रान्सच्या नेतृत्वात १५ देश आले एकत्र; होर्मुझवर आखला 'प्लॅन बी', कसली तयारी?
3
इराणचा अमेरिकेवर खळबळजनक आरोप; "शस्त्रसंधीच्या ३ अटी मोडल्या, आता चर्चा करणे व्यर्थ!"
4
IPL 2026: आता 'या' खेळाडूंना मैदानात एन्ट्री नाही, बीसीसीआयचा कठोर निर्णय!
5
स्मार्टफोन्सच्या दुनियेत या कंपनीचा धमाका! ६९९ रुपयांत इअरबड, ३०००० रुपयांत फ्लिप फोन; बाजार उठवला...
6
इंदूरच्या राजा-सोनमसारखं प्रकरण; "तू दिसायला चांगला नाहीस, मला..";  टोमणे मारत पत्नीनेच पतीला संपवलं
7
आसाममध्ये बहुतेक १०० टक्के मतदान होतेय...! दुपारी १ वाजेपर्यंत ६०% पेक्षा जास्त मतदान; केरळ आणि पाँडिचेरीमध्येही उत्साह
8
अजितदादांचे जॅकेट अन् चष्मा, तसाच लूक; पार्थ पवारांनी घेतली खासदारकीची शपथ, आईचा खास सल्ला!
9
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेपूर्वी स्वयंपाकघरातील ४ डब्यांत ठेवा 'या' वस्तू, मिळेल लक्ष्मीचा अखंड आशीर्वाद!
10
मराठी वर्षातील पहिली कालाष्टमी २०२६: १० राशींना सफलता, मान-सन्मान; पगारवाढ, मोठी संधी मिळेल!
11
Maruti Suzuki: दमदार मायलेज, किंमतही कमी; 'या' आहेत मारुती सुझुकीच्या बजेट कार, किंमत ४.६१ लाखांपासून सुरू
12
रेखा झुनझुनवालांनी 'या' Smallcap कंपनीतील २ लाखांपेक्षा अधिक शेअर्स विकले; स्टॉक 52W हायपासून ३५% खाली
13
युद्धविरामाचं भवितव्य अधांतरी, इराणी राजदूतांनी X वरील पोस्ट हटवली, चर्चेतून बाहेर पडणार?   
14
बारामती बिनविरोधसाठी महायुतीची धावाधाव; CM फडणवीसांचा सपकाळांना फोन, सुनेत्रा पवारांची तीनदा चर्चा
15
'तो' १० सूत्री प्रस्ताव पूर्णपणे 'फेक', ट्रम्प यांचं मोठं विधान; म्हणाले, करार न झाल्यास इराणवर पुन्हा बॉम्बफेक!
16
१० हजारांचा स्मार्टफोन थेट १४ हजारांवर! अचानक ४० टक्क्यांनी किंमती वाढल्या, 'ही' आहेत २ मोठी कारणे
17
प्रेमात आंधळी झाली ममता! प्रियकरासाठी पोटच्या २ वर्षांच्या मुलीचा गळा घोटला; मृतदेह गटारात फेकून रचला बनाव
18
रावण फक्त खलनायक नाही तर..., 'रामायण'मध्ये काय वेगळं बघायला मिळणार? दिग्दर्शक म्हणाले...
19
शिकारीचा थरार! गोळीबारात १ जण ठार; घटनास्थळी तलवार सापडल्याने गूढ वाढले, डाव कुणी साधला?
20
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर रशियाची भारतासह आशियाई देशांना 'बिग ऑफर'; ट्रम्प यांची डोकेदुखी
Daily Top 2Weekly Top 5

पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती राज्यात श्रीमंत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2019 01:06 IST

इंदुमती गणेश । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : राज्यातील विविध देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी राजे-राजवाड्यांनी दिलेल्या इनाम जमिनींमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान ...

इंदुमती गणेश ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : राज्यातील विविध देवस्थानांच्या व्यवस्थापनासाठी राजे-राजवाड्यांनी दिलेल्या इनाम जमिनींमध्ये पश्चिम महाराष्ट्र देवस्थान व्यवस्थापन समिती राज्यातील सर्वाधिक श्रीमंत देवस्थान ठरले आहे. समितीकडे कोल्हापूर, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या तीन जिल्ह्यांतील २७ हजार ९८० एकर जमिनी आहेत. त्यापाठोपाठ तुळजापूर देवस्थानची तीन हजार ४३६ एकर जमीन आहे. त्यानंतर शिखर शिंगणापूर आणि पंढरपूर या देवस्थानांचा नंबर लागतो.श्रद्धेपोटी व देवस्थानांची दिवाबत्ती, नित्य नैमित्तिक धार्मिक विधी विनासायास पार पडावेत यासाठी प्राचीन काळापासून अनेक राजवटींनी देवस्थानांना जमिनी इनाम म्हणून दिल्या. म्हणूनच या जमिनींच्या दस्तऐवजावर, सात-बारावर मालक म्हणून त्या त्या देवांचे नाव आहे. इस्लामी आक्रमणांच्या काळातही देव आणि मंदिरे असुरक्षित होती; पण देवस्थानांच्या कारभारात फेरफार झाला नाही. त्यामुळे देवस्थानांच्या इनाम जमिनी अबाधित आहेत.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच्या अखत्यारित कोल्हापूर, सांगली, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथील तीन हजार ६४ मंदिरे असून, समितीतर्फे त्यांचे व्यवस्थापन केले जाते. त्यात कोल्हापूरच्या अंबाबाई मंदिराचा व वाडी रत्नागिरी येथील जोतिबा या दोन प्रमुख मंदिरांचा समावेश आहे. मात्र, या दोन्ही मंदिरांच्या तुलनेत उदगिरी (ता. शाहूवाडी) येथील काळम्मादेवीची सर्वाधिक जमीन आहे. त्यापाठोपाठ शाहूवाडीतीलच कासार्डे येथील श्री धोपेश्वर मंदिराचा नंबर लागतो.तुळजाभवानी मंदिराच्या जमिनी चार मठ संस्थानांना देवीच्या सेवेसाठी देण्यात आल्या आहेत. या उत्पन्नातून त्यांनी देवीची सेवा करायची आहे. पंढरपूर येथील श्री विठ्ठल मंदिराची ९०० एकरहून अधिक जमीन १२ जिल्ह्यांमध्ये आहे.पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीकडील इनाम जमिनीकोल्हापूर, सांगली, रत्नागिरी व सिंधुदुर्ग येथील तीन हजार ६४ मंदिरांची मिळून २७ हजार ९८० एकर जमीनउदगिरी (ता. शाहूवाडी) काळम्मादेवी मंदिर : पाच हजार ७०८ एकरकासार्डे (ता. शाहूवाडी, ) येथील धोपेश्वर मंदिर : दोन हजार ३२ एकरवाडी रत्नागिरी येथील जोतिबा देवस्थान : एक हजार २२३.८६ एकरश्री अंबाबाई मंदिर :२४१ एकर (कोल्हापूर )अन्य देवस्थानांकडील जमिनीश्री तुळजाभवानी मंदिर (तुळजापूर) : तीन हजार ४३६ एकर. (उस्मानाबाद, सोलापूर, मोहोळ, बार्शी परिसरात)श्री शंभूमहादेव मंदिर (शिखर शिंगणापूर) : एक हजार ७०० एकर (शिंगणापूर, माण, सातारा परिसर)श्री विठ्ठल मंदिर (पंढरपूर) : ९०० एकर (सातारा, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, अमरावती, अकोला, उस्मानाबाद, यवतमाळ, वर्धा नागपूर, नगर, बुलढाणा.)