शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

कारवाईसाठी गेले, यंत्रणेअभावी परतले

By admin | Updated: April 22, 2015 00:54 IST

गौरवाडमधील घटना : बेकायदेशीर वाळू उपसा प्रकरणी ग्रामस्थातून संताप; कारवाईबाबत साशंक

कुरुंदवाड : गौरवाड (ता. शिरोळ) येथील कृष्णा नदीपात्रात बेकायदेशीर वाळू उपसा सुरू आहे. या वाळू उपशाविरोधात ग्रामस्थांनी महसूल विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करूनही दखल घेतली जात नसल्याने ग्रामस्थांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. दरम्यान, मंगळवारी दुपारी नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी कारवाईसाठी गेले. मात्र, कारवाईसाठी यंत्रणाच नसल्याने अधिकाऱ्यांना रिकाम्या हाताने परतावे लागले. त्यामुळे अवैध वाळू उपसा व्यावसायिक व अधिकाऱ्यांत साटेलोटे आहे काय? असा सवाल संतप्त ग्रामस्थ व्यक्त करीत आहेत.ग्रामस्थांच्या वारंवार होणाऱ्या तक्रारीला प्रतिसाद म्हणून मंगळवारी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास नृसिंहवाडी मंडल अधिकारी ए. डी. पुजारी हे कर्मचारी व पोलिसांना घेऊन वाळू आवटीवर पोहोचले. मात्र, अधिकारी येत असल्याची चाहूल लागताच वाळू व्यावसायिक काही वेळातच आपल्या बोटी घेऊन निघून गेले. तसेच आलेल्या या पथकाकडे कारवाई करण्यासाठी जेसीबी अथवा ट्रक, अशी कोणतीही यंत्रणा नसल्याने कारवाई न करताच ते अधिकारी माघारी परतले. त्यामुळे या अधिकाऱ्यांच्या या कारवाईबाबत ग्रामस्थही साशंक असून, ग्रामस्थांतून संताप व्यक्त होत आहे. अवैध वाळू व्यावसायिक व अधिकारी यांच्यात साटेलोटे असल्याचा आरोप करीत आहेत. (वार्ताहर)रात्री अकरा नंतर वाळू उपसाकृष्णा नदीपात्रात आठ ते दहा ठिकाणांहून बेकायदेशीर वाळू उपसा केला जात आहे. त्यामुळे नदी प्रदूषणाबरोबरच नदीचे अस्तित्वही धोक्यात आले आहे. पाणवट्यावर वाळू उपसा करू नये, यासाठी तहसीलदार सचिन गिरी, प्रांताधिकारी अश्विनी जिरंगे यांच्याकडे ग्रामस्थ पाठपुरावा करीत आहेत. मात्र, अधिकाऱ्यांकडून दखल न घेता ग्रामस्थांच्या तक्रारीला वाटाण्याच्या अक्षता लावल्या जात आहे. रात्री ११ नंतर बोटीने वाळू उपसा करून वाहतूक केली जाते. उजाडताच सर्व काही शांत होते. वाळू व्यावसायिकांच्या या रात्रीच्या चोरीमुळे ग्रामस्थही हतबल झाले आहेत.